Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : – ठाण्यातील दिवा मतदार यादी घोटाळ्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ?

ठाणे जिल्ह्यात धक्कादायक खुलासा! दिवा मतदार याद्यांमध्ये १७ हजार दुबार नावे उघड,दिवा शहरात मतदार याद्यांचा गोंधळ वाढला.

  • By Dilip Bane
Updated On: Oct 31, 2025 | 01:43 PM
Thane- Diva Political News, Voter list

Thane- Diva Political News, Voter list

Follow Us
Follow Us:
  • महायुतीतही धुसफूस! दिवा मतदार यादी प्रकरणावर भाजपने घेतला आघाडीबरोबरचा सूर
  • मतदार याद्यांतील दुबार नावे हटवण्याची मागणी तीव्र; दिव्यात राजकीय वातावरण तापले
  • ठाण्यातील दिवा मतदार यादी घोटाळ्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
Thane News :- ठाणे, (जि.प्र.) कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या संदर्भात गुरुवारी दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला भाजपानेही त्यांच्या मागणीला साथ मिळाल्याचे दिसून आले.

यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखअॅड. रोहिदास मुंडे, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्याबरोबर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी ही महाविकास आघाडीच्या मागणीला साथ दिल्याचे दिसून आले.

आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाहणीत पितळ पडले उघडे, ठाण्यातील तीन आरोग्य मंदिरे बंदच

दुबार नावे तत्काळ वगळण्याची मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे मागणी

संबंधित पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, वार्ड क्र. २७ आणि २८ क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण १७ हजार २५८ इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब पारदर्शकता धोक्यात आणणारी व मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली.

महायुतीमध्ये दिव्यात सुरू आहे धुसफूस

दुबार नाव वगळावी या मागणीचे निवेदन देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर भारतीय जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत हे ही उपस्थित होते. परिणामी आता ठाणे पाठोपाठ दिव्यातही महायुती मध्ये आलबेल नसल्याची कुजबुज यानिमित्ताने होऊ लागली आहे.

३ वर्षांत ३ हजार ९०० कोटी कुठे खर्च? ठाण्याच्या विकासावरून भाजपाचा शिंदेवर निशाणा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

अशाप्रकरच्या नोंदी टाळण्याची सूचना

तसेच, भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Massive duplicate voter entries found in diva area of kalyan rural constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • diva
  • Shard Pawar
  • thane
  • Uddhav Thackarey
  • Voter List Online

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Tata Group  Clash:  टाटा समूहातील वाद चिघळला? शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले…
2

Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला? शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले…

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
4

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.