Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

समृद्धी महामार्गावर मोठे खड्डे पडल्याच्या व्हायरल व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधत कंत्राटदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 07:20 PM
'सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली'; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

'सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली'; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • समृद्धी महामार्गावर खड्डे पडल्याच्या दाव्यानंतर रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.
  • कंत्राटदार कंपनी, इलेक्टोरल बाँड्स आणि कामाच्या गुणवत्तेवर रोहिणी खडसेंनी प्रश्न उपस्थित केले.
  • ‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’ म्हणत महायुती सरकारवर निशाणा साधला.
नुकत्याच मुंबई पुणे मिसिंग लिंक वरील बोगद्यावर दरडी कोसळल्यामुळे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. विरोधकांनी मिसिंग लिंकच्या बांधकामावर आक्षेप घेत गंभीर आरोप केले होते. अश्यातच झालेली घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्त असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याच्या व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री फडणविसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याचे सांगत टीका केली आहे.

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्या म्हणाल्या, “मिसिंग लिंकच्या कारनाम्यानंतर महायुती सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या येत की मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे तर होणारच होतं!”

#MissingLink च्या कारनाम्यानंतर महायुती सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माध्यमांच्या माध्यमातून अशा बातम्या येत की मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे तर होणारच होतं! समृद्धी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये MEIL… pic.twitter.com/waq5o0UnV9 — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 12, 2026

कंत्राट प्रक्रियेवरही उपस्थित केले प्रश्न

त्या म्हणाल्या, “समृद्धी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये MEIL (Megha Engineering & Infrastructure Ltd.) एक प्रमुख कंत्राटदार कंपनी होती, या कंपनीने जवळपास ५८५ कोटी रुपये भाजपला इलेक्टोरल बॉण्ड्च्या माध्यमातून दिले.‌ जर कंपनींच्या मागील कामांचा दर्जा न पाहता फक्त इलेक्ट्रॉल बॉण्ड्च्या बदल्यात कामं दिलं जात असेल तर त्या कामांचा दर्जा काय राहील हे वेगळं सांगायला नको.”

‘आम्ही पैशांची मागणी केली नाही, शारीरिक संबंध होणार नाहीत तर…’; गिरीजा राऊतांच्या आईचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप

कंत्राटदार समृद्ध, सामान्य लोकांचे जीव मात्र स्वस्थ

त्या पुढे म्हणाल्या, “सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली; मग जनतेच्या हाताला काटेच येणार! या सगळ्यात कंत्राटदार समृद्ध झाले आहे बाकी सामान्य लोकांचे जीव मात्र स्वस्थ झाले आहे.”

दरम्यान, समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असले तरी संबंधित यंत्रणांकडून या दाव्यांवर अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे.

Web Title: Rohini khadse slams devendra fadnavis over samruddhi mahamarg potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Rohini Khadse
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला
1

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ; प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
2

अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ; प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

अमराठी टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई नाही…
3

अमराठी टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई नाही…

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम
4

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.