Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना

Ganeshotsav 2026: निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची काळजी यातून डॉ. अक्षय कौठाळे , केदार कुंभार, ऋत्वेश जाधव, चारुदत्त जाधव यांनी २०१९ मध्ये ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाला सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2026 | 06:45 PM
घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

Follow Us
Follow Us:
  • घराघरांत बाप्पाच्या आगमनाची सुरू झाली तयारी
  • ‘वृक्ष गजानन’ची संकल्पना आहे चर्चेत
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचाही नागरिकांकडून विचार 
सुनयना सोनवणे/Ganeshotsav 2026: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, यंदाचा गणेशोत्सव कसा खास करता येईल, याची उत्सुकताही वाढली आहे. सजावट, आरास, नैवेद्य आणि बाप्पाच्या मूर्तीची निवड याचे नियोजन सुरू असतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचाही विचार नागरिक करत आहेत. मात्र, ‘बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर देणारी एक वेगळी संकल्पना सध्या चर्चेत आहे. विसर्जनानंतर मूर्तीची माती पुन्हा कुंडीत घेऊन त्यातून रोप उगवायचे आणि बाप्पाला नव्या रूपात घरातच जपायचे, अशी ‘वृक्ष गजानन’ची संकल्पना आहे.

निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची काळजी यातून डॉ. अक्षय कौठाळे , केदार कुंभार, ऋत्वेश जाधव, चारुदत्त जाधव यांनी २०१९ मध्ये ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाला सुरुवात केली. उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात या मूर्ती तयार केल्या जातात. सुरुवातीला केवळ ११ इंचाची एकच मूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या आकारांची आणि रचनांची मॉडेल्स विकसित करण्यात आली.

पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचला आहे. नाशिक, अमरावती, जळगाव आणि धुळे येथे विक्री केंद्रे आणि वितरकांचे जाळे उभे राहिले आहे. दुबई, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतही या मूर्ती पाठविल्या जात आहेत. बंगळुरू, हैदराबाद, कारवार आणि बेळगाव येथून ऑनलाइन मागणीही होत आहे.

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे शेतातील काळ्या मातीचा वापर. मातीव्यतिरिक्त कोणतेही रसायन वापरले जात नाही. मजबुतीसाठी नारळाच्या काथ्याचा वापर केला जातो. मूर्तीसोबत ज्यूटची पिशवी, मातीची कुंडी आणि बियाण्यांचे पाकीट दिले जाते. यंदा वांगी आणि मेथीच्या बियांचा समावेश आहे. त्यामुळे विसर्जनानंतर मूर्तीची माती कुंडीत घेऊन त्यात बिया पेरता येतात आणि त्यातून हिरवे रोप उगवते.

या उपक्रमाच्या उत्पादन प्रक्रियेत महिलांचाही मोठा सहभाग आहे. उरुळी कांचन येथील कारखान्यात महिला मूर्ती घडविण्याबरोबरच मुकुटावरील नक्षीकाम, डोळे आणि गंध रेखाटण्याचे काम करतात. व्यवसायाचा विस्तार होत असताना दरवर्षी सात ते आठ महिलांना रोजगार दिला जातो.

शाडूच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत लागत असली, तरी पर्यावरणपूरक पर्याय सर्वसामान्यांना परवडावा, यासाठी एक फुटाच्या मूर्तीची किंमत शाडूच्या मूर्तीच्या किमतीच्या आसपास ठेवण्यात आली आहे. नदीत विसर्जन करून उत्सव संपवण्याऐवजी, विसर्जनानंतरही बाप्पाला नव्या रूपात जपण्याचा संदेश ‘वृक्ष गजानन’ मधून दिला जात आहे.

पॅकेजमध्ये काय मिळणार?

– शेतमातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती
– चंदेरी पाट
– शेतमातीने भरलेली कुंडी
– बियाण्यांचे पाकीट
– ज्यूटची पिशवी

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

‘वृक्ष गजानन’चे फायदे

– १०० टक्के पर्यावरणपूरक मूर्ती
– घरीच विसर्जनाची सुविधा
– जलप्रदूषणाला आळा घालण्यास मदत
– विसर्जनानंतर मूर्तीच्या मातीचा पुनर्वापर
– बाप्पाच्या मातीतून रोप उगविण्याची संधी
– वृक्षारोपणाच्या संकल्पनेला प्रोत्साहन
– प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या पिशवीचा वापर
– पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबत महिलांना रोजगाराची संधी

Web Title: Ganpati bappa stay at home even after immersion unique eco friendly vruksha gajanan initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • environment
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त
2

गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO
3

Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO

Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी
4

Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.