Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड; पालकमंत्र्यांच्या पाठबळातून सरपंचांच्या कार्याचा जलवा,रस्त्यांसह मूलभूत सुविधांना प्राधान्य

Malharpeth Patan Taluka Development : मल्हारपेठ गावात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने आणि सरपंच किरण दशवंत यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांना गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मूलभूत सुविधांना प्राधान्य देत गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 08:44 PM
मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड; पालकमंत्र्यांच्या पाठबळातून सरपंचांच्या कार्याचा जलवा,रस्त्यांसह मूलभूत सुविधांना प्राधान्य
Follow Us
Follow Us:
  • मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड
  • पालकमंत्र्यांच्या पाठबळातून सरपंचांच्या कार्याचा जलवा
  • रस्ते काँक्रीटीकरणासह स्थानिक विकासकामांना प्राधान्य

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील महत्त्वाचे राजकीय गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारपेठच्या विकासकामांना सध्या चांगलीच गती मिळाली असून, विविध विकासकामांमुळे गावाचे रूपडे बदलताना दिसत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सहकार्य व मार्गदर्शनातून लोकनियुक्त सरपंच किरण दशवंत व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना चालना मिळत असून, सरपंचांच्या पुढाकारातून गावातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे.

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

मल्हारपेठ येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, रस्ते दुरुस्ती, गटारी, पथदिवे तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गावातील अनेक भागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. पावसाळ्यात चिखल व पाण्याचा त्रास होणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ रस्त्यांपुरते मर्यादित न राहता, स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीही ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

मल्हारपेठ हे परिसरातील बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासाची गरज आहे. त्यादृष्टीने सुरू असलेल्या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आहे.

“गावाचा विकास हा केवळ एका कामाने होत नाही; प्रत्येक नागरिकाला आवश्यक सुविधा मिळणे आणि गावाचे सुंदर, स्वच्छ व सुरक्षित रूप तयार होणे हेच विकासाचे खरे उद्दिष्ट आहे,” अशी भूमिका लोकनियुक्त सरपंच किरण दशवंत व ग्रामपंचायत प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. पालकमंत्र्यांचे पाठबळ, ग्रामपंचायतीचे नियोजन आणि सरपंचांचा पुढाकार यामुळे मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड सुरू असून, आगामी काळात आणखी विकासकामे मार्गी लागण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले

Web Title: Malharpeth development patan shambhuraj desai kiran dashwant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • development
  • Infrastructure
  • Satara

संबंधित बातम्या

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
1

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
2

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले
3

Maharashtra Drought: साताऱ्यावर पाणीटंचाईचे सावट! १० टक्के पाणीकपातीचा आदेश; पालिकेने उचलली महत्त्वाची पावले

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
4

Sugarcane Rate : दर निश्चित होईपर्यंत ऊस देऊ नका, वसीम इनामदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.