Maharashtra Breaking News
14 Oct 2025 12:35 PM (IST)
राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत, तसेच सरकारच्या योजना पोहोचण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
14 Oct 2025 12:25 PM (IST)
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश झाला.
14 Oct 2025 12:15 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी येणार आहेत. शिंदे हे उद्या साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी त्याचा दरे गावी मुक्कामी जाणार आहेत.
14 Oct 2025 12:10 PM (IST)
सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 26 प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. एकूण 102 नगरसेवकांची निवडून येणार आहे. 24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात आली आहे. 8 हरकती मान्य करण्यात आल्या असून 10 प्रभागांमध्ये फेरफार करण्यात आले आहे.
14 Oct 2025 12:02 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक आयोग चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
14 Oct 2025 12:00 PM (IST)
कोकणात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावे देण्यात आली आहे. रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्गमधील एकूण 192 वस्त्या तसेच 25 रस्त्यांची नावे बदण्यात आली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
14 Oct 2025 11:50 AM (IST)
बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. असं असताना एनडीएमध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झालेलं नाही. अनेक दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. बोलणी अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री नितीश कुमार जागावाटपावर खुश नसल्याची माहिती आहे. NDA मध्ये चार जागांवरुन पेच निर्माण झाला आहे. यात उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची जागा आहे.
14 Oct 2025 11:40 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "लोकसभा आणि विधानसभेत 45 लाख मत वाढली त्याचा हिशोब द्यायला आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख ही मत डुबलीकेट आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रा समोर मांडायचे आहेत. एक मत चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा? शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानत नाही कारण ते चोर आहेत," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
14 Oct 2025 11:30 AM (IST)
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चंदीगडमधील हरियाणाचे आयपीएस अधिकारी दिवंगत वाय. पूरण कुमार यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांनी कुटुंबियांचे स्वागत केले.
14 Oct 2025 11:20 AM (IST)
जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की "हे वर्ष आमच्यासाठी कठीण गेले आहे. प्रथम पहलगाम दहशतवादी हल्ला आणि नंतर भारत-पाकिस्तान संघर्ष. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. परिणामी जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती खूपच वाईट आहे... पर्यटन प्रोत्साहनासाठी, आमची एक टीम सिंगापूरमध्ये आहे. आग्नेय आशिया ही पर्यटनासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद येथेही पर्यटनाला प्रोत्साहन देत आहोत." असे ओमर अब्दुला यांनी सांगितले..
14 Oct 2025 11:11 AM (IST)
भारतीय क्रिकेटपटू, राजकारणी आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अशा भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाचा खेळाडू होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्याने राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून काम पाहिले. तो समालोचक म्हणून काम करतो आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्याची आक्रमक खेळीबरोबर मैदानावर झालेले वाद यामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.
14 Oct 2025 11:00 AM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका पार पडली, या मालिकेच्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने त्याच्या घरच्या मैदानावर मालिकेचा दुसरा सामना 7 विकेट्ने जिंकला आहे. भारताच्या फलंदाजांनी पहिल्याच डावामध्ये 518 धावा केल्या होत्या यामध्ये टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये 248 गुंडाळले होते. त्यानंतर फोलोअपची घोषणा केली होती. यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या डावामध्ये दमदार कमबॅक केला होता. फोलोअपमध्ये दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या संघाने 390 धावा केल्या.
14 Oct 2025 10:49 AM (IST)
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर तालुकानिहाय गट आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही महिलांचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे. अनेक तालुक्यांमध्ये गटांवर महिला आरक्षण लागू झाल्याने आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा ‘महिलाराज ‘ होण्याची चिन्हं दिसत आहेत.
14 Oct 2025 10:40 AM (IST)
पुणे येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात चोरीसाठी तीन चोर आलेले होते. त्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यात एका चोराचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जलख्मी आहेत. मृत्य झालेल्या चोरांचे नाव नवाज इम्तियाज खान (वय 26, रा. भवानी पेठ, मूळ बेंगळुरू) असं नाव आहे. जखमींचा नवे हमीद अबजल मोहम्मद (वय 20) आणि हमीद अबजल अहमद (वय 19) अशी आहेत. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
14 Oct 2025 10:31 AM (IST)
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ऋषभ शेट्टीच्या “कांतारा चॅप्टर १” ने १२ व्या दिवशी १३.५० कोटींची कमाई केली. परंतु, हे आकडे आठवड्याच्या शेवटीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. १२ दिवसांत, ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने भारतात ४५१.९० कोटी रुपये कमावले आहेत. येत्या आठवड्याच्या शेवटी त्याच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दिवशी ६१.८५ कोटी रुपये कमवणाऱ्या “कंथारा चॅप्टर १” ने पहिल्या आठवड्यात ३३७.४ कोटी रुपये कमावले आहे.
14 Oct 2025 10:23 AM (IST)
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच, प्रियांक खर्गे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची माहणी केली आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
14 Oct 2025 10:14 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक प्लेअर जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही गेमर्स चांगल्या रँकसाठी हा गेम खेळतात तर काही लोकं केवळ मनोरंजनासाठी हा गेम खेळतात. फ्री फायर मॅक्स खेळताना प्लेअर्स जिंकण्याच्या नादात अनेक चूका करतात. ज्यामुळे प्लेअर्सना मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काहीवेळा प्लेअर्सकडून अशा काही चूका होतात, ज्यामुळे त्यांचं गेमिंग अकाऊंट कायमचं बंद होऊ शकतं. त्यामुळे गेम खेळताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमचं गेमिंग अकाऊंट कायमचं बंद होण्याची देखील शक्यता असते. आता आम्ही तुम्हाला 3 अशा चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे प्लेअर्सचं अकाऊंट कायमचं बॅन होऊ शकतं.
14 Oct 2025 10:08 AM (IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे, भारताविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी आता ऑस्ट्रेलिया संघासंदर्भात मोठी एपडेट समोर आली आहे. जरी या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमन मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवण्याचा मानस आहे, परंतु दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण बदल होतील. ऑस्ट्रेलियन संघाने या दोन स्टार खेळाडूंच्या जागी खेळाडूंची घोषणा देखील केली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
14 Oct 2025 10:00 AM (IST)
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे. घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम तीव्र केली आहे. अलिकडच्या काळात सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत.
14 Oct 2025 09:59 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका सुरु आहे. याचदरम्यान पाकिस्तानचे सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वझीर मोहम्मद यांचे सोमवारी वयाच्या ९५ व्या वर्षी बर्मिंगहॅम येथे निधन झाले. कसोटी खेळाडू हनीफ, मुश्ताक आणि सादिक मोहम्मद यांचे मोठे भाऊ वझीर यांनी १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळले. १९५२ मध्ये पहिली कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघातील ते सर्वात वयस्कर सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे सल्लागार म्हणूनही काम केले. त्यानंतर ते ब्रिटनला गेले.
14 Oct 2025 09:50 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज १४ ऑक्टोबर रोजी, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात दर्शवतात. गिफ्ट निफ्टी २५,३१९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १० अंकांनी जास्त होता. तसेच आज शेअर बाजारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, याबाबत अधिक जाणून घेऊया.
14 Oct 2025 09:47 AM (IST)
Devendra Fadnavis on Priyank Kharge: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच, प्रियांक खर्गे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची माहणी केली आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
14 Oct 2025 09:45 AM (IST)
नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केलं आणि हे पैसे उकळले.
14 Oct 2025 09:40 AM (IST)
मुंबई : यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने आतापासूनच थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडीचा कडाका जाणवणार असून, दुपारच्या वेळेला कडक उन आणि रात्री थंडीची सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातील हा बदल बुधवार (दि. १५) नंतर होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे दिवाळीच्या वेळेस थंडी वाढण्याची शक्यता आहे.
14 Oct 2025 09:30 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश : महिला विश्वचषकामध्ये खराब कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेमध्ये दमदार कमबॅक केला आहे. संघाने पहिल्या पराभवांनंतर एकही सामना न गमावता विजयाची हॅटट्रिक नावावर केली आहे. काल त्याचा सामना हा बांग्लादेशविरुद्ध झाला या सामन्यामध्ये त्यांनी बांग्लादेशच्या संघाला 3 विकेट्सने पराभुत करुन सामना जिंकला. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.
14 Oct 2025 09:20 AM (IST)
भारतात 14 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,541 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,496 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,406 रुपये आहे. भारतात 14 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,960 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,060 रुपये आहे. भारतात आज 14 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 185.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,85,100 रुपये आहे.
14 Oct 2025 09:10 AM (IST)
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अमेरिकेने टॅरिफ कर लादल्यापासून जगभरात एकच चर्चा सुरु आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोरच भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ‘भारत हा एक महान देश आहे आणि माझा एक खूप चांगला मित्र सर्वात वर आहे. त्यांनी खूप छान काम केले आहे’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
14 Oct 2025 08:57 AM (IST)
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडी कलाकार आणि अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजू यांना खांद्याच्या दुखण्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांना तातडीने उडुपी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
Marathi Breaking news live updates: “दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. या सणात प्रत्येकजण आपले घर सजवतो, नवीन कपडे घेतो आणि प्रियजनांसाठी भेटवस्तू आणतो. पण मोठ्या शहरांमध्ये खरेदी करताना बजेट सांभाळणे ही एक आव्हानात्मक गोष्ट असते. अशा वेळी मुंबईतील काही पारंपरिक बाजारपेठा तुमची खिशावर भार न टाकता संपूर्ण दिवाळीची तयारी करून देतात. चला तर पाहूया, मुंबईतील त्या स्वस्त आणि लोकप्रिय बाजारपेठा जिथे दिवाळीच्या शॉपिंगचा आनंद आणि बचत दोन्ही मिळतात.
सविस्तर बातमीसाठी- Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग