Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

Ganesh Chatuthi 2026: महामार्गाच्या काही भागात सुरू असलेली कामे, अरुंद मार्ग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2026 | 07:33 PM
गणेशोत्सव 2026

गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वाढती गर्दी
  • गणपतीसाठी चाकरमानी कोकणात दाखल
  • मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे परिसरातून कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. चारचाकी, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स तसेच दुचाकी वाहनांमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, खेड, माणगाव आणि पुढील मार्गावर वाहनांची विशेष वर्दळ दिसून येत आहे.

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, महामार्गाच्या काही भागात सुरू असलेली कामे, अरुंद मार्ग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील घरे सजू लागली असून बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मुंबई आणि उपनगरातून निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाचे स्वरूप आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांची कोकणवारी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एका बाजूला भरधाव वाहने आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांची वाहतूक, अशा जीवघेण्या परिस्थितीत अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेषतः मोठी गैरसोय होत आहे.

Web Title: Massive traffic on mumbai goa highway police security arrangements deployed kokan ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Kokan News

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO
2

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना
3

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…
4

Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.