
Top Marathi News Today Live:
11 Nov 2025 11:59 AM (IST)
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटात (Delhi Bomb Blast ) सहभागी असलेल्या दहशतवादी उमरचा (Dr Umar Muhammad) पहिला फोटो समोर आला आहे. त्यानेच स्फोट घडवला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि २४ जण जखमी झाले होते. मंगळवारी झालेल्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या आय-२० कार बाहेर पडताना दिसत आहे. ती कार डॉ. मोहम्मद उमर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
11 Nov 2025 11:55 AM (IST)
मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. खुशबू अहिरवार असं या महिलेचे नाव असल्याचे सांगितलं जात आहे. हे प्रकरण लव्ह-जिहादचे असल्याचे समजले जात आहे. हा प्रकार इंदौर रोड येथील भैंसाखेडी येथील आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह रुग्णालयातून ताब्यात घेतले आहे. खुशबू अहिरवार यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुस्लिम बॉयफ्रेंड कासिम खुशबूला रुग्णालयात सोडून फरार झाला.
11 Nov 2025 11:50 AM (IST)
मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबॉम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे ज्यात त्या एका सार्वजनिक सभेदरम्यान लोकांची भेट घेताना दिसून आल्या. जनतेसोबत संवाद साधत असतानाच एका पुरूषाने त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने आधी त्यांच्या छातीला हात लावला आणि मग जवळ जाऊन त्यांच्या मानेवर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रपती शेनबॉम ही परिस्थती शांतपणे हाताळताना दिसून येतात, त्या व्यक्तीचा हात आपल्या शरीरापासून दूर करतात आणि तितक्यातच त्यांचा सुरक्षा रक्षक व्यक्तीला ओढत बाजूला घेऊन जातो.
11 Nov 2025 11:40 AM (IST)
काल राजधानी दिल्ली आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट होण्याआधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये कार चालवणारा व्यक्ती तोंडाला मास्क लावून चालवत असल्याचे दिसून येत आहे.
11 Nov 2025 11:30 AM (IST)
Vivo ने होम मार्केट चीनमध्ये Vivo Y500 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Y-सीरीजचा एक भाग आहे, ज्याला MediaTek Dimensity 7400 चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. विवोच्या या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
11 Nov 2025 11:20 AM (IST)
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटाने देशाला हादरवून टाकले आहे. या स्फोटामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतके च नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कशीही त्याचा संबंध असल्याचे दिसून येते. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालांनुसार, या स्फोटात उच्च क्षमतेचा स्फोटक अमोनियम नायट्रेट वापरण्यात आला होता. संपूर्ण प्रकरण आता एनआयए, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकड्यांकडून तपासात आहे.
11 Nov 2025 11:14 AM (IST)
मावळ तालुक्यातील (Vadgaon Maval) कामशेत परिसरात मंगळवारी (दि,11) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने (Accident News) परिसर हादरुन गेला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघात इतका भीषण होता की वारकऱ्यांना दूरवर फेकले गेले. काही क्षणातच भक्तिगीतांचा गजर शांत झाला आणि सर्वत्र आक्रोश आणि मदतीचे आवाज घुमू लागले.
11 Nov 2025 10:59 AM (IST)
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पाकिस्तानच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. पहिला एकदिवसीय सामना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे दुपारी २:३० वाजता होईल. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर प्रसारित केला जाणार नाही, तर चाहते या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्पोर्ट्स टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकतात.
11 Nov 2025 10:54 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावरील कर (Tarrif) कमी करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हा कर लादला होता. तसेच त्यांनी भारतासोबत व्यापार कराराचे देखील संकेत दिले आहेत.
11 Nov 2025 10:49 AM (IST)
बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सतत बातम्या येत आहेत. आता त्यांची मुलगी ईशा देओलने सोशल मीडियावर एक संदेश शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मीडिया खोट्या अफवा पसरवत आहे. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. माझ्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.” धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
11 Nov 2025 10:37 AM (IST)
सांगलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांनी रात्री पार्टी केली आणि त्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळवरून वाद वाढला आणि हत्या झाली.
11 Nov 2025 10:28 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर रजाणार आहेत. दोन्ही देशांतील दृढ मैत्रीच्या दृष्टीकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ११ वर्षात चौथ्यांदा पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.यादरम्यान दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट होतील.
11 Nov 2025 10:19 AM (IST)
युवा भारतीय नेमबाज सम्राट राणाने इतिहास रचला आहे. त्याने आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य दाखवले. करनालचा रहिवासी २० वर्षीय सम्राट राणा हा ऑलिंपिक-आधारित स्पर्धेत विश्वविजेता होणारा पहिला भारतीय पिस्तूल नेमबाज बनला आहे. त्याने जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. या विजयासह टीम इंडिया पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
11 Nov 2025 10:05 AM (IST)
सांगली: सांगलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका घोड्याच्या तबेल्यात शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमीर रावसाहेब कन्नुरे असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांनी रात्री पार्टी केली आणि त्यात शिवीगाळ झाली. याच शिवीगाळवरून वाद वाढला आणि हत्या झाली.
11 Nov 2025 10:00 AM (IST)
Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली असून अयोध्या, काशी (वाराणसी) आणि मथुरा या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली आहे. रामजन्मभूमी परिसर, काशी विश्वनाथ धाम आणि कृष्णजन्मभूमी मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
11 Nov 2025 09:55 AM (IST)
जागतिक बाजारपेठेतील उत्साही वातावरणामुळे आज, मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,७२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २८ अंकांनी जास्त होता.
11 Nov 2025 09:50 AM (IST)
Delhi Bomb Blast News in Marathi : नवी दिल्ली : काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.
11 Nov 2025 09:40 AM (IST)
भारतात 11 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,383 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,351 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,288 रुपये आहे. भारतात 11 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,510 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,880 रुपये आहे. भारतात 11 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 157.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,57,100 रुपये आहे.
11 Nov 2025 09:30 AM (IST)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कोणत्याही निवडणुकीत एकत्रित दिसली नाही. असे असताना आता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवणार असून, समन्वयाने जागा वाटपाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
11 Nov 2025 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.
11 Nov 2025 09:10 AM (IST)
बॉलीवूड अभिनेते आणि "ही-मॅन" धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी येण्यापूर्वी त्यांचे जवळचे मित्र आणि सह-अभिनेते अमिताभ बच्चन यांना धक्का बसला आहे. त्यांनी १० नोव्हेंबर रोजी उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, ज्यातून त्यांच्या दुःखाची खोली स्पष्ट झाली. बिग बींना वीरूच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
11 Nov 2025 09:10 AM (IST)
Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उद्या दुसऱ्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उद्या 20 जिल्ह्यांमधील 122 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या दिवशी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे समजणार आहे. उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
11 Nov 2025 09:06 AM (IST)
काल संध्याकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता जवळपास 200 मीटर लांबपर्यंत असल्याचे समजते आहे. दरम्यान हा स्फोट एका चालत्या गाडीत झाला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हि गाडी कुठली आहे आणि कोणाची आहे याचा शोध लावला आहे.
11 Nov 2025 09:05 AM (IST)
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी एक मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील गर्दीच्या परिसरात झालेल्या शक्तिशाली कार स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली. प्राथमिक तपासात दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे.
11 Nov 2025 09:03 AM (IST)
काल राजधानी दिल्ली आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात भीषण स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान हा स्फोट होण्याआधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये कार चालवणारा व्यक्ती तोंडाला मास्क लावून चालवत असल्याचे दिसून येत आहे.
11 Nov 2025 09:02 AM (IST)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हे शुभमन गिल यांच्याकडे असणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद टेम्बा बवुमा कडे असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कोलकात्यात दाखल झाले आहेत आणि त्यांनी तयारी सुरू केली आहे.
11 Nov 2025 09:02 AM (IST)
काल (१० नोव्हेंबर) राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ एक हादरवणारी घटना घडली.लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशमन परिसरात एक भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या धमाक्यानंतर केवळ भारतच नव्हे, तर शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशमध्ये देखील खळबळ उडाली आहे.
11 Nov 2025 09:01 AM (IST)
लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चालत्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की आजूबाजूची अनेक वाहने चिरडली गेली. सुरुवातीला ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, घटनेनंतर तीन तासांनी गृहमंत्री अमित शहा यांनी आठ मृत्यूंची पुष्टी केली. त्यानंतर रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीत मृतांचा आकडा नऊ असल्याचे नमूद केले आहे. गृहमंत्री शहा म्हणाले की, “आय-२० कारच्या मागील बाजूस स्फोट झाला.” पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राम येथे सलमान या व्यक्तीच्या नावावर ही कार नोंदणीकृत होती.
Marathi Breaking news live updates : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वतःचे अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली. पण त्यानंतर काही वेळातच अभिनेते धर्मेंद्र यांची कन्या आणि अभिनेत्री इशा देओलने धर्मेद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
ईशा देओलने सोशल मीडियावर एक संदेश शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मीडिया खोट्या अफवा पसरवत आहे. “माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. माझ्या वडिलांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.” धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.