Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; दोन संशयित ताब्यात 

Marathi breaking live marathi मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 07, 2025 | 06:57 PM
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news updates :  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.

या कटामागे बीड जिल्ह्यातील परळीतील एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पोलिस याबाबत सर्व दिशांनी कसून तपास करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर मोठा खुलासा करणार आहेत. ते सुपारी देणाऱ्या त्या बड्या नेत्याचे नाव जाहीर करतील का, की प्रकरणाला वेगळेच वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The liveblog has ended.
  • 07 Nov 2025 06:37 PM (IST)

    07 Nov 2025 06:37 PM (IST)

    "नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला..."; CM देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

    मुंबई: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत दिले. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहे, अशा घटकाच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या तुलनेत अव्वल असण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

  • 07 Nov 2025 06:06 PM (IST)

    07 Nov 2025 06:06 PM (IST)

    Pune Leopard News: "बिबट्याच्या विषयात मी स्वतः..."; काय म्हणाले DCM एकनाथ शिंदे?

    पारगाव शिंगवे:  पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहेत, समोरच्या कुटुंबाचा पोटच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याने बळी गेले आहेत. हा परिसर बिबट मुक्त करण्याचा ग्रामस्थांची मागणी आहे. हा परिसर बिबट मुक्त करण्याचा शासन निर्णय घेणार आहे. यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावातील  रोहन विलास बोंबे या कुटुंबाची भेट घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

  • 07 Nov 2025 06:02 PM (IST)

    07 Nov 2025 06:02 PM (IST)

    “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

    सांगली: नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर शासनाने एक उच्च अधिकार समिती गठित करून जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यामध्ये कोणतीही मर्यादा न घालता, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशारा माझी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  • 07 Nov 2025 05:32 PM (IST)

    07 Nov 2025 05:32 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंना मोठी जबाबदारी

    पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने ‘शतप्रति:शत’ चा नारा दिला असून, जिल्ह्यातील उत्तर भागात असलेल्या 6 तालुक्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ‘‘निवडणूक प्रमुखपदी’’ आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह संभाव्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ला आव्हान देण्यासाठी स्थानिक पातळीवर ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला आहे.

  • 07 Nov 2025 05:04 PM (IST)

    07 Nov 2025 05:04 PM (IST)

    Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा

    महायुतीतील सेना – भाजपात स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडला आहे. अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून चार नावे पाठवण्यात आल्या असून, शिवसेना यावर आक्रमक झाली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपचा नगराध्यक्ष पदासाठी उल्लेख केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगितले आणि युतीच्या मतदारांचा हा अपमान असल्याची टीका केली आहे. शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी अंतर्गत गटबाजी नसेल तर विकास कामाची स्पर्धा असल्याचे स्पष्ट केले आहे.शहरात शिवसेना पक्षात कोणतेही दोन गट नाहीत, तर दोघांमध्ये विकास कामांची स्पर्धा आहे ज्यामुळे शहरातील कामांना चालना मिळते आणि पक्षालाही फायदा होतो, असे वाळेकर यांनी भूमिका मांडली. यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वाद महत्त्वाचे आहेत.

  • 07 Nov 2025 04:55 PM (IST)

    07 Nov 2025 04:55 PM (IST)

    खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली रखडलेल्या कामाची पाहणी

    कोल्हापूरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडला आहे..त्यामुळे हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर गतीने व्हावं यासाठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी केशवराव भोसले नाट्यगृहात कला सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधलं होतं.. याची तातडीने दखल घेत आज खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण नाट्यगृहाच्या सद्यस्थितीची पाहणी केली..शिवाय खासदार शाहू महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांची संयुक्त बैठक केशवराव भोसले नाट्यगृहात पार पडली..या बैठकी दरम्यान कलाकारांनी कामाच्या दर्जाबाबत आक्षेप घेत काही सुधारणाही सुचवल्या तर काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचे असल्याचं शाहू महाराज यांनी म्हटल आहे.. तर राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम हे चार टप्प्यात होणार असून पहिल्या दोन टप्प्याला झालेल्या विलंबानंतर तिसरा आणि चौथा टप्पा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.

  • 07 Nov 2025 04:45 PM (IST)

    07 Nov 2025 04:45 PM (IST)

    डोंबिवलीत रास्ता रोको: केडीएमसीतील २७ गावांच्या नगरपालिकेची मागणी

    डोंबिवलीत भाजप आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या २७ गावांना स्वतंत्र नगरपालिका म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी नागरिकांनी पुकारलेला हा आंदोलनाचा इशारा सरकारी निर्णयप्रक्रियेवर दबाव निर्माण करू शकतो, असं सांगण्यात येत आहे.

  • 07 Nov 2025 04:35 PM (IST)

    07 Nov 2025 04:35 PM (IST)

    उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी

    चिपळूण : ठाकरे गट शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख जितेंद्र तथा पप्या चव्हाण यांची शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.आमदार जाधव म्हणाले की, गुहागर मतदार संघात चिपळूण तालुक्यातील ७२ गावांचा समावेश असून या गावांचे तालुका प्रमुख म्हणून जितेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेली काही दिवस त्यांच्याकडून वारंवार पक्षविरोधी कारवाया सुरु होत्या. विरोधी पक्षाशी हातमिळवणी बैठका ही त्यांची कायमची सवय असून वारंवार त्यांना समज देऊन देखिलत्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. ही बाब आपण पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविली असून त्यांच्या आदेशानुसार आपण चव्हाण यांची तालुकाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली आहे. ७२ गावांतील कार्यकर्त्यांचा विरोध असताना देखिल आपण जुना सहकारी म्हणून प्रेमापोटी चव्हाण यांच्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्यावर विश्वास दाखविला. मात्र त्यांनी आपला विश्वासघात केल्याचे आमदार  जाधव यांनी सांगितले.

  • 07 Nov 2025 04:25 PM (IST)

    07 Nov 2025 04:25 PM (IST)

    अनधिकृत नळ जोडण्यांवर केडीएमसीची कारवाई

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभाग क्षेत्रातील आशेळे परिसरात दीर्घकाळ चालू असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. आशेळे गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा पाईपलाईन असूनदेखील, चिंचपाडा आणि द्वारली परिसरातील अनेक इमारती व चाळींनी अनधिकृत नळ जोडण्या केल्याने आशेळे गावापर्यंत पुरेसं पाणी पोहोचत नव्हतं. परिणामी, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावी लागत होती. या गंभीर परिस्थितीवर स्थानिक कार्यकर्ते नितीन तरे, इंदिरा तरे, गणपती कांबळे, गोपी कडू, अशोक कडू, प्रभाकर कडू आणि संतोष कडू यांनी सातत्याने पाठपुरावा करून केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत आज केडीएमसी अधिकाऱ्यांनी कारवाईची मोहीम राबवली असून चिंचपाडा भागातील तब्बल ३० पेक्षा अधिक अनधिकृत कनेक्शन तोडण्यात आली आहेत. यासोबतच, या बेकायदेशीर जोडण्या करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त जगताप यांनी दिली. या कारवाईनंतर आशेळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त करत केडीएमसीचे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

  • 07 Nov 2025 04:15 PM (IST)

    07 Nov 2025 04:15 PM (IST)

    पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले!

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे पुणे येथील एका जमीन खरेदी प्रकरणावरून टीकेचे धनी ठरले आहेत. या गंभीर प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी यावर संस्कारांवर बोट ठेवले आहे.अण्णा हजारे म्हणाले, मंत्र्यांच्या मुलांनी असे वागणे हे दुर्दैव आहे. यात मंत्र्यांचा दोष आहे. कुटुंबाचे, गावाचे संस्कार महत्त्वाचे असतात. त्यांनी युवा पिढीला मोलाचा सल्ला दिला की, हे जीवन केवळ चैनबाजी करण्यासाठी मिळालेले नाही. 'मी जन्माला का आलो? माझे कर्तव्य काय आहे?' याचा विचार त्यांनी केला पाहिजे.अण्णांनी या संपूर्ण प्रकरणाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 07 Nov 2025 04:08 PM (IST)

    07 Nov 2025 04:08 PM (IST)

    राळेगणसिद्धीतून उपमुख्यमंत्र्यांनी दिले मदत आणि विश्वासाचे आश्वासन!

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात आहेत. याच ठिकाणी त्यांनी मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय भाष्य करणे टाळले. राजकीय बोलणे टाळताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, "मी जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली होती. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मिळून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करू." मदतीच्या आश्वासनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार निवडणुकीवरही केले भाष्य केले.

  • 07 Nov 2025 04:07 PM (IST)

    07 Nov 2025 04:07 PM (IST)

    अंबरनाथमध्ये सेना भाजपच्या महायुतीत मिठाचा खडा

    महायुतीतील सेना - भाजपात स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडला आहे, अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडुन चार नावे कोअर कमिटीकडे पाठवण्यात आल्याचे जाहीर होताच महायुतीतील घटकपक्ष असलेली शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

     

     

  • 07 Nov 2025 03:42 PM (IST)

    07 Nov 2025 03:42 PM (IST)

    Bihar Elections 2025: दिल्ली आणि बिहार, दोन्ही राज्यांमध्ये भाजप नेत्याचे मतदान

    Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी (६ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर आज आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. एका भाजप नेत्याने दिल्ली आणि बिहार या दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही भाजप नेत्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पण, भाजपने आपचा हा दावा फेटाळून लावत ‘आप’ निवडणुकीतील पराभवाच्या निराशेतून खोटी माहिती पसरवत असल्याचा पलटवार केला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Nov 2025 03:20 PM (IST)

    07 Nov 2025 03:20 PM (IST)

    Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”

    मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. आता यावर धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपाना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Nov 2025 03:10 PM (IST)

    07 Nov 2025 03:10 PM (IST)

    ट्रम्प यांच्या रशियावरील निर्बंधाने लागला चीन-भारताकडून रशिया तेल खरेदीला ब्रेक

    अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर काही निर्बंध लावले आहेत. त्यामुळे रशियन तेल खरेदीत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत आहे. ज्यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांनी रशियन तेल खरेदीला ब्रेक लावला आहे. अगदी किंमत कमी करूनही अनेक खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या निर्बंधांमुळे ब्रेंटच्या तुलनेत रशियन युरल्स क्रूडच्या किमती अजून खाली आल्याने ट्रम्प यांनी एका वारने ‘दोन घाव’ केल्याचे म्हंटले जात आहे. रशियन कंपनी ल्युकोइल आणि रोझनेफ्ट यांच्यावर लादलेल्या या निर्बंधांमुळे आशियातील तेल बाजारपेठ काही प्रमाणात विभागली गेली आहे. रशियाच्या तेल महसुलावर यामुळे मोठ्या प्रमाणात घट झाली असून नेमकं पुतीन भारताला भेट देण्यासाठी तयारीत असताना असे घडल्याने पुढे काय होईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

    वाचा सविस्तर

  • 07 Nov 2025 03:01 PM (IST)

    07 Nov 2025 03:01 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना आनंदाची बातमी!

    पुणे महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकत महापालिकेने ‘स्मार्ट’पणे संभाजीनगरकरांना चोवीस तास नळांना पाणी देण्याची योजना आखली. या योजनेला राज्य व केंद्र शासनाने देखील पाठबळ देत निधी पुरवला आहे. योजना पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत आयुक्त जी. श्रीकांत यांनी पार केली आहे. प्रतीक्षेत असलेल्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील मोठा अडथळा मुंबईतील करारानंतर दूर झाला आहे. महानगरपालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा म्हणून घेण्यात येणाऱ्या कर्जावर गुरुवारी मुंबईत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (MUIDCL) शी करारावर स्वाक्षरी करून नवीन वर्षात चोवीस तास नळाद्वारे पाणी देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 07 Nov 2025 02:57 PM (IST)

    07 Nov 2025 02:57 PM (IST)

    जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट

    २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. भारताने आपले पहिले जेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला आहे.  त्यामुळे आता भारतीय संघांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांना देखील भेटला आहे. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली, जिथे कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी त्यांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेले संघ जर्सी भेट दिली.

  • 07 Nov 2025 02:55 PM (IST)

    07 Nov 2025 02:55 PM (IST)

    शेतकरी प्रचंड अडचणीत, अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे कापू नका

    सांगली : सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत; जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून (कटिंग करून) घेऊ नयेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून, त्यांची आणखी परीक्षा पाहू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

  • 07 Nov 2025 02:41 PM (IST)

    07 Nov 2025 02:41 PM (IST)

    महायुती फुटणार? निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वबळाच्या तयारीत?

    प्रकाश वराडकर/रत्नागिरी:  राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्तरावरील ही निवडणूक असल्याने या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच शिवसेना-भाजपा व मित्र पक्षांची महायुती होणार की नाही? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोकणातही असेच काहीसे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.

  • 07 Nov 2025 02:30 PM (IST)

    07 Nov 2025 02:30 PM (IST)

    The Family Man 3 Trailer: जयदीप अहलावतच्या जाळ्यात अडकला 'श्रीकांत', मनोज बाजपेयी बनला 'मोस्ट वॉन्टेड मॅन'

    अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या लोकप्रिय मालिकेतील "फॅमिली मॅन" च्या सीझन ३ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक "फॅमिली मॅन ३" च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, वेब सिरीज पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. नवीन पात्रांच्या प्रवेशामुळे आणि नवीन कलाकारांसह, अ‍ॅक्शनचा अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मनोज बाजपेयीचा डार्क कॉमेडी विनोद आणि जयदीप अहलावत यांची हुशारी नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

  • 07 Nov 2025 02:23 PM (IST)

    07 Nov 2025 02:23 PM (IST)

    कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस नवी मालिका

    कलर्स मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे त्यांच्या भावनिक मालिकेद्वारे – ‘बाईपण जिंदाबाद’.प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे त्याग, समर्पण आणि जबाबदाऱ्यांनी विणलेली कहाणी असते. लग्नाआधी वडिलांचं घर सांभाळणारी मुलगी, लग्नानंतर नवऱ्याचं घर आणि संसार आपल्या खांद्यावर वाहते. तिचं स्वतःचं आयुष्य, तिचे स्वप्न, तिच्या इच्छा या सगळ्या ती कुठेतरी मागे ठेवते. नात्यांच्या बंधनात अडकलेली, पण त्याच नात्यांना जिवापाड जपणारी ही स्त्री म्हणजे ‘आई’. अशीच एक स्त्री, अशीच एक आई, आता स्वतःचं आयुष्य नव्यानं जगण्याचा निर्णय घेते. बाईपण जिंदाबाद या मालिकेच्या शृखंलेत येणारी तिसरी कथा आहे ‘आई रिटायर होतेय’. ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.

  • 07 Nov 2025 02:10 PM (IST)

    07 Nov 2025 02:10 PM (IST)

    संजय खान यांची पत्नी जरीन कात्रक यांचे निधन

    २०२५ हे वर्ष एकामागोमाग एका मृत्यूच्या बातम्यांनी हादरले आहे. कालच अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांच्या निधनाची बातमी आली असता. त्यांच्या निधनाच्या दुःखातून लोक सावरण्यापूर्वीच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एकाच दिवसात या इंडस्ट्रीला लागलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. अभिनेता संजय खानची पत्नी आणि जायद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

  • 07 Nov 2025 02:05 PM (IST)

    07 Nov 2025 02:05 PM (IST)

    आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    चिपळूण: खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विक्रांत भास्कर जाधव व अन्य दोन जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विक्रांत जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे.

  • 07 Nov 2025 02:00 PM (IST)

    07 Nov 2025 02:00 PM (IST)

    तलाठी, कोतवाल ACB च्या जाळ्यात; 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

    वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ रा. मगदुम कॉलनी जयसिंगपूर) असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील (वय ४५ रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली शहापुर) असे कोतवालचे नाव आहे. स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

  • 07 Nov 2025 01:50 PM (IST)

    07 Nov 2025 01:50 PM (IST)

    प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली

    भारतीय महिला संघाने झालेल्या विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली. यामध्ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन महिला विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केले आहे. आयसीसीचा नियम आहे की, संघातील पंधरा खेळाडू आहेत त्यांनाच बक्षिस रक्कम त्याचबरोबर मेडल दिले जाणार आहेत. यामध्ये भारताची फलंदाज प्रतिका रावल हिला सामन्यादरम्यान पायाला लागल्यामुळे तिला संघामधून बाहेर जावे लागले होते. त्यामुळे तिला कोणतेही मेडल विजय मिळवल्यानंतर देण्यात आले नाही.

  • 07 Nov 2025 01:40 PM (IST)

    07 Nov 2025 01:40 PM (IST)

    गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

    नराधम शिक्षकाने प्रेमाचा तगादा लावून नकार मिळाल्यानंतर आपल्या साथीदारासह विद्यार्थिनीचे अपहरण करून गुंगीचे औषध पाजत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना दोन महिन्यांपू्र्वी घडली होती. आता याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिक्षक महेश विजय मखमले (रा. मलकापूर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि त्याचा साथीदार सिद्धेश्वर जायभये (कारचालक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • 07 Nov 2025 01:30 PM (IST)

    07 Nov 2025 01:30 PM (IST)

    वंदे मातरमच्या १५० वर्षेपूर्ती दिनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे खास पत्र

    कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिले आहे की, भारताच्या राष्ट्रीय गीत – वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशवासियांना माझा संदेश. आज भारताच्या राष्ट्रीय गीत – वंदे मातरमचा १५० वा वर्धापन दिन आहे, ज्याने आपल्या राष्ट्राची सामूहिक भावना जागृत केली आणि स्वातंत्र्याचा नारा बनला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले, वंदे मातरम हे आपल्या मातृभूमीच्या, भारत मातेच्या, भारतीय लोकांच्या आत्म्याचे प्रतीक आहे आणि भारताच्या एकता आणि विविधतेचे प्रतीक आहे.

  • 07 Nov 2025 01:20 PM (IST)

    07 Nov 2025 01:20 PM (IST)

    अपोलो हॉस्पिटल्‍स नवी मुंबई विमानतळावर पुरवणार आरोग्यसुविधा

    नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (प्रा.) लि. ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) ऑपरेटर आणि नवी मुंबई बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटल्‍स यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्‍यसेवा देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर गुरुवारी स्‍वाक्षरी केली. विमानतळावरील कामकाज सुरू होण्‍यापूर्वी एनएमआयएच्या आपत्‍कालीन सुसज्‍जता आणि वैद्यकीय व्यवस्थेला बळकटी प्राप्त होणार आहे.

  • 07 Nov 2025 01:15 PM (IST)

    07 Nov 2025 01:15 PM (IST)

    आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना

    भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये आशिया कप 2025 मध्ये तीन वेळा पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना झाला होता. या तीनही सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करुन सामना जिंकून आशिया कप नावावर केला होता. महिला विश्वचषकामध्ये देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला होता पण कोणत्याही सामन्यामध्ये भारताच्या संघाने हँडशेक केला नाही त्याचा वाद पाहायला मिळाला होता. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. या स्पर्धेतील हा पहिला सामना असेल.

  • 07 Nov 2025 01:09 PM (IST)

    07 Nov 2025 01:09 PM (IST)

    चीनने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! एकाच वेळी आकाशात उडवले 1600 ड्रोन

    तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. जग जसजस पुढे जात आहे तसतसे नवनवीन चमत्कार आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. जग एआयमध्ये उंची गाठत असतानाच चीनने नवीन पराक्रम करुन दाखवला आहे ज्याने सर्वांचेच डोळे दिपले. रंगीबेरंगी दिव्यांनी प्रकाशित झालेल्या हजारो ड्रोनचा हा देखावा पाहण्यासारखा होता. हे दृश्य कुणालाही डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटेल असेच होते. ते पाहून असं वाटतं आहे की, जणू कोणत्या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे आणि याची सर्वात मोठी खासियत म्हणजे आकाशात उडवण्यात आलेले हे ड्रोन्स मानवनिर्मित नसून ते एआय प्रणालीद्वारे नियंत्रित केले जात होते.

  • 07 Nov 2025 12:00 PM (IST)

    07 Nov 2025 12:00 PM (IST)

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना एक चांगला मित्र आणि एक महान माणूस म्हटले. गुरुवारी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की भारतासोबत व्यापार चर्चा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत. ट्रम्प म्हणाले, "आम्ही अनेकदा बोलतो. त्यांना वाटते की मी भारतात यावे. आम्ही तोडगा काढू. मी जाईन... तो एक महान माणूस आहे आणि मी जाईन."

  • 07 Nov 2025 11:50 AM (IST)

    07 Nov 2025 11:50 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका, हत्येचा कट रचल्याचा आरोप

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला असल्याचा आरोप केला जात आहे. जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. २.५ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्ट दिल्याची नोंद झाली आहे.

  • 07 Nov 2025 11:45 AM (IST)

    07 Nov 2025 11:45 AM (IST)

    एलॉन मस्क यांना १ ट्रिलियन डॉलर्स मिळणार पगार

    टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी सीईओ एलोन मस्कसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वेतन पॅकेजला मंजुरी दिली आहे. हे पॅकेज जवळजवळ १ ट्रिलियन डॉलर्स (अंदाजे ₹८३ लाख कोटी) किमतीचे आहे. या निर्णयासह, मस्क जगातील पहिले ट्रिलियनेअर बनण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. तथापि, हे पॅकेज मिळविण्यासाठी, मस्कला कंपनीचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल, जास्तीत जास्त १० वर्षांचा कालावधी असणार आहे.

  • 07 Nov 2025 11:40 AM (IST)

    07 Nov 2025 11:40 AM (IST)

    मंत्रालयामध्ये वंदे मातरमचे सामूहिक गायन

    राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने मुंबईतील मंत्रालयामध्ये देखील खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले.

    LIVE | 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाच्या 150व्या वर्षानिमित्त समुह गायन

    🕙 स. ९.५९ वा. | ७-११-२०२५📍मंत्रालय, मुंबई.#Maharashtra #Mumbai #VandeMataram150 https://t.co/QDim44OGEc

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 7, 2025

     

     

  • 07 Nov 2025 11:35 AM (IST)

    07 Nov 2025 11:35 AM (IST)

    बिहारमध्ये वाढला नाही मतदानाचा टक्का

    "मतदानाचा टक्का वाढलेला नाही, मागील पद्धतीप्रमाणे, महागठबंधन सरकार स्थापन करेल", असे व्हीआयपी प्रमुख आणि महागठबंधनचे उपमुख्यमंत्री मुकेश सहानी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवर म्हटले आहे.

  • 07 Nov 2025 11:25 AM (IST)

    07 Nov 2025 11:25 AM (IST)

    पतंगीच्या नायलॉन मांजामुळे निष्पाप शेतकऱ्याचा मृत्यू

    वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील भिडी येथील एका दुचाकी चालकाचा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे गळ्याला फास लागून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भिडी येथील रस्त्यावर घडलेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • 07 Nov 2025 11:15 AM (IST)

    07 Nov 2025 11:15 AM (IST)

    वंदे मातरम १५० वर्षेपूर्तीच्या स्मरणार्थ खास नाणे प्रकाशित

    राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम् गीताच्या गौरवशाली १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही एक प्रेरणादायी हाक आहे जी आपल्या देशातील पिढ्यांना देशभक्तीची भावना जागृत करत आहे, अशा भावना पंतप्रधांनी व्यक्त केल्या. या दिनाच्या निमित्ताने एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले जाणार आहे.

  • 07 Nov 2025 11:02 AM (IST)

    07 Nov 2025 11:02 AM (IST)

    राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला झाली 150 वर्षे पूर्ण

    भारताचे राष्ट्रीय गीत असलेले 'वंदे मातरम्' या गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. १९३७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले, ज्यामुळे ते राष्ट्रीय गीत बनले आहे. आज संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे 150 वे वर्षे साजरे केले जात आहे.

  • 07 Nov 2025 10:57 AM (IST)

    07 Nov 2025 10:57 AM (IST)

    शिवम दुबेने सांगितला मास्टर प्लान!

    विजयानंतर शिवम दुबे म्हणाला, “गौती भाई (आशिष नेहरा) यांनी मला खूप पाठिंबा दिला. तुम्ही धाडसी गोलंदाजी करा, आम्ही तुमच्यासाठी आहोत, धावा होतील, पण मला तुम्ही स्वतःला व्यक्त करावे लागेल.” दुबे यांनी स्पष्ट केले की मोठ्या चौकार असलेल्या मैदानावर त्यांची योजना फलंदाजांना मोठे फटके मारण्यास भाग पाडणे होती. दुबे यांनी कबूल केले की मॉर्ने मॉर्केलच्या काही छोट्या टिप्समुळे त्यांच्या गोलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, जी तो मागील प्रयत्नांमध्येही साध्य करू शकला नव्हता.

  • 07 Nov 2025 10:47 AM (IST)

    07 Nov 2025 10:47 AM (IST)

    रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे!

    तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्हिआय युजर आहात का? सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं सांगितलं जात आहे की, टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. अनेक रिपोर्ट्मध्ये याबाबत दावा देखील केला जात आहे. या अपडेटमुळे आता सर्वच स्मार्टफोन युजर्सना मोठा झटका लागला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, डिसेंबर 2025 पासून Airtel, Jio आणि Vodafone Idea म्हणजेच Vi च्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

  • 07 Nov 2025 10:37 AM (IST)

    07 Nov 2025 10:37 AM (IST)

    गौरव खन्ना पहिल्यांदाच भडकला!

    बिग बॉस १९ च्या घराचा कर्णधार होण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून प्रयत्नशील असलेला टेलिव्हिजन अभिनेता गौरव खन्ना याला अलिकडच्या कॅप्टनसी टास्कमध्ये आणखी एक विश्वासघात सहन करावा लागला. प्रत्येक वेळी तो अव्वल स्पर्धक असूनही, नशीब पुन्हा एकदा त्याच्यासोबत आले नाही, ज्यामुळे तो गुरुवारीच्या भागात संतप्त आणि भावनिक झाला. गुरुवारी प्रसारित होणाऱ्या या भागात गौरवचा राग स्पष्टपणे दिसून येतो, जेव्हा त्याचे सहकारी स्पर्धक त्याची थट्टा करतात. निर्मात्यांनी शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये, घरातील सदस्य गौरवची थट्टा करताना दिसतात.

  • 07 Nov 2025 10:28 AM (IST)

    07 Nov 2025 10:28 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट

    मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून,  या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • 07 Nov 2025 10:19 AM (IST)

    07 Nov 2025 10:19 AM (IST)

    वयाच्या २१ व्या वर्षी मौनी रॉयसोबत धक्कादायक घटना

    बॉलीवूडच्या ग्लॅमरमागे नक्कीच एक रहस्यमय घटना लपलेले असते ज्याबद्दल अनेक कलाकार सांगताना दिसतात. अलिकडेच, अभिनेत्री मौनी रॉयने इंडस्ट्रीमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. स्पाइस इट अपवरील अपूर्वा मुखिजाशी झालेल्या संभाषणात, अभिनेत्रीने खुलासा केला की तिला कधीही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला नाही, परंतु वयाच्या २१ व्या वर्षी तिला एक धक्कादायक अनुभव आला. जो अभिनेत्रीने आता अनेक वर्षांनी शेअर केला आहे.

  • 07 Nov 2025 10:10 AM (IST)

    07 Nov 2025 10:10 AM (IST)

    सामन्याच्या मध्यभागी कॅप्टन दुबेवर का रागावला?

    ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य होते. १२ व्या षटकात शिवम दुबेने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज टिम डेव्हिडला बाद केले. त्यानंतर त्याने नवीन फलंदाज मार्कस स्टोइनिसवर दबाव आणला आणि दोन डॉट बॉल टाकले. तथापि, शेवटच्या चेंडूवर तो चुकला. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर एक शॉर्ट चेंडू टाकला आणि स्टोइनिसने त्याचा सहज फायदा घेतला आणि एक चौकार मारला. चेंडू सीमा ओलांडताच, कर्णधार सूर्याचे रागाचे भाव स्पष्ट दिसत होते. टीम इंडियाने दबाव वाढवला होता आणि शिवमने सैल चेंडू टाकून तो दबाव सोडला तेव्हा तो दुबेवर ओरडताना दिसला. सूर्याला त्याच्या विनोदी स्वभावासाठी खूप आवडते आणि मैदानावर त्याच्या आक्रमकतेने चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले.

  • 07 Nov 2025 09:55 AM (IST)

    07 Nov 2025 09:55 AM (IST)

    चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन

    Huawei ने त्यांचा नवीन आणि आणखी एक दमदार स्मार्टफोन आता चीनमध्ये लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Huawei Mate 70 Air या नावाने लाँच करण्यात आला असून तो मिडरेंज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची जाडी केवळ 6.6mm आहे. हा एक स्लिम 5G फोन आहे. यासोबतच या नवीन स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. सध्या हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

  • 07 Nov 2025 09:50 AM (IST)

    07 Nov 2025 09:50 AM (IST)

    उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात घातला फरशीचा तुकडा

    उधारीचे दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका कुटुंबाने शेजारील महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून फरशीचा तुकडा डोक्यात मारुन डोके फोडले. ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमाता नगरात घडली. भगवान बाबुलाल फतपुरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुली अशी महिलेला मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिरा आशोक फतपुरे (वय ३९, रा. संतोषी माता नगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली.

  • 07 Nov 2025 09:45 AM (IST)

    07 Nov 2025 09:45 AM (IST)

    यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्मासाठी केले दार बंद

    महिला प्रीमियर लीग २०२६ च्या मेगा लिलावापूर्वी, पाचही संघांनी त्यांच्या रिटेन्शन लिस्ट जाहीर केल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी पाच, RCB ने चार आणि गुजरात जायंट्सने दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. तथापि, UP वॉरियर्सने फक्त एका अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. फ्रँचायझीने भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणि क्रांती गौर सारख्या खेळाडूंनाही रिलीज केले आहे, ज्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये सामनावीर होत्या. दीप्तीच्या नेतृत्वाखाली, यूपी वॉरियर्स मागील हंगामात शेवटच्या स्थानावर राहिले.

  • 07 Nov 2025 09:40 AM (IST)

    07 Nov 2025 09:40 AM (IST)

    हे आहेत फ्री फायर मॅक्सचे 7 नोव्हेंबरचे रिडीम कोड्स

    • 68SZRP57IY4T2AH
    • V8CI2B3TL6QYXG7
    • WOPLMFJ4NTDHR3V
    • 4PAS6TQ87CXMLNV
    • NRD8L6Y7M4E29U1
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
  • 07 Nov 2025 09:35 AM (IST)

    07 Nov 2025 09:35 AM (IST)

    राज्यातील तब्बल 1650 खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही

    मुंबई : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळावे यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. त्यात आता शिक्षण विभागाच्या प्रकल्प मंजुरी मंडळाच्या तिमाही अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील तब्बल 1650 खेड्यांमध्ये आजही प्राथमिक शाळा नाहीत. तर 6563 खेड्यात शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितले.

  • 07 Nov 2025 09:30 AM (IST)

    07 Nov 2025 09:30 AM (IST)

    आदित्य इन्फोटेकसह या शेअर्समध्ये करा गुंतवणूक

    चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांनी खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आदित्य इन्फोटेक, सेनोरेस फार्मास्युटिकल्स, अटलांटा इलेक्ट्रिकल्स, आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स आणि सकार हेल्थकेअर यांचा समावेश आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports entertainment business weather reports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.