OPPO F29 5G (फोटो सौजन्य- पिंटरेस्ट)
काही दिवसांपूर्वी, ओप्पोने भारतात ओप्पो OPPO F29 5G स्मार्टफोन लाँच केला. या फोनची विक्री आज पासून लाईव्ह झाली सुरू झाली आहे. पहिल्या सेलच्या दरम्यान ग्राहक सवलती आणि ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
OPPO F29 स्मार्टफोनची पहिली सेल लाईव्ह सुरू झाली आहे. पहिल्या सेल दरम्यान, ऑफरसह तुम्ही हा फोन ११,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह खरेदी करू शकता. हा ओप्पो फोन अफोर्डेबल किमतीत उत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत. हा ओप्पो फोन वॉटरप्रूफ डिझाइनसह येतो. या फोनची वैशिष्ट्ये काय आहे वाचूयात.
विक्री ऑफर काय आहे?
OPPO F29 5G स्मार्टफोन भारतात २३९९९रु. पासून सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.
किंवा तुम्ही हा फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. ए
सबीआय आणि अॅक्सिस बँक कार्डवर १०% सूट आहे.
जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला २००० रुपयांची बोनस सूट मिळेल.
हा फोन ६ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयवर मिळू शकतो.
यासोबतच फ्लिपकार्ट वर ६ महिन्यासाठी लिक्विड डैमेज प्रोटेक्शन मिळू शकतो.
हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये येतो.
८ जीबी + १२८ जीबी – २३,९९९ रुपये
८ जीबी + २५६ जीबी – २६,९९९ रुपये
Oppo F29 5Gचे स्पेसिफिकेशन
OPPO F29 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. त्याचा टच सॅम्पलिंग रेट २४० हर्ट्झ आहे आणि पीक ब्राइटनेस १२०० निट्स आहे. या ओप्पो फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७आय ने संरक्षित आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेटसह येतो. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित ColorOS 15.0 वर चालतो.
OPPO F29 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये पोर्ट्रेट, नाईट, प्रो, पॅनोरामा, स्लो-मो, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ, टाइम लॅप्स, स्टिकर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.
Oppo F29 5G स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे. जे ४५W सुपरव्हीओसी चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.