Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. कळंब-धाराशिव-लातूर मार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 06:51 PM
जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

Follow Us
Follow Us:
  • जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
  • धाराशिव जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या धाराशिव जिल्हा बंदला गुरुवारी शहरासह जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. धाराशिव शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने आणि दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नेहमी गजबजलेले प्रमुख बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते. रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसून आली.

जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला. मात्र, दवाखाने, शासकीय कार्यालये आणि बँका यांसारख्या अत्यावश्यक व सार्वजनिक सेवा सुरू होत्या. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काही प्रमाणात वर्दळ होती.

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम

कळंब–धाराशिव–लातूर मार्गावर रास्ता रोको

दरम्यान, कळंब–धाराशिव–लातूर राज्य मार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली असतानाच मराठा समाज बांधव पुन्हा रस्त्यावर उतरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांनी दिवसभर रास्ता रोको करून मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची धावपळ वाढली.

कळंब–ढोकी मार्गावर टायर जाळले

कळंब–ढोकी रस्त्यावरही आंदोलनाची धग जाणवली. या मार्गावर ठिकठिकाणी अज्ञात गावकऱ्यांनी टायर जाळल्याची माहिती आहे. टायर जाळल्यामुळे काही काळ रस्त्यावर धुराचे लोट पसरले आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलन शांततेत पार पडावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजाकडून बंद, रास्ता रोको आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

धाराशिव शहरातील कडकडीत बंद आणि राज्य मार्गावरील रास्ता रोको आंदोलनामुळे जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा एकदा व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे. आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेते आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती भूमिका जाहीर करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Web Title: Dharashiv bandh support manoj jarange maratha protest road block kalamb latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
1

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!
2

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले
3

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र
4

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.