मुख्यमंत्री ओबीसी आंदोलनाला भेट देणार (फोटो -ani)
Maratha Reservation: मराठा आरक्षणसाठी जीआर काढल्यावर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र त्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
ओबीसी समाज मराठा आरक्षणचा जीआर काढल्यावर आक्रमक झाला आहे. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागपूरमध्ये ओबीसी समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचाली देखील वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील ओबीसी समाजाच्या आंदोलनाला भेट देणार असल्याचे समोर आले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये तसेच त्यावर काही अडचण येऊ नये यासाठी ओबीसी समाज आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाज आंदोलन करत आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत सरकारने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाला भेट देणार असल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री फडणवीस ओबीसी नेते तायवाडे यांच्याशी आंदोलनाबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.