जस्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या काही ना काही कारणाने चर्चेत असतो. तो कधी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने चर्चेत येतो वा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. मागील वर्षी हार्दिक पांड्याचा मॉडेल नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट झाला होता. तर आता मात्र त्याचे हर्ट ब्रेक झाल्याची बातमी समोर आली आहे. ब्रिटिश-भारतीय गायिका जस्मिन वालिया आणि हार्दिक पंड्या यांच्यातील दुराव्याची बातमी समोर आली आहे.
हार्दिक पंड्या आणि स्मिन वालिया या दोघांचे ब्रेक अप झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीचा हा शेवट झाला कि काय? अशी चर्चा आता तोंड वर काढत आहे. हार्दिक पांड्या किंवा जस्मिन या दोघांनी देखील कधी त्यांच्यातील नात्याबद्दल अधिकृतरित्या असे काही भाष्य केलेले नाही. मात्र हे दोघे एकमेकांच्या प्रेमातअसल्याच्या चर्चा मात्र सातत्याने होत आल्या आहेत. अशातच आता या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. यावरून दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. सोशल मीडियावर या अफवा वेगाने पसरत आहे. आता जेव्हा जस्मिनच्या फॉलोअर्सच्या यादीमध्ये हार्दिकचे नाव शोधायलाच गेल्यास तिथे हार्दिकचे नाव दिसत नाही. तसेच हार्दिकच्या प्रोफाइलमध्ये देखील जस्मिनचे नाव दिसून येत नाही. यामुळे या आता दोघांच्या चाहते अंदाज बांधत आहेत की, दोघांमध्ये नक्कीच काही टोकाचे मतभेद निर्माण झाले असावे. यामुळे दोघांनी एकमेकापासून दूर होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा. अशी देखील चर्चा होताना दिसत आहे. वास्तविक जाहीररित्या या दोघांकडून आपल्या नात्याबद्दल किंवा त्यात आलेल्या दुराव्याबद्दल बोलायचे टाळले आहे.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे यापूर्वी मॉडेल नताशा स्टँकोविक सोबत लग्न झाले होते. गेल्या वर्षी या दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगा ज्याचे नाव अगस्त्य आहे. घटस्फोट जरी झाला असला तरी या दोघांकडून मुलाचे सह पालनपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोघांकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. त्यात त्यांनी म्हटले होते कि, आपण घटस्फोट घेत असल्याचे कळवण्यात आले होते.
हेही वाचा : टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ‘हा’ खेळाडू; न खेळण्याचे कारण आले समोर..