Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास व रोजगाराचा संकल्प दृढ केला. चालू वर्षात ७.५ लाख तरुण रोजगारक्षम झाल्याची माहिती त्यांनी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 07:05 PM
मंत्री मंगल प्रभात लोढा (Photo Credit- X)

मंत्री मंगल प्रभात लोढा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

मुंबई: “महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जी यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक रोजगाराच्या संधीसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा संकल्प अधिक दृढ करत आहे,” असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

मंत्री श्री लोढा म्हणाले की, आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने उद्योग, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासात देशात आघाडी घेतली आहे. दावोस येथे झालेल्या ₹१५.७० लाख कोटींच्या सामंजस्य करारांमधून सुमारे १५.९५ लाख रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रोजगाराच्या संधींचा लाभ महाराष्ट्रातील युवकांना मिळावा, यासाठी कौशल्य विकास विभाग उद्योगांच्या गरजांनुसार कुशल आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

ते पुढे म्हणाले की, एप्रिल २०२४ ते जून २०२६ या कालावधीत विभागामार्फत १,६१९ रोजगार मेळावे आयोजित करून ८५,८३४ युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १,३८,६३५ युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी ₹८९७.६५ कोटींचे विद्यावेतन वितरित करण्यात आले आहे.

न्यायालयांमधील प्रलंबित खटले कमी होणार; दुर्बल घटकांना कायदेशीर मदतीसाठी ‘या’ कार्यक्रमाचे आयोजन

याशिवाय राज्यातील २,५०७ कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमधून ३.८४ लाखांहून अधिक युवक प्रशिक्षण घेत आहेत, तर राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनांद्वारे १.७१ लाखांहून अधिक उमेदवार रोजगारक्षम झाले आहेत. राज्यातील आयटीआयमधून दरवर्षी १.५ लाख युवक उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अल्पकालीन अभ्यासक्रम, कौशल्य केंद्रे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना बदलत्या रोजगार बाजारपेठेसाठी सक्षम करण्याचे काम विभाग करत आहे.

कौशल्ये विकास केंद्र, अप्रेंटिसशिप, शॉर्ट टर्म कोर्सेस व आयटीआय यांच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षी एकूण सुमारे ७. ५ लाख उमेदवार रोजगार सक्षम झाले आहेत. उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात ३६ स्टार्टअप केंद्रे, मुख्यमंत्री महाफंड तसेच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
रोजगार शोधणारेच नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडविण्याच्या दिशेने विभाग सातत्याने काम करत आहे.

शेवटी मंत्री श्री लोढा म्हणाले, “आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी विकसित महाराष्ट्रासाठी दिलेल्या रोजगाराभिमुख विकासदृष्टीला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आमचा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना अधिक कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि उद्योजक बनविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करत आहोत. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंची गाठत राहो, हीच सदिच्छा.”

तरुणांच्या कौशल्य विकासाला मिळणार गती; Mangal Prabhat Lodha यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ

Web Title: Mangal prabhat lodha reaffirms commitment to employment and skill development on cm devendra fadnavis birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • maharashtra news
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
1

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
2

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
3

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
4

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.