Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Sharad Pawar: राज्य आणि देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्थेची स्थिती, साखरेचे दर, संभाव्य दुष्काळ, मनोज जरांगे यांचे आंदोलन, शिवसेना चिन्ह सुनावणी तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 11:45 AM
‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं (फोटो सौजन्य-ChatGPT)

‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • ‘महागाईच्या मूळ दुखण्याकडून लक्ष हटवण्यासाठी नवे मुद्दे पुढे’
  • सरकारवर गंभीर आरोप
  • साखर आयातीला विरोध, दुष्काळावरही व्यक्त केली चिंता
Sharad Pawar: राज्य आणि देशातील वाढती महागाई पाहता तसेच अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. र्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण होत असताना मूळ आर्थिक प्रश्नांऐवजी वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवले जात असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला. शिक्षणासह विविध विषयांवरील वाद निर्माण होणे हा त्याचाच भाग असल्याचा दावा करत हे सर्व ठरवून होत असल्याचे दिसत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

आंदोलन करण्याची संधी

दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची संधी मिळायला हवी, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या असून त्याबाबत सरकारने स्वीकारलेल्या धोरणातील त्रुटींवर न्यायव्यवस्थेनेही भाष्य केल्याचा दावा शरद पवार यांनी केला. प्रशासनाशी संबंधित निर्णयांमध्ये न्यायालयाला वारंवार हस्तक्षेप करावा लागत असेल तर ती चिंतेची बाब आहे. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

Eknath Khadse: ‘नाथाभाऊंनी पक्ष उभा केला’ शरद पवारांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; भाजपला दाखवला आरसा

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीवर मात्र शरद पवार यांनी सावध भूमिका घेण्यात आली. प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू असल्याने न्यायालयाचा अंतिम निकाल येण्यापूर्वी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगण्यात आले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करून अंतिम निर्णयानंतर यावर चर्चा करता येईल, अशी भूमिका मांडण्यात आली.

तिमाही जीडीपी आणि देशाची अर्थव्यवस्था

तिमाही जीडीपी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला. पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री देशाच्या अर्थव्यवस्थेचे सकारात्मक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी महागाई आणि सामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी या मूळ प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. आगामी काळात रुपयाच्या मूल्यावरील दबाव आणि वाढत्या महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्याबाबत १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या तारखेत पुढे-मागे बदल होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बारामतीत उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेची पंतप्रधान पाहणी करतील आणि त्यांना या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

साखरेचे वाढते दर

साखरेच्या वाढत्या दरांवर बोलताना त्याचा प्रत्यक्ष फायदा अद्याप ऊस उत्पादकांना झाल्याचे दिसत नाही,असं शरद पवार यांनी म्हटलं. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारातील वाढत्या किमतीचा काही हिस्सा प्रत्यक्ष पीक घेणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली. साखर आयातीच्या प्रस्तावालाही विरोध दर्शवत, सध्याच्या परिस्थितीत साखर आयात करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. दुबार पेरणीच्या संकटाबरोबरच आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीसाठीच्या पाण्याचे प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. विशेषतः मराठवाड्याला दुष्काळाचा मोठा फटका बसण्याची भीती असून संकटात सापडलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

FDA अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या दुग्ध व्यवसायावरील कारवाईचे समर्थन करण्यात आले. कारवाईमुळे दुधातील भेसळीला आळा बसल्याचे सांगत भेसळमुक्त आणि दर्जेदार दुधासाठी ग्राहक काही प्रमाणात अधिक पैसे देण्यास तयार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत काही मंत्री त्यांची भेट घेणार असल्याचे सांगत सरकारकडून नेमका कोणता निर्णय किंवा प्रस्ताव दिला जातो, हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, “१९९४ पासून आजपर्यंत काय करत आहात? आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्येच आहात,” असा सवाल उपस्थित करत त्यांच्या टीकेवर पलटवार करण्यात आला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Web Title: Maharashtra inflation economy sugar prices drought ai institute baramati political reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!
1

Maharashtra Band: मराठा आरक्षणामुळे राजकारण तापणार; उद्या ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद!

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले
2

Beed-Jalna Violence: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीड-जालन्यात मध्यरात्री टायर जाळले

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र
3

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
4

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.