Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबईतील सफाईसाठी टँकरच्या वापराबाबतही शेलार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'मला याबाबत माहिती नाही. मुंबई महापालिका याबाबत स्पष्टीकरण देईल. मात्र, वायफळ खर्च होऊ नये. असा खर्च होणार नाही. रस्ते सफाई करणे आवश्यक आहे'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2026 | 01:40 PM
'राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार'; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची मोठी घोषणा

'राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार'; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची बिकट परिस्थिती आहे. शेतकरी, विद्यार्थी, जनावरे यांच्यासोबत लोककलावंतही या परिस्थितीत भरडला जाऊ नये. आपली संस्कृती जतन करणाऱ्या लोककलावंतांना मदत मिळावी, यासाठी मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार आहे. लोककलावंतांना जास्तीत जास्त संधी मिळावी आणि त्यांना मेहनताना मिळावा, यासाठी तालुकास्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

आशिष शेलार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा आवश्यक ते कार्यक्रम घेण्यात येतील. काही कार्यक्रम स्थगित करून पुढील वर्षी घेण्यात येतील. यासाठीचा २५ कोटी रुपयांचा निधी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून बारव संवर्धनासाठी वापरण्यात येईल. बारव संवर्धनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईतील सफाईसाठी टँकरच्या वापराबाबतही शेलार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला याबाबत माहिती नाही. मुंबई महापालिका याबाबत स्पष्टीकरण देईल. मात्र, वायफळ खर्च होऊ नये. असा खर्च होणार नाही. रस्ते सफाई करणे आवश्यक आहे’.

विरोधक राजकीय हेतूने मोर्चे काढत आहेत

इंडिया आघाडीच्या मोर्चाबाबतही आशिष शेलार यांनी विधान केले. ‘विरोधक राजकीय हेतूने मोर्चे काढत आहेत. खऱ्या मतदारांना वंचित ठेवण्याची त्यांची भूमिका दिसत आहे. त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी किती बीएलए (BLA) नेमले आहेत, हे सांगावे. ते निवडणूक आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. हे म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असे म्हणता येईल’.

आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसोबत

आदिवासी विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. त्यावर शेलार यांनी आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसोबत आहोत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांना काँग्रेस कार्यालयात का डांबून ठेवले, याचे उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी द्यावे, असा सवाल उपस्थित केला.

Web Title: Large scale ceremonies and festivals in the state to be curtailed decision by the cultural affairs minister ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • agricultural minister
  • Ashish Shelar
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
1

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…
2

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
3

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
4

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.