Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon factory Election: माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे थेट लढत, २४ जूनला निकाल

बारामतीत गेल्या काही दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोणता पॅनल विजयी होणार, कोण अपयशी होणार, हे  मंगळवारी ( २४ जून) होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 22, 2025 | 09:39 AM
Malegaon factory Election: माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे थेट लढत, २४ जूनला निकाल
Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon factory Election) आज ( २२ जून) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनलमध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि सहकार महर्षी चंद्रराव तावरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

कारखान्यातील २१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. १९ हजार ५४९ सभासग आपला मतदानाच हक्क बजावणार आहेत. बारामती शहरातील प्रशासकीय भवनात  मतदान होत आहेत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ३७ गावांचा समावेश असून ६७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. दोन दिवसांनी म्हणजे २४ जूनला मतमोजणी होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आणि अजित पवार यांनीदेखील मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.

B-2 Stealth Bombers : अमेरिकेच्या ६ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचं इराणच्या दिशेने उड्डाण? फोर्डो न्यूक्लियर साइटवर हल्ल्याची शक्यता

कारखान्याची यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माळेगाव निवडणुकीत पहिल्यांदाच अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात थेट लढत असल्याने संपूर्ण बारामतीकरांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत चार पॅनल आणि काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘श्री नीलकंठेश्वर पॅनल’, चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’, शरद पवार गटाचे ‘बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल’ आणि ‘कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती’ ही प्रमुख पॅनल यावेळी आमने-सामने आहेत.

शरद पवार गट व संघर्ष समितीमुळे कोणत्या पॅनलला फटका बसणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरूत “मीच चेअरमन होणार” अशी थेट घोषणा केल्याने राज्यभरात या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. अजित पवारांच्या विरोधात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी जोरदार प्रचार उभा केला असून, प्रतिसाद देताना अजित पवारांना तब्बल दहा ते बारा सभा घ्याव्या लागल्या.

निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान

आज  (22 जून) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६७ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. एकूण ९० उमेदवार रिंगणात  आहेत.

मतदान केंद्रांची विभागवार माहिती :

गट क्रमांक 1 – माळेगाव : 11 केंद्रे

गट क्रमांक 2 – पणदरे : 13 केंद्रे

गट क्रमांक 3 – सांगवी–कांबळेश्वर : 8 केंद्रे

गट क्रमांक 4 – खांडज–शिरवली : 7 केंद्रे

गट क्रमांक 5 – निरावागज : 12 केंद्रे

गट क्रमांक 6 – बारामती : 15 केंद्रे

‘ब’ वर्गासाठी स्वतंत्र केंद्र : 1

एकूण मतदान केंद्रांची संख्या : 67

जळगाव हादरलं! पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला;कुटुंबाचा खून झाल्याचा आरोप

बारामतीत गेल्या काही दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोणता पॅनल विजयी होणार, कोण अपयशी होणार, हे  मंगळवारी ( २४ जून) होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.या सगळ्या घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. “प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असून ती लोकशाही पद्धतीने लढवली पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही टिकावी, यासाठी निवडणुका घेतल्या जातात. ही सहकाराची निवडणूक आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे यात खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या माध्यमातूनच सहकाराची चळवळ मोठी झाली. जे कोणी या निवडणुकीत लढत आहे, त्या सर्वांना  शुभेच्छा, पारदर्शन निवडणूक पार पडावी, कारखाना चांगल्या पद्धतीने चालू राहावा. पण कारखाना कुठलाही असो त्यात पारदर्शक कारभार होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.   आतापर्यंत खूप टीका टीपण्ण्या झाल्या. आज मतदान करू,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Malegaon sugar factory election ajit pawar vs chandrarao taware direct fight results on 24 july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
3

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार
4

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.