Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धामुळे विवाह अडचणीत! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली

जेवणाच्या ऑर्डर एक ते दोन महिने आधी केटरिंग व्यावसायिकांना दिल्या जातात. अशात गॅस टंचाईमुळे लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या? असा प्रश्न केटरिंग व्यावसायिकांसमोर उभे राहिले आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2026 | 10:51 AM
युद्धामुळे विवाह अडचणीत! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली

युद्धामुळे विवाह अडचणीत! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:

आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे झालेल्या घरगुती वापराच्या गॅस टंचाईचे परिणाम आता लग्नसराईच्या कार्यक्रमांवरही दिसू लागले आहेत. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी वधू-वराकडून भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यासाठी जेवणाच्या ऑर्डर एक ते दोन महिने आधी केटरिंग व्यावसायिकांना दिल्या जातात. अशात गॅस टंचाईमुळे लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या? असा प्रश्न केटरिंग व्यावसायिकांसमोर उभा राहिल्याने अनेक केटरिंग व्यावसायिकांनी स्वीकारलेल्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता लग्नाच्या तारखा पुढे ढकलायच्या की अन्य पर्याय शोधायचे, या विचारात वाग्दत्त वर-वधू ‘गॅस’वर आहेत.(फोटो सौजन्य – AI)

LPG Shortage Crisis : एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब! मुंबईतील ‘या’ भागातील इडली-डोसा स्टॉल बंद

विवाहसोहळा थाटात पार पडावा, आलेल्या पाहुण्यांना उत्तम चवीचे जेवण मिळावे यासाठी दोन ते चार महिने आधी हॉल आणि केटरिंग बुक केले जातात. मात्र, अचानक आलेल्या गॅस संकटामुळे पत्रिका वाटलेल्या असताना लग्न पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचे काही भावी वधू-वरांनी सांगितले. केटरिंग व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करूनही उपाय होत नसल्याचे नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलण्याचा विचार असल्याचे वधू-वरांचे म्हणणे आहे. आम्ही ज्या केटरिंग व्यावसायिकांकडे बुकिंग केले होते, त्यांचा आम्हाला फोन आला आणि तुमची ऑर्डर आम्ही पूर्ण करू शकत नाही, असे त्यानी सांगितले. आम्ही त्याना अन्य उपाय करण्याची विनंती केली. सोबतच तुमच्या ओळखीतील अन्य केटरिंग सुचवण्याची विनंती केली. मात्र, सर्वच केटरिंग व्यावसायिक सारख्याच परिस्थितीतून जात असल्याने कोणीही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तयार नसल्याची माहिती काही वधू वरांनी दिली आहे.

मजुरांच्या रोजगारावर विपरित परिणाम

काही कॅटरिंग व्यावसायिकांनी विद्युत शेगडी व कोळशाच्या शेगडीचा पर्याय शोधला आहे. यातून व्यावसायिक ग्राहकांना सर्विस देत असले तरी त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडल आहेत. गॅसवर ५०० लोकांचे जेवण बनवायला जितका वेळ लागतो, त्याच्या दुप्पट वेळ विद्युत शेगडी किवा कोळशाच्या शेगडीवर जेवण बनवायला लागतो आहे. त्यामुळे मजुरीही जास्त लागते आहे. आम्ही मुंबईत बऱ्याच ठिकाणी गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेसाठी चौकशी केली. पण, सिलेंडरची उपलब्धता नसल्याचे काही पुरवठादारांनी सांगितल्याची माहिती माऊली केटरर्सच्या वैभव लांबे यांनी दिली, लग्न सराईच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रात दरवर्षी लाखो विवाह सोहळे पार पडतात. यातून लग्न हॉल मालक, केटरिंग व्यावसायिक आणि या ठिकाणी काम करणारे मजूर यांच्यासह अनेकांना रोजगार मिळतो. मात्र, गॅस पुरवठा मर्यादित झाल्याने आणि सिलेंडरचा किमती वाढल्याने अनेक केटरिंग व्यावसायिकांनी। ऑर्डर रद्द केल्याने याचा परिणाम मजुरांच्या रोजगारावरही झाला आहे.

Haj House Kharghar: हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण

ग्राहकांच्या आग्रहाखातर आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र, ही परिस्थिती अशीच राहिली तर पूर्ण केटरिंग इंडस्ट्री बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे की, गॅस सिलेंडरची कमी उपलब्धता असली तरी चालेल, पण एका ठराविक कालावधीने सिलेंडर पुरवठा सुरू ठेवावा. वैभव लांबे, केटरर्स मालक, मुंबई, यांनी मत व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Marriage in trouble because of war how to fulfill wedding orders the concern of catering professionals grew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • LPG
  • LPG Gas
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
4

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.