Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2025 | 09:26 PM
Jarange Patil On Fadnavis: 'फडणवीसांना 'वर्षा'वर धुवून...'; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

Jarange Patil On Fadnavis: 'फडणवीसांना 'वर्षा'वर धुवून...'; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

Follow Us
Follow Us:

मनोज जरांगे पाटलांचे मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान 
मनोज जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू 
मराठा आरक्षणच्या जीआरविरोधात ओबीसी नेते आक्रमक

Manoj Jarange Patil Controvesrial Statement: महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान पाच दिवसांनी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. यावेळी संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

नेमके प्रकरण काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना घेरण्यासाठीच मुंबईत आंदोलन केले असे विधान केले होते. यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

मुंबईत मराठ्यांना पाऊल ठेवू दिले जाणार नसते तर, वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढले असते असे विधान जरांगे पाटील यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस यांना घेरण्याचा मुख्य उद्देश्य या आंदोलनाचा  होता, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शिंदे साहेब बिचारा माणूस तसे कधीच करू शकत नाही. राऊत साहेब म्हटले हे त्यांचे राजकीय टोले असतील. मुंबईत उभारू देणार नाही असे ते म्हणाले होते. आम्हाला काही करायचे असते तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतला असता.”

सरकार काहीतरी मोठं करणार? OBC आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

आधी देखील आपल्या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पाहायला मिळाले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर देखील वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त विधान मागे घेतले होते. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते अकमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: Manoj jarange patil controversial statement on cm devendra fadnavis maratha reservation politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Controversial
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
4

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.