अनिल अंबानीच्या कंपनीचे शेअर्सचे भाव वधारले (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
उद्योगपती अनिल अंबानी सतत अडचणींना तोंड देत आहेत. अनिल अंबानी यांची कंपनी सध्या तपास यंत्रणांच्या आणि ED च्या रडारवर आहे. कर्ज आणि बँक कर्ज प्रकरणात त्यांची सध्या चौकशी सुरू आहे, इतकंच नाही तर त्यांच्या अनेक उद्योगधंद्यांच्या शाखांवर छापेही मारण्यात आले आहेत. परंतु या सर्व बातम्यांमध्ये अनिल अंबानींच्या एका कंपनीचे शेअर्स अचानक वाढू लागले असल्याचे दिसून आले आहे आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
शुक्रवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स इंट्राडे ८ टक्क्यांनी वाढले. शेअर्स २६९ रुपयांवरून २९०.७० रुपयांवर पोहोचले. तथापि, नंतर नफा बुकिंगमुळे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. रिलायन्स इन्फ्रा च्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक आनंदाची बातमी आहे, जी या कठीण काळात अनिल अंबानींसाठी जीव वाचवणाऱ्यापेक्षा कमी नाही. पण याचे नेमके कारण काय आहे जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
11 वर्ष जुन्या वादातून मिळाला विजय
अनिल अंबानी यांच्या कंपनीला ११ वर्षे जुन्या वाद प्रकरणात आनंदाची बातमी मिळाली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांच्या उपकंपन्या बीएसईएस यमुना पॉवर आणि बीएसईएस राजधानी पॉवरकडून २८४८१ कोटी रुपये वसूल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या कंपनीला पुढील चार वर्षांत ही रक्कम वसूल करण्याची परवानगी दिली आहे.
अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी
नक्की काय आहे प्रकरण
अनिल अंबानी यांच्या कंपनीचा हा वाद २०१४ पासून सुरू होता. न्यायालयाने बीएसईए डिस्कॉम, बीएसईएस यमुना पॉवर, बीएसईएस राजधानी पॉवर यांच्या वतीने ही रिट याचिका दाखल केली होती, त्यानंतर आता या प्रकरणातील निर्णय अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या बाजूने आला आहे.
कंपनीला आता ग्राहकांकडून हा निधी वसूल करण्याचा अधिकार मिळाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक्सचेंज फाइलिंगला ही माहिती दिली आणि म्हटले की सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट रोजी दोन बीएसईएस वितरण कंपन्यांनी दाखल केलेल्या रिट याचिका आणि दिवाणी अपीलांचा निकाल लावला आहे. निर्णयात, न्यायालयाने वीज नियामकांना आणि वीज अपीलीय न्यायाधिकरणाला पारदर्शकता आणि वेळेवर वसुली सुनिश्चित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Anil Ambani : अनिल अंबानींच्या कार्यालयांवर ED चे छापे, अधिकाऱ्यांकडून ५० कंपन्यांची चौकशी
या कंपनी काय करतात
बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड आणि बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड या अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या वीज वितरण कंपन्या आहेत. ही कंपनी दिल्लीत वीजपुरवठा करते, तिचे दिल्लीत ५३ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर, दिल्ली वीज नियामक आयोगाच्या देखरेखीखाली वसुली प्रक्रिया सुरू होईल, ज्यामुळे दिल्ली ग्राहकांचे वीज बिल वाढू शकते.