Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: शिरुर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याचा अखेर अंत; वन विभागाची कारवाई यशस्वी

Marathi breaking live marathi- सुमारे सहा वर्ष वयाचा नर जातीचा हा बिबट्या असून, 13 वर्षीय रोहन या मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेणारा हाच नरभक्षक असल्याचे त्याच्या ठशांवर व नमुन्यांवरून स्पष्ट झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 05, 2025 | 01:30 PM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 05 Nov 2025 01:30 PM (IST)

    05 Nov 2025 01:30 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला…मदतीच्या नावाने बोंबाबोंब; उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांध्यावर

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलेल पीक गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला. यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत.

  • 05 Nov 2025 01:25 PM (IST)

    05 Nov 2025 01:25 PM (IST)

    ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

    अमेरिकेत गेल्या ३६ दिवसांपासून सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे शटडाऊन आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पहिल्या काळात ३५ दिवसांसाठी शटडाऊन झाले होते. तसेच सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

  • 05 Nov 2025 01:15 PM (IST)

    05 Nov 2025 01:15 PM (IST)

    वैकुंठ चतुर्दशीनिमित्त सुंदरनारायण मंदिरात हरीहर भेट महोत्सव संपन्न

    गोपाल कृष्ण भगवान की जय, जय श्रीराम, बम बम भोले, हर हर महादेव असा हरी-हर नामाचा गजर करीत सुंदर नारायण मंदिरातील ‘हरी’ला बिल्वपत्र व कपालेश्वराला म्हणजे ‘हर’ला तुळशीपत्र अर्पण करीत सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्यासुमारास हरिहर भेटीचा सोहळा रंगला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हरिहर भेट घडविण्यात आली. या हरिहर भेटीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पंचवटी रामकुंड पेथील कपालेश्वर मंदिर व सुंदर नारायण मंदिरात दरवर्षीप्रमाणे कार्तिक मासातील वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सोमवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता हरिहर भेटीचा सोहळा रंगला.

  • 05 Nov 2025 01:00 PM (IST)

    05 Nov 2025 01:00 PM (IST)

    Pune: बाजीराव रस्त्यावर भरदिवसा अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

    वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पाईन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत. गेल्या तीन दिवसात भरदिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे.

  • 05 Nov 2025 12:50 PM (IST)

    05 Nov 2025 12:50 PM (IST)

    दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले

    भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर धडक दिली. दोघेही वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही भीषण घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत आऊटर रिंगरोडवर घडली. गंभीर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 05 Nov 2025 12:40 PM (IST)

    05 Nov 2025 12:40 PM (IST)

    घरकाम करणाऱ्या तरुणीची मालकाच्या घरात आत्महत्या

    मुंबईतून अँटॉप हील येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने मालकाच्या घराच्या बाल्कनीमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर चोरीच्या संशयातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव चोईसांग तामांग असे आहे.

  • 05 Nov 2025 12:30 PM (IST)

    05 Nov 2025 12:30 PM (IST)

    पादचारी पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; सीसीटीव्हीत कैद संपूर्ण प्रकार

    कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी आणि महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या ६ तासांच्या आत बाळाला शोधून काढून आई- वडिलांकडे सोपवले आहे. पोलिसांनी आरोपीला आत्या- भाच्याला अटक केली आहे. आरोपी तरुणाचा नाव अक्षय खरे आणि सविता खरे असे नाव आहे. चोरीच्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

  • 05 Nov 2025 12:20 PM (IST)

    05 Nov 2025 12:20 PM (IST)

    पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून

    पती-पत्नीमध्ये वाद होणे ही साधारण गोष्ट असली तरी कधी कधी या वादाचं रुप किती भयंकर होऊ शकतं हे सांगणं कठीण असतं. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीच्या बेरोजगारीला कंटाळून त्याची वीट आणि दांडक्याने हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीचा खून केल्यानंतर ती त्याच्या मृतदेहाशेजारी बसून मेकअप करत होती. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना परिसरात ही भीषण घटना घडली आहे.

  • 05 Nov 2025 12:10 PM (IST)

    05 Nov 2025 12:10 PM (IST)

    व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात

    पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून अवैध वास्तव्यात असणाऱ्या बांगलादेशी महिलेला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती भोसरी परिसरात राहत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या महिलेचं नाव माला विट्ठल डावखर उर्फ फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ती भारतात राहत होती. काही वर्षांपासून ती भोसरी परिसरातील चक्रपाणी वसाहत भागात ती रहात होती. ती भारतात कामाच्या शोधात आली होती. अनेकांच्या घरी ती घरकाम करत होती.

  • 05 Nov 2025 12:05 PM (IST)

    05 Nov 2025 12:05 PM (IST)

    अमेरिकेत पुन्हा विमान अपघात

    अमेरिकेत (America) एक भीषण दुर्घटना घडली आहे. केंटकी येथील लुइसविले येथे एक मालवाहू विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि ११ गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी ( दि. ०४ नोव्हेंबर) ही दुर्घटना घडली.

  • 05 Nov 2025 11:55 AM (IST)

    05 Nov 2025 11:55 AM (IST)

    रेखा गुप्ता यांनी साजरी केली गुरु नानक जयंती

    दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त साजरी केली. पटना साहिब येथील तखत श्री हरिमंदिर जी गुरुद्वारा येथे रेखा गुप्ता यांनी प्रार्थना केली आहे.

  • 05 Nov 2025 11:45 AM (IST)

    05 Nov 2025 11:45 AM (IST)

    भारतीय वंशाचे ममदानी बनले न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर

    अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या असून निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय वंशाचे जोरहान ममदानी यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. ते महापौरपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ममदानी आघाडीवर होते. ममदानी न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत.

  • 05 Nov 2025 11:35 AM (IST)

    05 Nov 2025 11:35 AM (IST)

    Happy Birthday King Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. आज विराट त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. जो क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी नवी दिल्ली येथे झाला. त्याच्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 05 Nov 2025 11:25 AM (IST)

    05 Nov 2025 11:25 AM (IST)

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त योगी सरकारचा आनंदोत्सव

    कार्तिक पौर्णिमा आणि गंगा मेळाव्यानिमित्त, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भव्य उत्सव साजरा केला. हापूर जिल्हा प्रशासनाने गंगा नदीच्या पवित्र तीरावर जमलेल्या भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली आणि या पवित्र कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि उत्सवाचा आनंद दिसून आला.

    PHOTO | On the occasion of Kartik Purnima and the Garh Ganga Mela, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath ensured a grand celebration as the Hapur district administration showered flower petals from a helicopter over devotees gathered on the holy banks of the Ganga River,… pic.twitter.com/NUe95BEwIa

    — Press Trust of India (@PTI_News) November 5, 2025

  • 05 Nov 2025 11:15 AM (IST)

    05 Nov 2025 11:15 AM (IST)

    तातडीने...आताच्या आता कर्जमुक्ती करा - उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौर्‍यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीचा आणि सरकारी मदतीचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई (भरपाई) प्रत्यक्षात किती मिळाली, मिळाली की नाही, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.

  • 05 Nov 2025 11:05 AM (IST)

    05 Nov 2025 11:05 AM (IST)

    बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष

    बराक ओबामा हे अमेरिकेचे ४४वे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांनी २००९ ते २०१७ या काळात पदभार सांभाळला. ते अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. अध्यक्ष होण्यापूर्वी, त्यांनी इलिनॉयसाठी अमेरिकेचे सिनेटर म्हणून काम केले. आजच्या दिवशी बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारला होता. बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी मिळवली आणि ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. बराक ओबामा यांचा कार्यकाळ संपूर्ण विश्वात चर्चेत राहिला आहे.  

  • 05 Nov 2025 09:59 AM (IST)

    05 Nov 2025 09:59 AM (IST)

    ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ची क्रेझ अजून सुरुच

    हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा “एक दीवाने की दिवानियत” हा चित्रपट स्पष्टपणे एक डार्क हॉर्स ठरला आहे. दिवाळीत लोकप्रिय हॉरर कॉमेडी “थामा” सोबत टक्कर होऊनही हा चित्रपट हिट होईल असे कोणी विचार केला होता? आणि आता मनोरंजक गोष्ट म्हणजे, “एक दीवाने की दिवानियत” हा चित्रपट आयुष्मान खुराणा अभिनीत “थामा” पेक्षा खूपच कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तरीही, त्याने बॉक्स ऑफिसवर असाधारण कामगिरी केली आणि दमदार कलेक्शन केलेआहे. “एक दीवाने की दिवानियत” ने रिलीजच्या १५ व्या दिवशी, दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 05 Nov 2025 09:50 AM (IST)

    05 Nov 2025 09:50 AM (IST)

    बाजीराव रस्त्यावर भरदिवसा अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

    पुणे: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या झाली होती. या खुनाचा उलगडा पोलीस करतच होते तर भरदिवसा पुन्हा एक हत्या झाली आहे. आता वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पाईन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत. गेल्या तीन दिवसात भरदिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे.

  • 05 Nov 2025 09:45 AM (IST)

    05 Nov 2025 09:45 AM (IST)

    भारतात iPhone चा कहर! जगातील तिसरं सर्वात मोठं मार्केट बनला देश

    भारतात आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आयफोन लाँच झाल्यानंतर त्याची खरेदी करण्यासाठी अ‍ॅपल स्टोअर बाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आयफोनच्या भारतातील विक्रीला काही तोड नाही. आता नुकताच एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वाचून सर्वचजण चकित झाले आहेत.

  • 05 Nov 2025 09:40 AM (IST)

    05 Nov 2025 09:40 AM (IST)

    कोणत्या धर्माचे पालन करतो इमरान हाश्मीचा मुलगा?

    अभिनेता इमरान मुस्लिम कुटुंबातून आलेला आहे, तर त्याची पत्नी परवीन साहनी हिंदू आहे. आपल्या मुलाच्या धर्माबद्दल बोलताना इमरानने एक आश्चर्यकारक विधान केले. “मी परवीनशी लग्न केले, जी हिंदू आहे. म्हणून, आमचा मुलगा पूजा करतो आणि नमाजही वाचतो. विशेष म्हणजे माझी आई ख्रिश्चन होती.” असे अभिनेता म्हणताना दिसला आहे.

  • 05 Nov 2025 09:35 AM (IST)

    05 Nov 2025 09:35 AM (IST)

    तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर?

    भारतात 5 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,245 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,224 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,183 रुपये आहे. भारतात 5 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,240 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,830 रुपये आहे. भारतात 5 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 150.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,50,900 रुपये आहे.

  • 05 Nov 2025 09:30 AM (IST)

    05 Nov 2025 09:30 AM (IST)

    अतिवृष्टीसह पूरग्रस्तांसाठी 985 कोटींचा निधी केला जातोय वितरीत

    नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमीन, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, वैयक्तिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत नागपूर विभागात झालेल्या नुकसानीपोटी 474 कोटी रुपये आणि इतर असे सर्व मिळून 985 कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.

  • 05 Nov 2025 09:25 AM (IST)

    05 Nov 2025 09:25 AM (IST)

    बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात; ११ ठार, २० हून अधिक जखमी

    बिलासपूर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पॅसेंजर ट्रेनने लाल सिग्नल तोडून मागून येणाऱ्या मालगाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

    अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वेने या घटनेची चौकशी सुरू केली असून सिग्नलिंग सिस्टीम तसेच चालकाच्या चुकांची सखोल तपासणी केली जात आहे.

  • 05 Nov 2025 09:20 AM (IST)

    05 Nov 2025 09:20 AM (IST)

    अंधेरीत महिन्याभराच्या बालिकेला कचऱ्यात टाकल्याचा प्रकार

    अंधेरी-वर्सोवा परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चाचा नेहरू गार्डनजवळील लष्करिया बिल्डिंगच्या मागे रस्त्यालगतच्या वॉलकंपाऊंडजवळ अंदाजे एक महिन्याच्या बालिकेला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालिकेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात, पालकांनी किंवा मुलाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने हेतुपुरस्सर परित्याग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 05 Nov 2025 09:15 AM (IST)

    05 Nov 2025 09:15 AM (IST)

    आचारसंहितेनंतर २४ तासांतच राष्ट्रवादीला मोठा धक्का; देशमुख कुटुंब शिंदे गटात

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुण्यात प्रभाव असलेले देशमुख कुटुंब शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा पक्षप्रवेश गुरुवारी चाकण येथे होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून, या घडामोडीमुळे पक्षातील गळतीचा क्रम कायम राहिला आहे.

  • 05 Nov 2025 09:10 AM (IST)

    05 Nov 2025 09:10 AM (IST)

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ऑक्टोबर हप्ता उद्यापासून; पात्र महिलांना दिलासा

    महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून वितरित होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये या वेळीही थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

  • 05 Nov 2025 09:06 AM (IST)

    05 Nov 2025 09:06 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

    राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यभरात २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर केले जातील. त्यामुळे पुढील महिनाभरातच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचाराची रणनीती आखावी लागणार आहे.

    पत्रकार परिषदेदरम्यान दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटींविषयी पत्रकारांनी निवडणूक आयुक्त वाघमारे यांना प्रश्न विचारले. मात्र, आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

  • 05 Nov 2025 09:02 AM (IST)

    05 Nov 2025 09:02 AM (IST)

    एमसीए निवडणुकीवर न्यायालयाची अंतरिम मनाई

    मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीवरील वाद आता उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास तात्पुरती मनाई केली असून, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेचे भवितव्य 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर ठरणार आहे.

    या निवडणुकीविरोधात एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी अॅड. स्नेहा फेणे यांच्या माध्यमातून रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणूक प्रक्रियेत घटनेचे उल्लंघन झाल्याचा आणि नियमबाह्यरीत्या 155 हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Marathi Breaking news live updates: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार मारण्यात यश मिळवले आहे. रात्री उशिरा गाव परिसरात शोधमोहीम सुरू असताना ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा घेण्यात आला.

वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र डार्ट चुकीचा गेल्याने बिबट्या सावध झाला. त्यानंतर त्याने थेट वनकर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पथकातील दोन शार्पशूटरनी तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बिबट्या ठार झाला.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime international sports business entertainment weather reports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार
1

Top Marathi News Today : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार

Top Marathi News Today: भारतीय संघाचा काॅल आला अन् ;  शेफाली वर्माची खास कहाणी
2

Top Marathi News Today: भारतीय संघाचा काॅल आला अन् ; शेफाली वर्माची खास कहाणी

MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले
3

MNS MVA Satyacha Morcha Update : राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटला निघाले

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा
4

Top Marathi News Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.