Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: जतमधील राजारामबापू कारखान्याचे नाव एका रात्रीत बदललं

Marathi breaking live marathi- काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी “राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे यंदा धुराडा पेटू देणार नाही, असा इशारा दिला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 02:50 PM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 Oct 2025 02:50 PM (IST)

    24 Oct 2025 02:50 PM (IST)

    बिहार निवडणुकीमध्ये ‘OBC कार्ड’ ठरणार गेमचेंजर?

    Bihar Elections 2025: बिहार : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची (Bihar elections) रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहारच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी हे आज (दि.24) बिहारच्या दौऱ्यावर असून समस्तीपूरमध्ये त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) पहिल्याच प्रचारसभेमध्ये ओबीसी समाजाचा उल्लेख करत जातीय राजकारणाला हात घातला.

  • 24 Oct 2025 02:45 PM (IST)

    24 Oct 2025 02:45 PM (IST)

    तमिळ अभिनेता के. श्रीकांत आणि कृष्णा कुमारच्या वाढल्या अडचणी

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित कोकेन प्रकरणासंदर्भात तमिळ अभिनेते के श्रीकांत आणि कृष्णा कुमार यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. चेन्नई झोनल ऑफिसने जारी केलेल्या समन्सनुसार, दोन्ही अभिनेत्यांना सोमवार आणि मंगळवारी तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

  • 24 Oct 2025 02:35 PM (IST)

    24 Oct 2025 02:35 PM (IST)

    फक्त डिझाइनच नाही तर तुमच्या राशीनुसार परिधान करा या एंगेजमेंट रिंग

    लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचे मिलन नसते, तर ते दोन कुटुंबांचे मिलन असते. लग्न समारंभ हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि मुख्य आकर्षण म्हणजे लग्नाची अंगठी. हे केवळ दागिन्यांचा तुकडा नसून प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या सहवासाचे प्रतीक आहे. बऱ्याचदा, महिला केवळ डिझाइन किंवा किंमतीनुसार अंगठी निवडतात, परंतु ज्योतिष आणि राशीच्या चिन्हावर आधारित योग्य अंगठी निवडणे देखील महत्त्वाचे आहे. चुकीच्या अंगठीची निवड केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनात संघर्ष आणि दुःख येऊ शकते. योग्य अंगठी तुमच्या नात्यात प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवाद आणू शकते.

  • 24 Oct 2025 02:35 PM (IST)

    24 Oct 2025 02:35 PM (IST)

    भय इथले… कधी संपणार? GST सवलती असूनही ‘या’ कंपनीचा शेअर कोसळला

    FMGC Stocks Marathi News: एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि तो दिवसाच्या नीचांकी पातळीवर ₹२,४७४ वर पोहोचला. कंपनीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले, ज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.६ टक्के नफ्यात वाढ झाली आहे. तरीही, शुक्रवारी शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.

  • 24 Oct 2025 02:30 PM (IST)

    24 Oct 2025 02:30 PM (IST)

    बिहारमध्ये एनडीए आणि सुशासनाचे सरकार असेल,” पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं?

    Narendra Modi on Bihar Election 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर असून समस्तीपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी महाआघाडीवर निशाणा साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, एनडीए आणि सुशासन पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन करेल. तसेच यावेळी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, एनडीए विजयाचे मागील सर्व विक्रम मोडेल. बिहार एनडीएला आतापर्यंतचा सर्वात मोठा जनादेश देईल.

  • 24 Oct 2025 02:25 PM (IST)

    24 Oct 2025 02:25 PM (IST)

    Apple चा मास्टरस्ट्रोक! iPhone 18 नंतर थेट लाँच होणार 20 सिरीज?

    जगभरातील लोकप्रिय स्मार्टफोन आयफोनबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या आयफोन 17 सिरीज लाँच केली. बऱ्याच वर्षानंतर आयफोन सिरीजच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले होते. 2026 मध्ये कंपनीची आयफोन 18 सिरीज लाँच केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. या सिरिजमध्ये फोल्डेबल आयफोन लाँच केला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

  • 24 Oct 2025 02:18 PM (IST)

    24 Oct 2025 02:18 PM (IST)

    लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीचा गैरफायदा

    बॉलीवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन आणि जिगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यातील सचिन संघवी याच्यावर लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४९ वर्षांचा हा संगीतकार असून त्याने एका १९ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. सचिन- जिगर ही बॉलीवूडची फेमस संगीतकार जोडी आहे. दोघांची अनेक गाणी हिट झाली आहे. त्यांच्याबाबत अशी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • 24 Oct 2025 02:00 PM (IST)

    24 Oct 2025 02:00 PM (IST)

    लेन्सकार्ट, ग्रो आणि पाइन लॅब्स मिळून 35,000 कोटी रुपये उभारणा

    भारतातील शेअर बाजार पुन्हा एकदा तेजीत आहे. निफ्टी ५० त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. त्याच वेळी, प्राथमिक बाजार किंवा आयपीओ बाजाराने पुन्हा एकदा गती घेतली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रभावी लिस्टिंगनंतर, पाच प्रमुख कंपन्या आता पुढील दोन महिन्यांत अंदाजे ₹३५,००० कोटी उभारण्याच्या तयारीत आहेत.

  • 24 Oct 2025 01:55 PM (IST)

    24 Oct 2025 01:55 PM (IST)

    Thamma’ने ३ दिवसांत बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

    फक्त तीन दिवसांतच ‘थामा’ने तब्बल ५५ कोटींची नेट कमाई केली आहे. या आकड्यामुळे ‘थामा’ने या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पाच प्रमुख हिंदी चित्रपटांचे तीन दिवसांचे कलेक्शन ओलांडले आहे.

  • 24 Oct 2025 01:55 PM (IST)

    24 Oct 2025 01:55 PM (IST)

    चीन सीमारेषेवर लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी

    भारत-चीन सीमारेषेवर चीन सैन्याच्या हालचाली वाढवल्या असून सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करताना दिसत आहे. चीनने लाहुंजे एअरबेसवर अनेक मोठे बदल केले आहेत. अलिकडच्या काळात लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची जलद बांधकाम सुरू केले आहे. याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमाने आणि हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 36 नवीन, मजबूत आश्रयस्थाने बांधण्यात आली आहेत.

  • 24 Oct 2025 01:52 PM (IST)

    24 Oct 2025 01:52 PM (IST)

    Maithili Thakur Makhana: पागमध्ये भरुन मखाना खाल्यामुळे मैथिली ठाकूर ट्रोल

    मैथिली ठाकूर हिने भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. प्रचाऱ्याच्या रणधुमाळीमध्ये प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिने मिथिला पगडी असलेल्या पागमध्ये भरुन मखाना खाल्ला. याचा व्हिडिओ समोर आला असून जोरदार वाद निर्माण झाला आहे.

    थैंक यू मैथिली ठाकुर आज आपने पूरे मिथिला को पाग का सही उपयोग करना सिखाया । पाग को मखान बॉक्स के रूप में प्रयोग करना अति मनभावन है। आप इसमें डाल कर समोसा खाओ, आप इसमें भुजा खाओ आपका जी करे तो इसे डस्टबिन बना डालो। अरे पाग ही तो है इसे हवा में उछाल दो फेंक दो क्या फर्क पड़ता है।… pic.twitter.com/jMbc5XrU4O

    — Uday Chatterjee (@UdayChatterje) October 23, 2025

  • 24 Oct 2025 01:49 PM (IST)

    24 Oct 2025 01:49 PM (IST)

    कोंढव्यात टोळक्याची दहशत, दुकानाची तोडफोड

    ऐन दिवाळीतही गुन्हेगारीच्या घटना पुण्यात सुरुचं आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून टोळक्यांचा धुडगूस सुरुच आहे. टोळके परिसरात दहशत माजवून दुकांनांची तोडफोड करत आहेत. टोळक्यांचा बदोबस्त करण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात टोळक्याने दहशत माजवून दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर तीक्ष्ण शस्त्रे उगारून आणि गोंधळ घालून दहशत माजवत मोठा राडा देखील घातला आहे. पोलिसांनी यानंतर तिघांना अटक केली आहे.

  • 24 Oct 2025 01:48 PM (IST)

    24 Oct 2025 01:48 PM (IST)

    जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांचे ७० व्या वर्षी निधन

    भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज निर्माता पियुष पांडे यांचे ७० व्या वर्षी निधन झाले आहे. अब की बार मोदी सरकार हे वाक्य देखील त्यांनीच म्हटले होते. त्यांच्या जाण्याने जाहिरात विश्वास शोककळा पसरली आहे.

  • 24 Oct 2025 01:47 PM (IST)

    24 Oct 2025 01:47 PM (IST)

    BiharElection2025 : PM मोदी बिहारच्या दौऱ्यावर, जोरदार प्रचाराला सुरुवात

    बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौरा केला आहे. जननायक कर्पुरी ठाकूरजींची भूमी असलेल्या समस्तीपूरमधील माझ्या कुटुंबातील सदस्यांचा प्रचंड उत्साह स्पष्टपणे दर्शवितो की यावेळी बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला

  • 24 Oct 2025 01:05 PM (IST)

    24 Oct 2025 01:05 PM (IST)

    आंध्र प्रदेशात बसला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

    आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. एक बाईक व्होल्वो बसला येऊन धडकल्यामुळे बसने अचानक पेट घेतला आणि या आगीत जवळपास 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून बस पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. तर ही बस हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती.

  • 24 Oct 2025 12:55 PM (IST)

    24 Oct 2025 12:55 PM (IST)

    दलित तरुणाला अमानुष मारहाण; प्रकाश आंबेडकरांची ‘मकोका’ लावण्याची मागणी

    अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील काही गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित तरुणाचे हात-पाय मोडले असून, त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. आरोपींनी क्रूरतेची हद्द ओलांडत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले. या घृणास्पद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 24 Oct 2025 12:45 PM (IST)

    24 Oct 2025 12:45 PM (IST)

    पत्नीने केली पतीची हत्या

    पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नकुल भोईर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची पत्नी चैताली भोईर हिला पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

  • 24 Oct 2025 12:35 PM (IST)

    24 Oct 2025 12:35 PM (IST)

    इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामांतरलाला मंजुरी

    राज्य सरकारने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर केले होते. या नामांतराला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

  • 24 Oct 2025 12:32 PM (IST)

    24 Oct 2025 12:32 PM (IST)

    महिला डाॅक्टरची आत्महत्या, पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची सुसाईड नोट

     

    सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर महिला डाॅक्टरने सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक गोपाळ बदने यांनी माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले आहे.

  • 24 Oct 2025 12:29 PM (IST)

    24 Oct 2025 12:29 PM (IST)

    निलेश घायवळची कार जप्त

    कुख्यात गुंडे निलेश घायवळची चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ऊसाच्या शेतात लपवून ठेवली होती चारचाकी.अहिल्यानगर मधील जामखेड मध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती ८०५५ नंबर असलेल्या या गाडीला "BOSS" अशी नंबर प्लेट होती.पुणे पोलिसांनी थेट जामखेड मधील खर्डा गावात जाऊन केली कारवाई

  • 24 Oct 2025 12:00 PM (IST)

    24 Oct 2025 12:00 PM (IST)

    आंध्र प्रदेशात 40 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसला आग, 12 जणांचा मृत्यू

    आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी एका व्होल्वो बसला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही व्होल्वो बस ४० जणांना घेऊन हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती अशी माहिती सांगितली जात आहे.

  • 24 Oct 2025 11:50 AM (IST)

    24 Oct 2025 11:50 AM (IST)

    साताऱ्यात महिला डॉक्टरने गळफास लावून संपवले जीवन

    साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडेने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकल्या होत्या. डॉ. मुंडे या एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी झालेल्या वादामुळे चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.

  • 24 Oct 2025 11:40 AM (IST)

    24 Oct 2025 11:40 AM (IST)

    दिवाळीत दिल्लीकरांनी तब्बल ६०० कोटी रुपयांची दारू रिचवली

    दिवाळीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये मदयविक्रीने उच्चांग गाठला आहे. दिवाळीत १५ दिवसांत दिल्लीकरांनी तब्बल ६०० कोटी रुपयांची दारू रिचवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही १५ टक्के वाढ आहे. यामुळे सर्वच चर्चा रंगली आङे.

  • 24 Oct 2025 11:30 AM (IST)

    24 Oct 2025 11:30 AM (IST)

    कार्यकर्त्यांचे व्हॉटसअप सर्वेलन्सवर टाकले आहेत - चंद्रशेखर बावनकुळे

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. भंडारा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप नेते व मंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वलन्सवर टाकले आहेत. तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

  • 24 Oct 2025 11:20 AM (IST)

    24 Oct 2025 11:20 AM (IST)

    मुस्लिम हिताचे पालनपोषण करणारे फक्त नरेंद्र मोदी- मनोज तिवारी

    बिहारमध्ये महागठबंधनने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्याबाबत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी टीका केली. ते म्हणाले की, "महागठबंधनला मुस्लिमांच्या कल्याणाची काळजी नाही. ते फक्त मतांसाठी आहेत. जर कोणी खरोखर मुस्लिम हिताचे पालनपोषण करत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. रेशन असो, घरे असो किंवा रस्ते असो, सर्व काही मोदी सरकारने दिले आहे. आज मुस्लिमांना विश्वासघात झाल्यासारखे वाटत आहे..." खेसारी लाल यादव यांनी रवी किशन यांच्यावरील टिप्पणीला उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाले ती, "तो माझा धाकटा भाऊ आहे आणि मी नेहमीच त्याचा आदर करेन. पण राजकारणात प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो, जो आदरास पात्र आहे. आसारामशी केलेली तुलना पूर्णपणे निराधार आहे."

  • 24 Oct 2025 11:10 AM (IST)

    24 Oct 2025 11:10 AM (IST)

    सावरकरांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच साजरी केली विजयादशमी

    भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढण्यासाठी आणि ख्रिश्चन सणांचा प्रभाव कमी करण्यासाठी वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच दसरा साजरा करण्यात आला. 1909 मध्ये आजच्या दिवशी सावरकर यांनी क्कीन्सरोड डॉल येथे दसरा सोहळ्याचे आयोजन केले. यामध्ये ब्रिटीश विद्यार्थ्यांना येण्यास मज्जाव घालण्यात आला. या सोहळ्यासाठी 100 हून अधिक परदेशामध्ये राहणारे भारतीय लोक जमले होते. हॉलमध्ये भारतीय पद्धतीने जेवणाच्या पंक्ती बसवण्यात आल्या होत्या. धुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. मध्यभागी ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर ठळक अक्षरात वंदे मातरम असे लिहिण्यात आले होते. राष्ट्रगीताच्या स्वराने कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणली होती. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी खास या कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. अली अझीझ हे आफ्रिकेतील त्यांचे सहकारी सोबत होते.

  • 24 Oct 2025 11:00 AM (IST)

    24 Oct 2025 11:00 AM (IST)

    ...तर मला पक्षातून काढा’; रविंद्र धंगेकरांचं थेट उपमुख्यमंत्री शिंदेंनाच आव्हान

    जैन समुदायाच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा संघर्ष सुरूच राहील. जर माझी अडचण होत असेल तर मला पक्षातून काढून टाकावे, असे आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सत्ताधारी महायुती आघाडीत राहून धंगेकर यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. यामुळे भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

  • 24 Oct 2025 10:50 AM (IST)

    24 Oct 2025 10:50 AM (IST)

    ‘माझ्यासोबत पंगा घेऊन तर बघ…,’ तान्यावर भडकला अमाल

    प्रोमोमध्ये, तान्या आणि नीलम त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमाल मधेच बोलण्यास सुरुवात करतो. तान्या म्हणते, “उगाच मध्ये बावळू नकोस. मी तुझ्याशी बोलत नाही आहे.” संतापलेला अमाल म्हणतो, “मी तिथे येईन, मला थांबव. तुला माझ्याशी भांडायचे आहे. चल, माझ्याशी भांड.” अमाल आणि तान्यामधील हा वाद पाहून कुटुंबातील इतर सदस्यांना धक्का बसला आहे. काही जण तर अमालशी सहमत असल्याचेही दिसून येत आहे.

  • 24 Oct 2025 10:42 AM (IST)

    24 Oct 2025 10:42 AM (IST)

    राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात कुणी बदलले

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारख्यान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयंत पाटील यांच्या कारखान्याचे नाव राजारामबापू सहकारी साखर कारखाना असे होते. पण काल रात्री कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 24 Oct 2025 10:30 AM (IST)

    24 Oct 2025 10:30 AM (IST)

    खेळाखेळात चिमुकलीने नाकात घुसवली टोकदार पेन्सिल

    लहान मुलांचे जग हे मस्तीच्या विश्वात रंगलेलं असतं. इथे ते कधी स्वत:च्या जीवीलाही धोका निर्माण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मुलीने खेळतीना चुकून आपल्या नाकात पेन्सिल घुसवली, ज्यानंतर तिच्या नाकपुड्या पूर्णपणे बंद झाल्याचे व्हिडिओत दिसून येते. मुलीच्या आईने मुलीला पाहताच ती अस्वस्थ असल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिच्या नाकातून रक्तस्त्रावही होत होता. आईला भिती वाटली आणि तिने तातडीने मुलीला डाॅक्टरांकडे नेले. काळजीपूर्वक पाहताच तिच्या नाकात काहीतरी अडकल्याचे त्यांच्या ध्यानात आले, ज्यानंतर डाॅक्टरांनी फार सफाईने मुलीच्या नाकात अडकलेली पेन्सिल बाहेर काढली. ही घटना पालकांना लहान मुलांवर बारकाईने लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

  • 24 Oct 2025 10:20 AM (IST)

    24 Oct 2025 10:20 AM (IST)

    णे-मुंबईसह २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

    मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 24 Oct 2025 10:10 AM (IST)

    24 Oct 2025 10:10 AM (IST)

    युजवेंद्र चहलच्या बहिणीने धनश्री वर्मावर केली टीका

    केना द्विवेदीने लिहिले, “तू तो माणूस आहेस जो खरोखर महिलांचा आदर करतो, प्रत्येक स्त्रीला “मॅडम” म्हणून संबोधतो, तुझ्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करतो आणि जग तुझ्यासोबत वाईट झाले तरीही शांत राहतोस. जेव्हा मी नाराज होऊन विचारते, “तू काही बोलत का नाही?”, तेव्हाही तू मला नेहमीच आठवण करून देतो की कधीकधी, वेळ सर्वकाही बरे करते आणि शांतता सर्वात जास्त बोलते.” असे लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

  • 24 Oct 2025 10:03 AM (IST)

    24 Oct 2025 10:03 AM (IST)

    गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह

    फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप नावाचा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे युजर्स ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन एक्सेस करू शकणार आहेत. हा फ्री फायर मॅक्समधील एक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी असलेली डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत आणि स्पिन करावं लागणर आहे. प्रत्येक स्पिनेवेळी तुम्हाला या ईव्हेंटमधील एक रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. 7 वेळा स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना गेममध्ये मिळणार ग्रँड प्राईज क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • 24 Oct 2025 10:02 AM (IST)

    24 Oct 2025 10:02 AM (IST)

    आंध्र प्रदेशात भीषण अपघात; धावत्या बसला आग लागून २० प्रवाशांचा मृत्यू

    आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने २० प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रात्री उशिरा घडली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसची दुचाकीशी टक्कर झाली आणि त्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला. आग इतकी भयानक होती की, प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, अनेक प्रवासी झोपेतच अडकले आणि कोळसा झाले.

  • 24 Oct 2025 09:59 AM (IST)

    24 Oct 2025 09:59 AM (IST)

    दिवाळीत आदिवासी कुटूंबावर दुःखाचा डोंगर!

    दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर मधील मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दिनांक 22 ला सकाळी दाखल केले होते. मात्र प्रसूती दरम्यान केवळ एक परिचरिका उपलब्ध होती.त्या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बाल मृत्यू घडल्याने मोखाडा तालुक्यात खळबल उडाली आहे आणि आरोग्य यंत्रनेचे लक्तरे वेशिवर टांगली गेली आहेत. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 24 Oct 2025 09:53 AM (IST)

    24 Oct 2025 09:53 AM (IST)

    ‘एक दीवाने की दिवानीयत’ साठी प्रेक्षक वेडे

    २०१६ च्या रोमँटिक ड्रामा “सनम तेरी कसम” द्वारे हर्षवर्धन राणेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या दिवाळीत, तो सोनम बाजवासोबत “एक दीवाने की दीवानीयत” द्वारे मोठ्या पडद्यावर परतला. मनोरंजक गोष्ट म्हणजे, या चित्रपटाला आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या “थामा” कडून जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली आहे, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. मोठ्या आणि जोरदार मार्केटिंग असलेल्या चित्रपटासोबत स्क्रीन स्पेस शेअर करूनही, “एक दीवाने की दीवानीयत” देखील चांगली कमाई करत आहे. दमदार ओपनिंगनंतर, त्याने दुसऱ्या दिवशीही चांगले कलेक्शन केले. “एक दीवाने की दीवानीयत”ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे जाणून घेऊयात.

  • 24 Oct 2025 09:48 AM (IST)

    24 Oct 2025 09:48 AM (IST)

    धडाधड होणार नफा! आज मार्केट ओपनिंग होणार पॉझिटिव्ह

    जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि संकेतांचा विचार केला तर आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक दिशेने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,०२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४६ अंकांनी जास्त होता.

  • 24 Oct 2025 09:42 AM (IST)

    24 Oct 2025 09:42 AM (IST)

    मोठा दिलासा! सोनं-चांदी स्वस्त झालं

    भारतात 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,507 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,464 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,380 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,800 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 158.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,58,900 रुपये होता.

  • 24 Oct 2025 09:35 AM (IST)

    24 Oct 2025 09:35 AM (IST)

    आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे बसला भीषण आग

    कुरनूल : आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादहून बंगळुरूला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

  • 24 Oct 2025 09:25 AM (IST)

    24 Oct 2025 09:25 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेत पुरुषांची ‘एंट्री’

    मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील घोटाळा उघडकीस आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेचा हजारो पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतला. महिला आणि बालविकास विभागातील सूत्रांचा हवाला देत काही अहवालात १२४३१ पुरुषांनी या योजनेचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • 24 Oct 2025 09:15 AM (IST)

    24 Oct 2025 09:15 AM (IST)

    एनडीएत जलतरण सरावादरम्यान कॅडेटचा मृत्यू

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधील १८ वर्षीय कॅडेटचा जलतरण सरावादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव कॅडेट आदित्य डी. यादव असे असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नियमित प्रशिक्षणादरम्यान आदित्य यादव जलतरण सराव करत असताना बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • 24 Oct 2025 09:10 AM (IST)

    24 Oct 2025 09:10 AM (IST)

    राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; २६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

    राज्यातून मान्सून माघारी गेल्यानंतरही पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यातील २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 24 Oct 2025 09:04 AM (IST)

    24 Oct 2025 09:04 AM (IST)

    जीडीपी, महागाई आणि औद्योगिक उत्पादनाचे आकडे होणार अद्ययावत

    पुढील वर्षी भारताच्या आर्थिक चित्रात मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी तयारी सुरू केली असून, देशातील लोकांचे उत्पन्न आणि खर्च मोजण्याची पद्धत आता नव्याने आखली जाणार आहे. या बदलाचा एक भाग म्हणून देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब दर्शवणारे प्रमुख आकडे — जसे की जीडीपी, महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक — अद्यतनित केले जाणार आहेत. यासोबतच, अर्थव्यवस्थेतील वेगाने वाढणाऱ्या सेवा क्षेत्राच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक नवीन निर्देशांक देखील सादर करण्याची तयारी सुरू आहे.

  • 24 Oct 2025 09:00 AM (IST)

    24 Oct 2025 09:00 AM (IST)

    टीम इंडियाचा दमदार विजय; महिला वनडे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश

    महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश करत मोठी झेप घेतली आहे. नवी मुंबईतील २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर डकवर्थ-लुईस नियमांनुसार ५३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने सेमीफायनलसाठी पात्र ठरणारी चौथी आणि शेवटची टीम म्हणून आपले स्थान पक्कं केले. भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघांनीही उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमध्ये याच तीन संघांकडून भारताला सलग पराभवांचा सामना करावा लागला होता. आता क्रीडाप्रेमींच्या मनात एकच प्रश्न आहे — सेमीफायनलमध्ये भारताची भिडंत कोणाशी होणार? हे निश्चित होताच पुन्हा एकदा रोमांचक लढतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Marathi Breaking news live updates- तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर आता ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून, “राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही” असा इशारा दिला होता. त्यामुळे या घटनेमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात रंगली आहे.

 

 

 

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national sports crime international business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  बांगलादेशच्या खराब खेळीमुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित
1

Top Marathi News Today: बांगलादेशच्या खराब खेळीमुळे श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार
2

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी
3

Top Marathi News Today Live: हाँगकाँग विमानतळावर बोईंग ७४७ कार्गो विमान कोसळले; दोन जणांचा मृत्यू, चार जखमी

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार
4

Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.