Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Maratha Reservation Breaking: मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आझाद मैदानावर मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2025 | 04:48 PM
Manoj Jarange Patil Live: "... रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार"; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil Live: "... रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार"; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

आपण लढाई जिंकलो असे जरांगे पाटील म्हणाले
रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार 
सरकार एका तासात जीआर काढणार

Maratha Reservation Live in Azad Maidan: मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आझाद मैदानावर मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. जरांगे पाटील यांना आरक्षणाचा मसुदा दाखवण्यात आला आहे. दरम्यान आपण लढाई जिंकलो आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. सरकार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जीआर काढणार आहे. सरकार एक तासाभरात आपल्याला जीआर आणून देणार आहे. सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्यावर व जीआर दिल्यानंतर सर्व आंदोलक रात्री 9 वाजता मुंबई रिकामी करतील, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

उपसमितीच्या मसुद्यावर जरांगे पाटलांचे मोठे विधान

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार आहे. आपण आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सरकारकडे केल्या  होत्या. सातारा गॅझेटियरला 15 दिवसांत मान्यता देण्यास उपसमिती तयार आहे. सप्टेंबरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असे सरकार सांगत आहे. आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्याना सरकार 15 कोटींची मदत करणार आहे.

Manoj Jarange Patil Live: आरक्षणाचा प्रश्न सुटणार? उपसमितीच्या मसुद्यावर जरांगे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले…

जात प्रमाणपत्रांबबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे.  आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जीआर काढणार आहे. वंशावळ समिती गठित करावी अशी आमची मागणी आहे.

न्यायालयाकडून राज्य सरकारची खरडपट्टी

मराठा आरक्षणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहेत. काल झालेल्या सुनवणीत उच्च न्यायालयाने आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे निर्देश मराठा आंदोलकांना दिले होते. त्यानंतर आज दिवसभरात हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या बाहेर पडण्याची तयारी करत होते. त्यानंतर आज झालेल्या सुनवणीत न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकारलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येत हे माहिती असतानाही तुम्ही कठोर कारवाई का केली नाही, असा खडा सवाल करत न्यायालयाने राज्य सरकारचीही कानउघाडणी केली आहे. तुम्ही आधीच कोर्टात यायला पाहिजे होतं. ही तुमची चूक आहे. राज्य सरकारनेही न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, अशा कठोर शब्दांत उच्च न्यायालयने राज्य सरकारला फटकारलं आहे. ५० हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

 

Web Title: Manoj jarange patil statement about maharashtra government gr mumbai maratha reservation cm fadnavis azad maidan marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
1

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला
4

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.