Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा २००० रुपये मिळतात. या योजनेचा २१ वा हप्ता आज वितरीत केला जाणार आहे. जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान योजनेत नोंदणीकृत असाल तर आज जारी केला जाईल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 11:35 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 19 Nov 2025 11:35 AM (IST)

    19 Nov 2025 11:35 AM (IST)

    भारतमातेच्या अमर योद्ध्या राणी लक्ष्मीबाई...; PM मोदींची पोस्ट

    भारतमातेच्या अमर योद्ध्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाईतील त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची कहाणी आजही आपल्या देशवासीयांना उत्साह आणि उत्साहाने भरून टाकते. एक कृतज्ञ राष्ट्र आपल्या मातृभूमीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांचे बलिदान आणि संघर्ष कधीही विसरू शकत नाही.

  • 19 Nov 2025 11:25 AM (IST)

    19 Nov 2025 11:25 AM (IST)

    इंदिरा गांधी जयंतीदिनी राहुल गांधींची खास पोस्ट

    देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, माझ्या आजीने मला भारतासाठी निर्भयपणे निर्णय घेण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्याची प्रेरणा दिली. तिचे धाडस, देशभक्ती आणि नैतिकता मला अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देत राहते, असे राहुल गांधी यांनी लिहिले आहे.

     

  • 19 Nov 2025 11:15 AM (IST)

    19 Nov 2025 11:15 AM (IST)

    मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईचा भाजप प्रवेश, मनसेला रामराम

    मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई अर्थात अभिनेता रमेश परदेशी याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पिट्या भाईचे कान टोचले होते. यानंतर त्याने मनसेला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • 19 Nov 2025 11:06 AM (IST)

    19 Nov 2025 11:06 AM (IST)

    शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण राणी लक्ष्मीबाईंची जयंती

    राणी लक्ष्मीबाई या भारताच्या इतिहासामध्ये एक शक्तीशाली स्त्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाले. राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्वाश्रमीचे नाव मणिकर्णिका होते. मोरोपंत तांबे आणि भागिरथी यांच्या पोटी राणी त्यांनी जन्म घेतला. 12 वर्षांची असताना त्यांचे लग्न झाशीचे राजे गंगाधर राव यांच्याशी झाले आणि त्या राणी लक्ष्मीबाई झाल्या. शस्त्रधुरंधर आणि युद्धकलानिपुण अशा लक्ष्मीबाईंनी स्वदेशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली.

  • 19 Nov 2025 10:55 AM (IST)

    19 Nov 2025 10:55 AM (IST)

    मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, राक्षसी कृत्य

    नाशिक मध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात असल्याचे समोर आले आहे. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी लोक करत आहेत. तसेच शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केले गेले आहे. या घटनेबाबत आता अनेक मराठी सेलिब्रेटी आपला संताप व्यक्त करत आहेत. आता अश्यातच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे.

  • 19 Nov 2025 10:45 AM (IST)

    19 Nov 2025 10:45 AM (IST)

    जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट

    जपानच्या (Japan) दक्षिण-पश्चिम क्यूश प्रेदशात साकुराजिमा जाव्लामुखीचा भीषण विस्फोट झाला आहे. १६ नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा तीव्र उद्रेक झाला असून यामुळे हवेत राखेचे आणि धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहे. ज्वालामुखीपासून ४.४०० मीटर उंचीवरपर्यंत स्फोट झाला आहे. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे.

  • 19 Nov 2025 10:35 AM (IST)

    19 Nov 2025 10:35 AM (IST)

    मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

    मोफत मासिक रेशन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या २.२५ कोटी लोकांची नावे केंद्र सरकारने रेशन कार्डमधून काढून टाकली आहेत. नावे काढण्यात आलेले लोक या योजनेसाठी अपात्र होते. या योजनेअंतर्गत दरमहा गरिबांना ५ किलो मोफत अन्नधान्य मिळते. तथापि, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत अनेक अपात्र लोक ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, मासिक उत्पन्न मर्यादा ओलांडतात किंवा कंपन्यांचे संचालक आहेत यांचा या यादीत समावेश असल्याचे आढळून आले. अशा सुमारे २.२५ कोटी अपात्र लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली.

  • 19 Nov 2025 10:25 AM (IST)

    19 Nov 2025 10:25 AM (IST)

    दा तुमच्या भावाला गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

    या यादीमध्ये पहिला स्मार्टफोन सॅमसंगचा आहे, ज्याची किंमत सध्या 12,499 रुपये आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. वीवोच्या या फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि यामध्ये 6.68-इंच IPS LCD डिस्प्ले आहे. हे डिव्हाईस 1000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.या यादीमधील चौथा स्मार्टफोन IQOO कंपनी चा आहे, हा स्मार्टफोन सध्या बाजारात 13,998 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक 7300 चिपसेट आणि 6,500 ची मोठी बॅटरी आहे.

  • 19 Nov 2025 10:19 AM (IST)

    19 Nov 2025 10:19 AM (IST)

    स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

    नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी ती जात होती. मात्र त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या आहे की हत्या असे संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त नातेवाईक रात्री पोलीस ठाण्यात जमले होते. विविध संघटनाच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

  • 19 Nov 2025 09:59 AM (IST)

    19 Nov 2025 09:59 AM (IST)

    Free Fire Max मध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट

    Free Fire Unleash Wargreymon Event: फ्री फायर मॅक्समध्ये X DIGIMON ने कोलॅब्रेशन केल्यानंतर गेममध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईनवाल्या जबरदस्त वेपन स्किन उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय गेममध्ये स्पेशल ग्रेनेड देखील पाहायला मिळत आहे. या कोलॅब्रेशननंतर गेममध्ये एक नवीन ईव्हेंट देखील लाईव्ह झाला आहे. गेममधील या ईव्हेंटचे नाव Unleash Wargreymon असं आहे. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल आणि लक रॉयल वाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय गेमिंग ईव्हेंटमध्ये स्पेशल ग्रेनेड आणि टी-शर्ट देखील मिळत आहे.

  • 19 Nov 2025 09:55 AM (IST)

    19 Nov 2025 09:55 AM (IST)

    आईला पाहून फरहाना भट्ट भावुक

    बिग बॉस १९ या रिॲलिटी शोमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य प्रत्येक स्पर्धकाला एक-एक करून भेट देत आहेत. नवीन प्रोमोमध्ये फरहाना भट्टची आई तिला भेटण्यासाठी आलेली दिसत आहे. तिच्या आईला भेटल्यानंतर फरहानाला अश्रू अनावर झालेले दिसले. सर्व स्पर्धकांमध्ये तक्रारी आणि मजा-मस्तीची झालेली दिसली. सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आहे. नेहमी भांडणाऱ्या फरहानाला रडताना पाहून चाहते देखील चकीत होताना दिसले आहेत. या व्हिडीओवर कंमेंटचा वर्षाव सुरु आहे.

  • 19 Nov 2025 09:45 AM (IST)

    19 Nov 2025 09:45 AM (IST)

    प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीवर प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कदायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि बळजबरीने गर्भपात देखील घडवून आणले. आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 19 Nov 2025 09:35 AM (IST)

    19 Nov 2025 09:35 AM (IST)

    व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार

    US-Saudi nuclear deal : अमेरिका (America) आणि सौदी अरेबियामधील(Saudi Arabia) दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांना नवा ऐतिहासिक टप्पा गाठत मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये एक महत्त्वपूर्ण बहुआयामी करार करण्यात आला. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान नागरी अणुऊर्जा सहकार्य आणि अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानांच्या विक्रीसह संरक्षण क्षेत्रातील मोठे निर्णय अंतिम करण्यात आले.

  • 19 Nov 2025 09:25 AM (IST)

    19 Nov 2025 09:25 AM (IST)

    राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदलीचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता १० वी आणि १२ वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिगुण कुलकर्णी हे सध्या पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदाच्या उपमहासंचालक पदावर कार्यरत होते.

  • 19 Nov 2025 09:15 AM (IST)

    19 Nov 2025 09:15 AM (IST)

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

    नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, सरकार देशातील अन्न पुरवठादारांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्वतंत्र योजनांचा समावेश आहे. त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फायद्याची ठरत आहे. आता याच योजनेचा 21 वा हफ्ता आज वितरीत केला जाणार आहे.

  • 19 Nov 2025 09:05 AM (IST)

    19 Nov 2025 09:05 AM (IST)

    अमेरिकेकडून भारतीय कृषी उत्पादनांना मोठा दिलासा; 50% परस्पर कर रद्द, ₹9,000 कोटींच्या निर्यातीला फायदा

    अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवरील 50 टक्के परस्पर कर रद्द केल्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॉफी, चहा, मसाले, उष्णकटिबंधीय फळे आणि फळांचे रस यांसारख्या प्रमुख उत्पादने यामध्ये समाविष्ट असून सुमारे 1 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹9,000 कोटी) किमतीच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होणार आहे.व्हाईट हाऊसने हा निर्णय कार्यकारी आदेशाद्वारे 12 नोव्हेंबर रोजी जाहीर केला, आणि 13 नोव्हेंबरपासून तो लागूही झाला. रशियन तेल खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला होता. मात्र अमेरिकेत अन्नपदार्थांच्या सतत वाढत्या किमतींमुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

  • 19 Nov 2025 09:04 AM (IST)

    19 Nov 2025 09:04 AM (IST)

    राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी आयएएस त्रिगुण कुलकर्णी

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) अध्यक्षपदी पहिल्यांदाच एखाद्या सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यशदा येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांची राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजातील अनुभव लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली असून, राज्य मंडळाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • 19 Nov 2025 09:00 AM (IST)

    19 Nov 2025 09:00 AM (IST)

    गाढवाच्या दुधाचा साबण परदेशात लोकप्रिय; त्वचेसाठी गुणकारी घटकांमुळे वाढते मागणी

    अरब अमिरातीसह अनेक देशांमध्ये गाढवाच्या दुधापासून बनवलेला साबण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. दुबईसारख्या बाजारपेठांमध्ये या साबणाचे प्रीमियम ब्रँड्स उपलब्ध असून त्याची मागणी सतत वाढत आहे.गाढविणीच्या दुधात भरपूर प्रमाणात खनिजे आणि प्रथिने आढळतात. ही घटक त्वचेला पोषण देतात, त्वचा मऊ आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    या दुधात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाणही अधिक असते. अँटिऑक्सिडंट्स त्वचेवर होणाऱ्या बाह्य हानिकारक परिणामांपासून संरक्षण देतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळेच सौंदर्यप्रसाधनांच्या प्रीमियम श्रेणीत गाढवाच्या दुधाच्या साबणाची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे.

  • 19 Nov 2025 08:57 AM (IST)

    19 Nov 2025 08:57 AM (IST)

    तुकडेबंदी कायद्यातील उल्लंघन केलेले जमीन व्यवहार आता नियमित 

    तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमीन व्यवहारांना आता निःशुल्क आणि कायदेशीर स्वरूप देण्यासाठी महसूल विभागाने महत्वाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 60 लाख कुटुंबांना आणि एकूण 3 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या छोट्या भूखंडांच्या व्यवहारांना कायदेशीरतेचा मार्ग मोकळा झाल्याने लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

  • 19 Nov 2025 08:55 AM (IST)

    19 Nov 2025 08:55 AM (IST)

    भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 388 अंकांनी उंचावला, निफ्टीतही मजबुती

    भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता बळावत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी उत्साह दाखवला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सच्या भक्कम वाढीमुळे निर्देशांकांनी उंच भरारी घेतली.

    सोमवारी सेन्सेक्स 388 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 84,950.95 अंकांवर बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 30 शेअरच्या मुख्य निर्देशांकाने दिवसअखेर मजबुती कायम राखली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टी 50 मध्येही सकारात्मक वातावरण दिसले. निफ्टीमध्ये 103 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 0.40 टक्क्यांनी वधारत 26,013.45 अंकांवर बंद झाला. व्यापार करारासंबंधित सकारात्मक संकेत आणि बँक व ऑटो क्षेत्रातील मजबूत खरेदी यामुळे बाजारात तेजीचे वारे वाहत राहिले.

  • 19 Nov 2025 08:50 AM (IST)

    19 Nov 2025 08:50 AM (IST)

    पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘पिट्या भाई’ रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला असताना प्रत्येक पक्षात फेरबदल आणि अंतर्गत हालचाली वेगाने सुरू आहेत. अशात पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता रमेश परदेशी, उर्फ ‘पिट्या भाई’, यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) राजीनामा देत अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. परदेशी हे मनसेच्या स्थानिक संघटनांमध्ये सक्रिय होते आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता हा पक्षासाठी मोठा धोका मानला जात आहे. रमेश परदेशी यांच्यासह पुण्यातील मनसेचे अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे पुण्यात मनसेची संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

  • 19 Nov 2025 08:44 AM (IST)

    19 Nov 2025 08:44 AM (IST)

    शिवसेनेचा भाजपवर फोडाफोडीचा आरोप

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू असलेल्या कथित फोडाफोडीमुळे एकनाथ शिंदे गटात तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. ही नाराजी मंगळवारी चांगलीच वाढली आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

    यासंदर्भात शिंदे गटाचे सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. शिंदे गटाचे म्हणणे आहे की, राज्यातील विविध ठिकाणी भाजपकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या विरोधात नवीन नेतृत्व उभे करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 19 Nov 2025 08:40 AM (IST)

    19 Nov 2025 08:40 AM (IST)

    चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या

    भारतात 19 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,365 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,334 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,273 रुपये आहे. भारतात 19 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,730 रुपये आहे. भारतात 19 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 161.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,61,900 रुपये आहे.

  • 19 Nov 2025 08:37 AM (IST)

    19 Nov 2025 08:37 AM (IST)

    ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’

     महाराष्ट्रातील ताम्हिणी घाटात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ या ‘वटवट्या’ कुळातील दुर्मिळ मादी पक्ष्याचे दर्शन झाल्याची नोंद झाली आहे. १० नोव्हेंबर रोजी टिपलेली ही नोंद महत्त्वाची ठरली आहे. देशात या प्रजातीची ही केवळ दुसरी नोंद आहे . यापूर्वी २०२१ मध्ये केरळच्या मुन्नार येथे या नर पक्ष्याचे दर्शन झाले होते.

    ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ हा प्रवासी स्थलांतरित पक्षी असून तो प्रामुख्याने युरोपमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिण युरोप तसेच आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. त्यामुळे ताम्हिणी परिसरात दिसलेली ही मादी भरकटून भारताच्या दिशेने आली असावी, असा अंदाज पक्षी निरीक्षक आणि पक्षी तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Marathi Breaking news live updates- केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, सरकार देशातील अन्न पुरवठादारांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या स्वतंत्र योजनांचा समावेश आहे. त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही फायद्याची ठरत आहे. आता याच योजनेचा 21 वा हफ्ता आज वितरीत केला जाणार आहे.

 

 

 

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports entertainment business weather reports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live:  मक्का मदीना मार्गावर भीषण अपघात; ४२ भारतीयांच्या मृत्यूची शक्यता
1

Top Marathi News Today Live: मक्का मदीना मार्गावर भीषण अपघात; ४२ भारतीयांच्या मृत्यूची शक्यता

Top Marathi News Today Live: राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या घरी देवीचे आगमन! मुलीला दिला जन्म
2

Top Marathi News Today Live: राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या घरी देवीचे आगमन! मुलीला दिला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.