गणेशोत्सव 2026 (फोटो- सोक्ष मिडिया)
पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी पुलाच्या संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच या पुलावरील वाहतूक सुरू करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गाची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोकण रेल्वेने तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यास नकार दिल्याने, हे काम आता पूर्ण होणार नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
रस्तेकामे अपूर्ण असतानाच रेल्वेमार्गातही अडथळे निर्माण झाले आहे. १० सप्टेंबरपासून पुढीलकाही दिवसांचे कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा वादीही पूर्ण झाल्याने आता ‘रिग्रेट’ (प्रतीक्षा यादीही बंद) असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. गणेशोत्सवासाठी ११ आणि १२ सप्टेंबर रोजी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले. मात्र, मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना तिकीट मिळू शकलेले नाही. प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्यामुळे रेल्वेने आता थेट तिकीट विक्रीच बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस,, तुतारी एक्सप्रेस, सुरत-मडगाव एक्सप्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस.
मुंबई-गोवा महामार्गांचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा यंत्रणाकडून केला जात आहे, मात्र महामागविरील पुलांची आणि बाहावळण मार्गाची कामे अजूनही अपूर्ण आहेत, महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही अपूर्ण आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी चंद आहे.






