बलुचिस्तान अटलबिहारी वाजपेयींना कधीही विसरू शकत नाही, मीर यार या बलुच नेत्याला का आली आठवण माजी भारतीय पंतप्रधानांची ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Mir Yar Baloch tribute to Atal Bihari Vajpayee 2025 : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज १०१ वी जयंती. संपूर्ण भारतात आज ‘सुशासन दिन’ साजरा होत असताना, भारताच्या सीमा ओलांडून शेजारील देश पाकिस्तानमधील बलुचिस्तान(Balochistan )प्रांतातून एक अत्यंत हृदयस्पर्शी संदेश समोर आला आहे. बलुचिस्तानचे निर्वासित नेते आणि पाकिस्तानी लष्कराचे कट्टर विरोधक मीर यार बलोच यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना मानवंदना दिली आहे. ही केवळ श्रद्धांजली नसून, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी वाजपेयींचे नाव आजही किती आदराचे आहे, याचे जिवंत उदाहरण आहे.
मीर यार बलोच यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अटलजींचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज २५ डिसेंबर २०२५ रोजी, बलुचिस्तान प्रजासत्ताकाचे लोक अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यासाठी जगातील लाखो लोकांसोबत सामील होत आहेत. ते असे राजकारणी होते ज्यांचे जीवन प्रामाणिकपणा, शालीनता आणि देशाप्रती असलेल्या अटल वचनबद्धतेने परिपूर्ण होते.” मीर यार हे सातत्याने पाकिस्तानी सरकार आणि लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठवत असतात. त्यांनी अटलजींना दिलेली ही श्रद्धांजली पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Prophecy : बायबलमधील ‘नोहा’ परतला? घानामध्ये हजारो लोक Eboh Noaजवळ आश्रय घेताना दिसले, पहा VIDEO
अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना मीर यार पुढे म्हणतात की, वाजपेयींनी नेहमी सत्याची साथ दिली. ते एका कवीच्या संवेदनशीलतेने राजकारण हाताळायचे. विरोधकांसोबत काम करण्याची आणि त्यांनाही आपलेसे करण्याची त्यांची कला आजच्या काळात दुर्मिळ आहे. केवळ त्यांच्या पदासाठी नाही, तर त्यांच्या चारित्र्यासाठी, नम्रतेसाठी आणि नैतिक शक्तीसाठी संपूर्ण बलुचिस्तान त्यांचा आदर करतो. मीर यार यांच्या मते, अटलजींचे विचार आजही बलुच जनतेला एका उज्ज्वल आणि ध्येयवादी भविष्याची आशा देतात.
25 December 1924 – 16 August 2018#AtalBihariVajpayee Today on 25 December 2025, the people of the Republic of Balochistan join millions across the world in remembering the birth anniversary of Shri Atal Bihari Vajpayee Ji, a statesman whose life was defined by honesty, grace,… pic.twitter.com/ll3PG5Hdrm — Mir Yar Baloch (@miryar_baloch) December 24, 2025
credit : social media and Twitter
मीर यार बलोच हे बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लढा देत आहेत. ते अनेकदा भारतीय नेत्यांचे आणि भारताच्या लोकशाही मूल्यांचे कौतुक करत असतात. अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातून हे स्पष्ट होते की, दक्षिण आशियातील शोषित समुदायांसाठी भारताचे ‘अजातशत्रू’ पंतप्रधान आजही एक प्रेरणास्थान आहेत.
अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्यावर विरोधकही प्रेम करायचे. १९९६ ते २००४ या काळात त्यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले. नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या वाजपेयींना २०१५ मध्ये ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले होते. पोखरण अणू चाचणी असो किंवा कारगिल युद्धातील विजय, अटलजींनी भारताला नेहमीच खंबीर नेतृत्व दिले. आज त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त बलुचिस्तानमधून आलेली ही दाद त्यांच्या जागतिक उंचीची साक्ष देते.
Ans: त्यांनी अटलजींना 'प्रामाणिकपणा आणि नैतिक शक्तीचे प्रतीक' असलेला एक महान जागतिक नेता म्हणून संबोधले आहे.
Ans: बलुच फुटीरतावादी नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अटलजींच्या विचारांचा गौरव केला आणि त्यांना 'बलुचिस्तानचा आदरणीय नेता' म्हटले.
Ans: अटलबिहारी वाजपेयी यांना २०१५ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला.






