Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात मच्छीमारांनी जनआक्रोश मार्च काढत तीव्र विरोध दर्शविला. प्रस्तावित प्रकल्पामुळे समुद्री पर्यावरण, पारंपरिक मासेमारी आणि हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 05:52 PM
मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Follow Us
Follow Us:
  • मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात मच्छीमारांचा ‘जनआक्रोश’
  • प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी
  • मनोरीत जलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात एल्गार
विजय काते, भाईंदर : मनोरी-गोराई परिसरातील समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी तयार करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे समुद्री पर्यावरण, मत्स्यसंपदा आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करीत शुक्रवारी मच्छीमार समाजाच्या वतीने जनआक्रोश मार्च काढण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समुद्रकिनारी विविध विकास प्रकल्प राबविले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनोरी-गोराई परिसरात समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज सुमारे २०० एमएलडी गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाच्या प्रक्रियेत निर्माण होणारे मोठ्या प्रमाणातील अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाण्याची शक्यता असल्याने त्याचा समुद्री परिसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा मच्छीमारांनी केला आहे.

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा

मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, समुद्रातील पाणी प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेत मासळीची पिल्ले, मत्स्यबीज तसेच इतर सूक्ष्म आणि समुद्री जीवांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. समुद्रातील क्षारांचे प्रमाण आणि रासायनिक संतुलन बिघडल्यास त्याचा थेट परिणाम मत्स्यसंपत्तीवर होऊ शकतो. परिणामी, या परिसरातील पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

मनोरी, गोराई, वेटाळवली आणि परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. या व्यवसायावर स्थानिक मच्छीमार समाजाची आर्थिक व्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली समुद्र आणि त्यावर आधारित पारंपरिक व्यवसायाला धोका निर्माण होऊ नये, अशी भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे.

या प्रकल्पाचा परिणाम केवळ समुद्रातील जीवसृष्टीपुरता मर्यादित राहणार नसून समुद्रकिनाऱ्यालगतच्या पर्यावरणावर, नैसर्गिक अधिवासावर तसेच स्थानिकांच्या पारंपरिक जीवनपद्धतीवरही होण्याची शक्यता आंदोलकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी त्याचा पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम सखोलपणे तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, वेटाळवली परिसरातील मच्छीमार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा जनआक्रोश मार्च आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मनोरी जेट्टी येथून या मार्चला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छीमार, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, विकास प्रकल्पांना विरोध करण्यामागे स्थानिकांचा विकासाला विरोध नसून पर्यावरणाचे संरक्षण आणि पारंपरिक उपजीविकेचे रक्षण हा मुख्य उद्देश असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. समुद्रातील मत्स्यसंपदा आणि स्थानिक मच्छीमारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने प्रस्तावित जलशुद्धीकरण प्रकल्पाचा फेरविचार करावा, तसेच स्थानिक मच्छीमारांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

या आंदोलनामुळे मनोरी-गोराई परिसरातील प्रस्तावित जलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, शासन आणि मुंबई महापालिका याबाबत काय भूमिका घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Web Title: Manori water treatment project fishermen janakrosh march protest mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • environment
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Konkan News: ‘सह्याद्री वाचवायचा असेल तर…’; ‘’कोंकणी रानमाणसा’ने सांगितला संवर्धनाचा नवा मंत्र
4

Konkan News: ‘सह्याद्री वाचवायचा असेल तर…’; ‘’कोंकणी रानमाणसा’ने सांगितला संवर्धनाचा नवा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.