28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना
मुंबई : जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखी नव्या हल्ल्यांचे सावट उभे राहिले आहे. या हल्ल्याला सायबर वॉरफेअर (सायबर युद्ध) असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सायबर सेलने ‘इकोज ऑफ पहलगाम’ या नावाने एक अहवाल तयार केला आहे. ज्यामध्ये 23 एप्रिलनंतर भारतावर जवळपास 10 लाख सायबर हल्ले झाल्याचे उघड झाले आहे.
सध्या होणारे हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य-पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया येथून होत आहेत. हे सर्व हॅकिंग ग्रुप्स स्वतःला इस्लामिक संघटना असल्याचे सांगतात. यामध्ये टीम इन्सेन पीके हा पाकिस्तानी एपीटी (अॅडव्हान्स प्रेसिस्टन्ट थ्रेट) ग्रुप सर्वाधिक सक्रिय आहे. या ग्रुपने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक वेल्फेअर आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत. या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाईट डिफेसमेंट, सीएमएस एक्प्लॉइटेंशन आणि कमांड अँड कंट्रोल अॅटॅक्स यांचा समावेश आहे.
रेल्वे, बँकिंग, सरकारी पोर्टल यंत्रणा धोक्यात असल्याचेही समोर आले आहे. हे सर्व सायबर हल्ले 26 एप्रिलपासून सुरू झाले असून, काही हल्ले यशस्वी देखील ठरले आहेत. महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखले असले तरी रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले की, रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टल्ससारख्या महत्त्वाच्या यंत्राणांवर धोका निर्माण झाला. अनेक ठिकाणी सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे हे हल्ले यशस्वी झाले.
22 एप्रिलला झाला होता हल्ला
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरवून सोडले. या भयानक घटनेत 26 नागरिकांचा बळी गेला असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारताने या हल्ल्याला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले आहे, तर पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावत भारतावर संघर्ष उकळण्याचा आरोप केला आहे.






