Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन रंगलं राजकारण

Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2025 | 05:45 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. मात्र समाधीच्या जवळचा वाघ्या कुत्र्याचे स्मारक बांधण्यात आले आहे. हे स्मारक पूर्णपणे काल्पनिक असून याबाबत कोणताही इतिहासामध्ये पुरावा नसल्याचे म्हणत ते हटवण्याची मागणी छत्रपती घराणेचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मात्र यावरुन आता वादंग निर्माण होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संभाजीराजे छत्रपती बोलतात ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याचा इतिहास हा पूर्णपणे खरा आहे, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन राजकारण रंगलं आहे.

The liveblog has ended.
  • 27 Mar 2025 05:18 PM (IST)

    27 Mar 2025 05:18 PM (IST)

    खासदारांच्या वेतनामध्ये 24 टक्क्यांनी वाढ

    केंद्र सरकारकडून खासदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून आजी माजी खासदारांच्या वेतनामध्ये आणि भत्तामध्ये 24 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

  • 27 Mar 2025 04:26 PM (IST)

    27 Mar 2025 04:26 PM (IST)

    माणगाव - श्रीवर्धन रस्त्यावर गाडीला आग

    माणगाव - श्रीवर्धन रस्त्यावर आगीची घटना घडली आहे. यामध्ये वाहनाला आग लागल्याची घटना घडली. डंपरला आग लागली असून धुराचे लोट लांब पर्यंत पसरले आहेत.

  • 27 Mar 2025 04:19 PM (IST)

    27 Mar 2025 04:19 PM (IST)

    आदित्य ठाकरेला ड्रग्जची सवय आहे - निरुपम

    "आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र हे प्रकरण अजून सीबीआयकडे गेलेले नाही. मुंबई पोलिसांनीच याची चौकशी केली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठं षडयंत्र दिसून येतं. यामध्ये ड्रग्जचं प्रकरण आहे. समीर खान म्हणून एक व्यक्तीला अटक करण्यात आली होती. ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरेला ड्रग्जची सवय आहे आणि ते हायड्रो पॉनिक व्ही नामक ड्रग्जचे सेवन करतात. असे समीर खानने चौकशीत म्हटले होते," असा गंभीर दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

  • 27 Mar 2025 03:50 PM (IST)

    27 Mar 2025 03:50 PM (IST)

    प्रशांत कोरटकरची पाच तास कसून चौकशी

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अन्यत्र हलवण्यात आले आहे. बुधवारी त्याची रवानगी राजाराम पोलीस ठाण्यात केली होती. फॉरेन्सिक टीमकडून कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. दरम्यान, तपासासाठी त्याला अन्यत्र हलवण्यात आले आहे.

  • 27 Mar 2025 03:20 PM (IST)

    27 Mar 2025 03:20 PM (IST)

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा होणारच - अजित पवार

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, या हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही.

  • 27 Mar 2025 03:19 PM (IST)

    27 Mar 2025 03:19 PM (IST)

    मनसेच्या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो!

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. याच तयारी दरम्यान शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळाल्या. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो बॅनरवर आहेत. अनेक वर्षांनी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता.मात्र यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो पाहायला मिळाला. या बॅनरनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की काय? अशी चर्चा देखील रंगली आहे.

  • 27 Mar 2025 02:46 PM (IST)

    27 Mar 2025 02:46 PM (IST)

    वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत होळकर घराण्याच्या वंशजांनी स्पष्टच सांगितलं

    भूषणसिंहराजे होळकर म्हणाले की, "मागच्या वेळेस वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत घडलेला विषय परत घडू नये. राजकीय हेतूसाठी कुणीही आपले अजेंडे राबवू नयेत. अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्रात प्रत्येक ऐतिहासिक विषय हा राजकारणाचा आणि जातीचा विषय होतोय.राजकारण्यांनी रोजगार, महागाईवर बोला, हे विषय आता काढून जाती– जातीत वाद कशाला?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • 27 Mar 2025 02:05 PM (IST)

    27 Mar 2025 02:05 PM (IST)

    : पोर्शे अपघात प्रकरणातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

    कल्याणीनगर येथील हायप्रोफाईल तसेच राज्यभरात गाजलेल्या पोर्शे अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठविला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यापुर्वी त्यांना कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.

  • 27 Mar 2025 01:39 PM (IST)

    27 Mar 2025 01:39 PM (IST)

    OLA-Uber सारख्या केंद्र सरकार टॅक्सी सेवा सुरू करणार

    गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या प्रयत्नांनी लवकरच सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती अमित शाह यांनी संसदेत दिली. याअंतर्गत कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालकांसाठी फायद्याची बातमी असून यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल आणि त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. अमित शहा हे सहकार मंत्रालय देखील सांभाळतात आणि यासंबंधी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी संसदेत ही माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकारी टॅक्सी सुरू करण्यात येईल, ज्यामुळे चालकांना त्यांचा थेट नफा मिळण्यास मदत होईल.

  • 27 Mar 2025 12:16 PM (IST)

    27 Mar 2025 12:16 PM (IST)

    वडगावात पुणे-मुंबई महामार्गावर कार,पीएमपी बस आणि डंपरचा विचित्र अपघात

    पुणे मुंबई महामार्गावर मातोश्री हॉस्पिटल जवळ आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात डंपर चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • 27 Mar 2025 12:15 PM (IST)

    27 Mar 2025 12:15 PM (IST)

    पुण्यामध्ये महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

    पुण्यामध्ये पाणीटंचाई भासत आहे. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी कमी दाबाने येत असून अगदी काही वेळ येत आहे. यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये ही पाणीटंचाई भासत आहे. दरम्यान, याविरोधात वडगावशेरीमध्ये महिलांनी आंदोलन केले आहे.

  • 27 Mar 2025 11:43 AM (IST)

    27 Mar 2025 11:43 AM (IST)

    राजू पाटील यांनी मानले कुणाल कामराचे धन्यवाद

    कुणाल कामराने याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली. मात्र यावरुन महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. कुणाल कामरा याला पोलिसांनी समन्सने बजावला आहे. यानंतर आता मनसे नेते राजू पाटील यांनी कुणाल कामराला धन्यवाद मानले आहेत.

  • 27 Mar 2025 11:38 AM (IST)

    27 Mar 2025 11:38 AM (IST)

    OPPO F29 5G वाटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु

    OPPO F29 स्मार्टफोनची पहिली सेल लाईव्ह सुरू झाली आहे. पहिल्या सेल दरम्यान, ऑफरसह तुम्ही हा फोन ११,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. हा ओप्पो फोन अफोर्डेबल किमतीत उत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत. हा ओप्पो फोन वॉटरप्रूफ डिझाइनसह येतो. या फोनची वैशिष्ट्ये काय आहे वाचूयात.

    OPPO F29 5G वाटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री आज पासून सुरु, उत्तम वैशिष्ट्ये आणि उत्तम डिस्काउंट

  • 27 Mar 2025 11:35 AM (IST)

    27 Mar 2025 11:35 AM (IST)

    मधूमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का

    मधुमेह किंवा कॅन्सर हे दीर्घकाळ शरीरात दिसून येणारे आजार आहेत. या आजारांचे निदान झाल्यानंतर वर्षानुवर्षे डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. मात्र आता मधुमेह आणि कॅन्सरच्या गोळ्या औषधांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. या औषधांच्या किमतींमध्ये 1.7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये दर वाढीचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर दिसून येणार नाही. मात्र येणाऱ्या 3 महिन्यांनंतर दरवाढ जाणवण्याची शक्यता आहे. कारण तीन महिन्यांचा साठा केंद्राकडे उपलब्ध आहे.

  • 27 Mar 2025 11:32 AM (IST)

    27 Mar 2025 11:32 AM (IST)

    उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या ७६४ नवीन फेऱ्या धावणार

    यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल,२०२५ ते दिनांक १५ जून,२०२५ पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.

  • 27 Mar 2025 11:19 AM (IST)

    27 Mar 2025 11:19 AM (IST)

    धनंजय देशमुख यांनी केली आरोपींच्या फाशीची मागणी

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आरोपींनी कबुली दिल्यावर आम्ही समाधानी आहोत, असे म्हणणे घाईचे होईल. जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही. तोपर्यंत समाधानी म्हणणे घाईचे होईल. आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करावी तसेच सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

  • 27 Mar 2025 10:46 AM (IST)

    27 Mar 2025 10:46 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा नागपूरमध्ये असणार आहे. पंतप्रधान मोदी हे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन दंगल झाली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी घेतली जात आहे.

  • 27 Mar 2025 10:32 AM (IST)

    27 Mar 2025 10:32 AM (IST)

    देशमुख हत्या प्रकरणात तीन जणांची गुन्ह्याची कबुली

    बीड हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण केल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

  • 27 Mar 2025 10:29 AM (IST)

    27 Mar 2025 10:29 AM (IST)

    ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश

    विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

  • 27 Mar 2025 10:28 AM (IST)

    27 Mar 2025 10:28 AM (IST)

    धनंजय मुंडेंना सहआरोपी करा - मनोज जरांगे

    बीड हत्या प्रकरणावरुन राज्यामध्ये वातावरण तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी पडली असून पुढची तारीख 10 एप्रिल सांगितली आहे. या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

  • 27 Mar 2025 10:26 AM (IST)

    27 Mar 2025 10:26 AM (IST)

    यवतमाळच्या प्राध्यापकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

    वतमाळच्या एका प्राध्यापकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यवतमाळ शहरातील लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालात संबंधित प्राध्यापक सेवेत होते. त्यांनी धामणगाव रेल्वे येथे मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास घडली.

  • 27 Mar 2025 10:25 AM (IST)

    27 Mar 2025 10:25 AM (IST)

    शिवरायांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना

    राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे राहुरी शहरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त शिवप्रेमींनी यातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नगर-मनमाड रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको केला.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 27 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • daily news
  • Mararthi news
  • political news

संबंधित बातम्या

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार
1

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
2

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.