Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न;

Marathi breaking live marathi headlines- अलीकडच्या काळात अनेक राजकारणी आणि उद्योगपतींना हनी ट्रॅप रॅकेटचा फटका बसला आहे. त्यात आता आमदार शिवाजी पाटील यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 10, 2025 | 07:03 PM
Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news updates: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी महिलेचे विविध क्रमांकांवरून संदेश आणि आक्षेपार्ह फोटो येत होते. त्यानंतर त्या महिलेनं त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पाटील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. हा प्रकार ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याचे समजते. चितळसर पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे.

 

 

 

The liveblog has ended.
  • 10 Oct 2025 07:02 PM (IST)

    10 Oct 2025 07:02 PM (IST)

    Mumbai News : आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?

    मुंबईत कोस्टल रोड बांधल्यानंतरही वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची वाहतूक आणि कोंडी कमी झालेली नाही. या समस्येवर उपाय म्हणून, अंदाजे २४,००० कोटी रुपये खर्चाचा या दोघांना जोडणारा एक भूमिगत रस्ता बांधला जाईल. हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बांधणार आहे. प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी प्रारंभिक निविदा जाहीर केली आहे.

  • 10 Oct 2025 06:33 PM (IST)

    10 Oct 2025 06:33 PM (IST)

    5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

     

    भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच अनेक वाहनं विकली जातात. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. आजही एखादा वाहन खरेदीदार खरेदी करताना टाटाच्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतो. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत कंपनी देखील माकेटमध्ये नवनवीन कार ऑफर करत असते.ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच अनेक वाहनं विकली जातात. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. आजही एखादा वाहन खरेदीदार खरेदी करताना टाटाच्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतो. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत कंपनी देखील माकेटमध्ये नवनवीन कार ऑफर करत असते.

  • 10 Oct 2025 06:18 PM (IST)

    10 Oct 2025 06:18 PM (IST)

    Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

    परिसरात छट पूजा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून, यादरम्यान महापालिकेकडून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच उत्सवादरम्यान शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे.

  • 10 Oct 2025 06:06 PM (IST)

    10 Oct 2025 06:06 PM (IST)

    मला मस्जिद सांगा…ही नसबंदीवाली पिलावळ; वारीस पठाण अन् नितेश राणे यांच्यात जोरदार जुंपली

    Nitesh Rane vs Waris Pathan : अहिल्यानगर : एआयएमआयएम पक्षाची अहिल्यानगरमध्ये सभा झाली. यामधील पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन औवेसी यांच्यासह महिला नेत्या रुहीनाज शेख आणि वारीस पठाण यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. वारीस पठाण यांनी अहिल्यानगरमधील सभेमध्ये चितावनीखोर भाषण दिले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी डिवचले. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • 10 Oct 2025 05:46 PM (IST)

    10 Oct 2025 05:46 PM (IST)

    Bihar Politics: नितीश कुमारांचा झाला गेम; निवडणुकीआधीच ‘या’ नेत्यांचा RJD मध्ये प्रवेश

    Nitish Kumar: बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा बिहारमध्ये एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढाई होणार आहे. मात्र विधानसभा निवडणूक होण्याआधीच नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली आहे.

  • 10 Oct 2025 05:37 PM (IST)

    10 Oct 2025 05:37 PM (IST)

    नवज्योत सिंग सिद्धू राजकारणात ‘कमबॅक’ करणार?

    क्रिकेटच्या मैदानावरचा उत्साह, राजकारणाच्या रस्त्यांवरचा संघर्ष आणि टेलिव्हिजनच्या जगातला हास्याचा आवाज नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजकारणात पुनरागमनाच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. कारण पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू प्रियांका गांधींना भेटण्यासाठी अचानक दिल्लीत पोहोचले.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 10 Oct 2025 05:21 PM (IST)

    10 Oct 2025 05:21 PM (IST)

    स्मार्ट वीज मीटरवरुन म्हसवडकर झाले हैराण

    म्हसवड पालिका हद्दीतील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी वीज वितरणाचे अधिकारी आणि ठेकेदार संगणमत करुन सक्तीचे स्मार्ट वीज मीटरची जोडणी करत असून याला विरोध करणाऱ्या वीज ग्राहकाला दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

  • 10 Oct 2025 05:05 PM (IST)

    10 Oct 2025 05:05 PM (IST)

    पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची भावनिक हेळसांड,भरती नाही काढली तर... विद्यार्थी आक्रमक

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे आश्वासन होऊनही राज्यात १५,६३१ पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया दोन महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवर रखडली आहे. दरवर्षी १८ ते २० लाख अर्ज येणाऱ्या या भरतीसाठी तयारी करणाऱ्या १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य यामुळे धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने, त्यापूर्वी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

  • 10 Oct 2025 05:03 PM (IST)

    10 Oct 2025 05:03 PM (IST)

    गुंतवणूकदारांचा कल रिअल इस्टेटकडे; 2025 मध्ये येणार 75,000 कोटींची भांडवली लाट

    भारतातील रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ सुरूच आहे. CBRE दक्षिण आशियाच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत रिअल इस्टेट गुंतवणुकीत ४८% वाढ झाली. या तिमाहीत एकूण गुंतवणूक $३.८ अब्ज (अंदाजे रु. २८,५०० कोटी) पर्यंत पोहोचली. मागील तिमाहीपेक्षा (२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत) ही गुंतवणूक $२.६ अब्ज होती, त्यापेक्षा ही लक्षणीयरीत्या जास्त आहे. जमीन आणि विकास स्थळांवरील वाढत्या क्रियाकलापांमुळे आणि रेडी-टू-मूव्ह ऑफिस आणि रिटेल प्रॉपर्टीजच्या वाढत्या मागणीमुळे ही तीव्र वाढ झाली आहे.

  • 10 Oct 2025 05:00 PM (IST)

    10 Oct 2025 05:00 PM (IST)

    जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कार्यालयापर्यंत सायकलने प्रवास

    कोल्हापूरात आज जिल्हा प्रशासनाकडून आज ग्रीन डे साजरा केला जातोय..या उपक्रमा अंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी आपल्या घरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी सायकलचा वापर केला.. ग्रीन डे आणि अर्थ मिनिट या उपक्रमाच्या माध्यमातून आज दिवसभरात कमीत कमी इंधन मोबाईल चा वापर केला जाणार आहे.. विशेष म्हणजे आज दिवसभरात होणाऱ्या वेगवेगळ्या बैठकांना जाण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक बाइकचा देखील वापर केलायं..

  • 10 Oct 2025 04:55 PM (IST)

    10 Oct 2025 04:55 PM (IST)

    सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी

    लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे , कर्जमाफी वरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान केले आहे... आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो... निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते... राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना वक्तव्य केले आहे...

  • 10 Oct 2025 04:50 PM (IST)

    10 Oct 2025 04:50 PM (IST)

    भिवंडीत गुणवंत शिक्षकांचा गौरव समारंभ ,खासदार सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

    भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव समारंभ Bhivandi में आयोजित झाला. खासदार सुरेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील 900 शिक्षकांपैकी 10 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. यासाठी तीन शासकीय शाळा, तीन खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आणि जिल्हा परिषद देवरुंग शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. या गौरवयोग्य क्षणांना स्थानिक शिक्षणप्रामाणिकता व संस्थात्मक उत्तम कार्याला मान्यता मिळाली आहे.

  • 10 Oct 2025 04:45 PM (IST)

    10 Oct 2025 04:45 PM (IST)

    रस्त्या दुरुस्तीच्या मागणीसाठी कासेगाव ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

    पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आज ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी घोषणा देत अधिकाऱ्यांचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. टाकळी बायपास ते अनवली रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी कासेगाव अनवली टाकळी या गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रस्त्यातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.

  • 10 Oct 2025 04:40 PM (IST)

    10 Oct 2025 04:40 PM (IST)

    दहा लाखांच मागणी, ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सहयोगी आमदार शिवाजी पाटील यांच्यावर हनी ट्रॅपचा प्रयत्न झाला..शिवाजी पाटील यांना मोबाईल द्वारे अश्लील मँसेज व फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आलायं..शिवाय एका महिलेनं आमदार पाटील यांच्या कडे दहा लाखांच मागणी केलीये.. त्यामुळे या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात संबंधित महिले विरोधात गुन्हा दाखल केलायं..दरम्यान हा प्रकार हनी ट्रॅप नसून मी त्या व्यक्तीला पाहिलं नसल्याच आमदार शिवाजी पाटील यांनी म्हटलंय..या संबंधित मी तक्रार दाखल केली असून पोलिस योग्य ती कारवाई करतील कसही पाटील यांनी स्पष्ट केलंय.

  • 10 Oct 2025 04:35 PM (IST)

    10 Oct 2025 04:35 PM (IST)

    अन्यथा हिवाळी अधिवेशनात नागपूरवर महाराष्ट्रातील समाज धडकणार

    महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने आज दि. 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला एकाच वेळी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे परीट-धोबी समाजाच्या दीर्घकालीन व प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सरकारने अनेक वर्षे परीट-धोबी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय न घेतल्यास दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील परीट-धोबी समाजाच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार…

  • 10 Oct 2025 04:30 PM (IST)

    10 Oct 2025 04:30 PM (IST)

    ड्रग्ज तस्करी प्रकरण, कल्याण पोलिसांनी 13 जणांना अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई

    एक महत्त्वपूर्ण क्रिमिनल ब्रेकिंग न्यूज: कल्यानमधील ड्रग्ज रॅकेट उध्वस्त झाला; ड्रग्ज पेडलरच्या जाळ्यातून संपूर्ण नेटवर्क उघडकीस आलं. कल्यान पोलीसांनी 13 जणांना अटक केली असून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपींच्या यादीत महिला प्रवर्तकही आहेत. या घडनेने ठाणे जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पहिल्या वेळी मोक्का लागू केला गेला असल्याचा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

  • 10 Oct 2025 04:27 PM (IST)

    10 Oct 2025 04:27 PM (IST)

    'समाजामध्ये दुही निर्माण करण्याच्या पापाचे धनी कोण?'

    माझी त्यांना विनंती आहे, हे सर्व गैरसमजातून घडत आहे.. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयर ची प्रक्रिया सुरू आहे.. ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही.. हे पाप शरद पवार मुख्यमंत्री असताना केलं आहे.. त्यावेळी मराठा समाज समाविष्ट केला असता तर हा विषयच राहिला नसता.. या पापाचे धनी शरद पवार आहेत.. मोर्चेकऱ्यांनी आधी त्यांना सवाल विचारला पाहिजे.

  • 10 Oct 2025 03:57 PM (IST)

    10 Oct 2025 03:57 PM (IST)

    तब्बल 184000 रुपये पगार ! SEBI ची ऑफिसर ग्रेड-ए पदांसाठी भरतीची घोषणा

    सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी असून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( SEBI) ने ऑफिसर ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी भरतीची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.

  • 10 Oct 2025 03:46 PM (IST)

    10 Oct 2025 03:46 PM (IST)

    ६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी राज कुंद्राचे स्पष्टीकरण

    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका व्यावसायिकाशी संबंधित ₹६० कोटी (अंदाजे $१.६ अब्ज) फसवणुकीच्या प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती यांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत शिल्पाचा पती राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

  • 10 Oct 2025 03:37 PM (IST)

    10 Oct 2025 03:37 PM (IST)

    KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील

    पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये एका प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

  • 10 Oct 2025 03:25 PM (IST)

    10 Oct 2025 03:25 PM (IST)

    पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

    पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये एका प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

  • 10 Oct 2025 03:18 PM (IST)

    10 Oct 2025 03:18 PM (IST)

    तालिबान राजवटीसोबत संबंध सुधारणार, भारत काबूलमधील दूतावास पुन्हा सुरू करणार

    India's Embassy in Kabul: अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर भारतात आले आहेत. शुक्रवारी (आज) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर भर देण्यात आला.

  • 10 Oct 2025 03:08 PM (IST)

    10 Oct 2025 03:08 PM (IST)

    जेसीबीच्या धक्क्याने पाईपलाईन फुटली अन्…; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते जलमय

    बोईसर–तारापूर औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) पाणीपुरवठा करणारी प्रमुख पाईपलाईन आज दुपारी चिल्लर–बोईसर रस्त्यावरील मान परिसरात जेसीबीच्या धक्क्याने फुटली.

  • 10 Oct 2025 02:56 PM (IST)

    10 Oct 2025 02:56 PM (IST)

    Russia Ukraine War: नुसता धूर अन् जाळ! रशियाने युक्रेनचे कंबरडेच मोडले, थेट Energy केंद्रच...

    World News: गेल्या काही वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. अजून किती काळ हा संघर्ष सुरू राहणार याचे उत्तर रशिया व युक्रेनकडे देखील नसल्याचे म्हटले जात आहे. रशियाने अनेक मोठे हल्ले युक्रेनवर केले आहेत. आतासुद्धा रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर हल्ला केला आहे. युक्रेनचे यामध्ये मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे. जगातील अनेक देश या युद्धामुळे चिंतेत आहेत.

  • 10 Oct 2025 02:45 PM (IST)

    10 Oct 2025 02:45 PM (IST)

    तारक मेहता…’मध्ये चार वर्षांनी पुन्हा एकदा होणार ‘या’ कॅरेक्टरची एन्ट्री?,

    सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये ‘सोढी’ची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेले ४ वर्ष अभिनयापासून दूर आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाले होता. कोरोना महामारीनंतर, सुमारे ३ वर्षांपूर्वी, गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. तो दिल्लीहून मुंबईला निघाला होतो, पण मधेच गायब झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर, तो स्वतः घरी परतला. ही बातमी येताच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा झाली. पण त्यावेळी त्यांने सांगितलं की त्याला आर्थिक अडचणी होत्या. त्याने हेही मान्य केलं की, अभिनय सोडल्यानंतर त्याच्या खाजगी आयुष्यात अनेक अडथळे आले. त्यामुळेच ते काही काळ सगळ्यांपासून दूर राहिला.

  • 10 Oct 2025 02:40 PM (IST)

    10 Oct 2025 02:40 PM (IST)

    चिराग पासवान का वाढवत आहेत जागा वाटपाचा गुंता?

    Bihar Elections 2025 : बिहार : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असला तरी भाजपची रणनीती अद्याप ठरलेली नाही. निवडणुकीच्या दृष्टीने एनडीएकडून कोणताही पत्ता उलघडण्यात न आल्यामुळे चर्चांना उधाण आले. जनशक्ति पार्टी रामविलासचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानण्यात येणारे चिराग पासवान यांनी भाजपचा ताण वाढवला आहे. चिराग पासवान हे त्यांच्या मागण्यापासून मागे हटत नसून यामुळे एनडीएचा जागावाटपचा गुंता वाढत चालला आहे.

  • 10 Oct 2025 02:30 PM (IST)

    10 Oct 2025 02:30 PM (IST)

    दिवाळीच्या पाच दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचं खास महत्त्व

    दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. “दीपावली” हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “प्रकाशाच्या रांगा” असा होतो. पंचांगानुसार दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण अंधारावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दिवाळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरका चतुर्दशी, लक्ष्मी पूजा, बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज हे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसाला स्वतःचे असे महत्त्व आणि अर्थ आहेत. जाणून घ्या

  • 10 Oct 2025 02:25 PM (IST)

    10 Oct 2025 02:25 PM (IST)

    ‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी

    एकता कपूरच्या “सास भी कभी बहू थी” या मालिकेत मुकेश भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. मुकेश जे. भारती आणि त्यांची पत्नी, चित्रपट निर्माते आणि विवेक फिल्म प्रोडक्शन हाऊसचे मालक मंजू मुकेश भारती हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे शूटिंग करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याचे समजले आहे. या जोडप्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला कुख्यात रवी पुजारी टोळीचा सदस्य म्हणून सांगितले. या जोडप्याने पोलिस आयुक्त जे. रवींदर गौर यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या टोळीने यापूर्वी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सना धमक्या दिल्या आहेत आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

  • 10 Oct 2025 02:20 PM (IST)

    10 Oct 2025 02:20 PM (IST)

    एकीकडे बिल्डरकडून फसवणूक तर दुसरीकडे दिवसा ढवळ्या विजेची चोरी

    कर्जत/संतोष पेरणे : मुंबईमधील झोपडपट्टी हलवली जात असून कर्जत तालुक्यात नेरळ शेलू परिसरात मोठ्या प्रमाणावर चाळी बांधल्या जात आहेत. त्या चाळींमध्ये घर घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना स्थानिक पातळीवर बिल्डरकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.नेरळ परिसरातील अनेक चाळींमध्ये महावितरण कंपनीचे विजेचे मीटर नाहीत,मात्र त्या चाळींमध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू असून महावितरण कंपनीचे दुर्लक्ष की महावितरण कंपनीचं साटंलोटं  याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • 10 Oct 2025 02:13 PM (IST)

    10 Oct 2025 02:13 PM (IST)

    महिला झोपली अन् तोंडातून बाहेर आले नागराज

    Trending Viral Video: आपण रोज आपला दिवसभरातील काही वेळ सोशल मिडियावर देखील व्यतीत करत असतो. यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ किंवा रील्स बघायला मिळतात. ज्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्या पाहून आपण हसतो, कधी भावुक होतो तर कधी आपल्याला विचार देखील करायला लावतो. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • 10 Oct 2025 02:01 PM (IST)

    10 Oct 2025 02:01 PM (IST)

    MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका!

    MediaTek ने इंडियन मोबाईल काँग्रेस (IMC) 2025 दरम्यान स्मार्ट डिव्हाईसचं भविष्य आणखी मजबूत करण्यासाठी एक नवीन चिपसेट सादर केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे नवीन फ्लॅगशिप मोबाइल प्लेटफॉर्म MediaTek Dimensity 9500 लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने नेक्स्ट जनरेशनच्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. या नव्या चिपसेटमुळे आता स्मार्टफोनचा परफॉर्मंस आणखी सुधारणार आहे.

  • 10 Oct 2025 02:00 PM (IST)

    10 Oct 2025 02:00 PM (IST)

    शिवसेनेच्या वरिष्ठांनी धंगेकरांना समज द्यावी, नाहीतर…; भाजप नेत्याने दिला इशारा

    माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा खोडसाळपणा पुणेकरांना माहिती आहे. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते सुसंस्कृत असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला. तसेच शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या भाषेत त्यांना ठोकून काढू’, असं देखील घाटे म्हणाले आहेत.

  • 10 Oct 2025 01:55 PM (IST)

    10 Oct 2025 01:55 PM (IST)

    जयस्वालची यशस्वी खेळी, ठोकले शतक! साई सुदर्शनचे अर्धशतक, वाचा सविस्तर

    भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे. भारताच्या संघासाठी त्याने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे, शतक झळकावून तो अजूनही टीम इंडियासाठी फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये देखील यशस्वी जयस्वाल यांनी चांगली कामगिरी केली होती पण तो त्याची कामगिरी सातत्याने चांगले ठेवू शकला नव्हता. मागील सामन्यामध्ये त्याने चांगल्या दोन्हींनी मध्ये खेळी खेळल्या होत्या.

  • 10 Oct 2025 01:50 PM (IST)

    10 Oct 2025 01:50 PM (IST)

    इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम झाला तरी कसा? गाझा कराराच्या ‘खतरनाक’ अटी ट्रम्पच्या नावासह आल्या समोर

    आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आशियाच्या शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून हमास आणि इस्त्रालयमध्ये युद्ध सुरु असून यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता युद्धबंदीची तयारी पूर्ण करण्यात आली असून काही अटी-शर्तींसह ही युद्धबंदी केली जाणार आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने युद्धबंदीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित “संमती दस्तऐवज” समोर आला आहे. यामधील युद्धबंदीच्या अटी सांगण्यात आल्या आहेत.

  • 10 Oct 2025 01:45 PM (IST)

    10 Oct 2025 01:45 PM (IST)

    अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित

    सध्या मराठी चित्रपटांना चांगला दर्जा मिळत आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्यात अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे, आणि त्यापैकीच एक म्हणजे मनाचे श्लोक हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मना’चे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली होती.

  • 10 Oct 2025 01:25 PM (IST)

    10 Oct 2025 01:25 PM (IST)

    नोबेल शांतता पुरस्काराची आज घोषणा, डोनाल्ड ट्रम्पला मिळणार का?

    २०२५ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. या वर्षीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा आधीच झाली आहे. तथापि, आजच्या घोषणेकडे जगाचे लक्ष लागले आहे. खरं तर, २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार आज नॉर्वेमध्ये जाहीर केला जाईल. हा पुरस्कार विशेष असेल कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सत्तेवर आल्यापासून स्वतःसाठी शांतता पुरस्काराची मागणी केली आहे.

  • 10 Oct 2025 01:15 PM (IST)

    10 Oct 2025 01:15 PM (IST)

    सामन्यात झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉला मिळाले या संघात स्थान! वाचा सविस्तर

    रणजी ट्राॅफीचे सामने सुरु आहेत, या स्पर्धेच्या एका सामन्यात मुशीर खान आणि पृथ्वी शॉ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. नुकताच मुंबईचा माजी संघसहकारी मुशीर खानशी मैदानावर भांडण करून त्याला बॅट दाखवणारा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला शिक्षा झालेली नाही. तो महाराष्ट्रासाठी रणजी पदार्पण करण्यास सज्ज आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आगामी हंगामासाठी रणजी संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये शॉचा समावेश करण्यात आला आहे. या हंगामापूर्वीच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला.

  • 10 Oct 2025 01:10 PM (IST)

    10 Oct 2025 01:10 PM (IST)

    लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

    महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही नेहमी चर्चेत राहिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे विरोधकांनी अनेकदा टीकास्त्र डागले आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेले दीड हजार रुपये दिले जातात. यामधील अनेक घोटाळे देखील उघड झाले आहेत. त्याचबरोबर पात्र महिलांसाठी नियमावली देखील कडक करण्यात आली आहे.

  • 10 Oct 2025 01:05 PM (IST)

    10 Oct 2025 01:05 PM (IST)

    मराठ्यांनी वेगळं आरक्षण घ्याव- छगन भुजबळ

    मराठवाड्यात मागसवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी हा एक वर्ग आहे. ती जात नाही. त्यात २७४ जाती आहे. कोणत्या एखाद्या जातीसाठी आम्ही लढत नाही. EWS चे आरक्षण जेव्हा दिलं ते खास मराठा समाजासाठी दिलं होतं. आम्ही विरोध केलेला नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या- छगन भुजबळ

  • 10 Oct 2025 01:05 PM (IST)

    10 Oct 2025 01:05 PM (IST)

    काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार; काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. महाविकास आघाडीनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचाही आढावा बैठकांचा धडाका सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने नुकतीच उत्तर महाराष्ट्रात बैठक घेतली. या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10 Oct 2025 12:55 PM (IST)

    10 Oct 2025 12:55 PM (IST)

    माणिकराव कोकाटेंना 3 जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून निवड

     

    माणिकराव कोकाटे यांच्याकडे पक्षाकडून मोठी जबाबदारी, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे माणिकराव कोकाटे संपर्कमंत्री

  • 10 Oct 2025 12:45 PM (IST)

    10 Oct 2025 12:45 PM (IST)

    मनोज जरांगे सतत माझ्याबद्दल अपशब्द वापरतात – छगन भुजबळ

    मनोज जरांगे सातत्याने माझ्याबद्दल बोलतात. ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो. नाहीतर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचे काहीही घेणंदेणं नाही. आम्ही कोणालाही शिव्या शाप देत नाही. रस्त्यावर मारामारी करत नाही. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. आम्ही सरकारला सांगतोय की हे चुकीचं सुरु आहे हे सांगतोय, पण जर सरकार ऐकत नसेल तर मग आमच्यापुढे दुसरा पर्याय कोर्टाचा आहे. तिथे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहोत, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

  • 10 Oct 2025 12:35 PM (IST)

    10 Oct 2025 12:35 PM (IST)

    अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेले यवतमाळमधील दोन तालुके मदतीच्या यादीतून वगळले

    राज्य सरकारने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयात (GR) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांचा समावेश केलेला नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पीक आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊनही त्यांना मदत यादीतून वगळल्याने शेतकरी आणि स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारने तातडीने या त्रुटीची दखल घेऊन सर्वाधिक नुकसान झालेल्या महागाव आणि उमरखेड तालुक्यांचा समावेश मदत यादीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

  • 10 Oct 2025 12:29 PM (IST)

    10 Oct 2025 12:29 PM (IST)

    क्रिडामंत्री माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोकाटे यांची नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसतांना आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वतः नाशिकचे असून इच्छुक असतांनाही, पक्षाने नाशिकच्या संपर्कमंत्री पदासाठी कोकाटेंना पसंती दिली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश पक्षाकडून कोकाटे यांना देण्यात आले आहेत.

  • 10 Oct 2025 12:15 PM (IST)

    10 Oct 2025 12:15 PM (IST)

    साताऱ्यातील जवानाचा चंदीगडमध्ये मृत्यू

    पंजाबमधील चंदीगडमध्ये साताऱ्यातील जवानाचा कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. शहीद जवान यांचे पार्थिव विमानाने आज पहाटे पुण्यात दाखल झाले. रूग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह कराडला आणला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • 10 Oct 2025 12:05 PM (IST)

    10 Oct 2025 12:05 PM (IST)

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकी धाक दाखवत लाखो रुपये आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाच दरोडेखोर असल्याची माहिती संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगावमधील महामार्ग क्रमांक सहावर रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे.

  • 10 Oct 2025 12:00 PM (IST)

    10 Oct 2025 12:00 PM (IST)

    राज्यातील वाळू धोरणात मोठा बदल

    नवीन वाळू धोरणानुसार, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लिलाव धारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार आहे. राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल करण्यात आला आहे. तीन वर्षांतून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे. खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार आहे.

  • 10 Oct 2025 11:50 AM (IST)

    10 Oct 2025 11:50 AM (IST)

    अयोध्येतील स्फोटावर योगी आदित्यनाथांनी व्यक्त केला शोक

    उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील पगला भारी गावात गुरुवारी संध्याकाळी एका घरात झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन प्रौढांचा समावेश आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबांना सहानुभूती व्यक्त केली.

  • 10 Oct 2025 11:40 AM (IST)

    10 Oct 2025 11:40 AM (IST)

    फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवतात - संजय राऊत

    संजय राऊत यांनी कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली आहे, ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडली आहे. रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री असलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी जे घोटाळे, गुन्हे करून ठेवले आहेत. त्यांनी जे विषय मांडले. ही चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीने मंत्री जर काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

  • 10 Oct 2025 11:30 AM (IST)

    10 Oct 2025 11:30 AM (IST)

    लाडक्या बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता येण्यास सुरुवात

    सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्यापासून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची घोषणा केली. या घोषणेमुळे महिलांना आनंद होणार आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political crime sports national international entertainment socail business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: आज आयुष कोमकरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार
1

Top Marathi News Today: आज आयुष कोमकरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार

Top Marathi News Today : “… तर उद्धव ठाकरे नगण्य”; खासदार नारायण राणेंची सडकून टीका
2

Top Marathi News Today : “… तर उद्धव ठाकरे नगण्य”; खासदार नारायण राणेंची सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.