Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार; मलनिःसारण उघडे चेंबर्स ठरतायत धोकादायक

माथेरानमध्ये मलनिःसारण प्रकल्पाच्चे काम सुरू असून शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे मारले होते.त्यात बनवलेले चेंबर हे घोड्यांसाठी धोकादायक बनले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 06:34 PM
Matheran News : निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार; मलनिःसारण उघडे चेंबर्स ठरतायत धोकादायक
Follow Us
Follow Us:
  • निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार
  • मलनिःसारण उघडे चेंबर्स ठरतायत धोकादायक
कर्जत/संतोष पेरणे :  माथेरानमध्ये निकृष्ठ दर्जाच्या  कामाचा फटका नागरिकांना आणि पर्यटकांना भोवत असल्याचं समोर आलं. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास हा तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना देखील भोगावा लागत आहे. माथेरानमध्ये मलनिःसारण प्रकल्पाच्चे काम सुरू असून शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे मारले होते. त्यात बनवलेले चेंबर हे घोड्यांसाठी धोकादायक बनले आहे. पर्यटन हंगाम सुरू होत असताना एका अश्वमालकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. माथेरानमध्ये सध्या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु हे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अनेक वेळा माथेरान शहरातील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली . मात्र आजतागायत यावर तोडगा निघालेला नाही.   आज तर या कामांकरता तयार केलेल्या चेंबरच्या झाकणावरून घोडा जात असताना त्याच्या पाय झाकण तुटल्याने चेंबरमध्ये अडकला सुदैवाने घोडा व त्यावरील प्रवासी थोडक्यात बचावले.परंतु यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत असून मलनिःसारण प्रकल्प वाद विकोपाला गेला आहे.

माथेरानच्या विविध भागांमध्ये मल निस्सारण प्रकल्पाचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.परंतु हे काम घाई गडबडीमध्ये उरकण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना खोदलेल्या खड्ड्यामध्ये कोणतीही प्रकारची सोलिंग करण्यात आलेली नाही. तर पाणी वाहून जाण्याकरता उतार असावा असा नियम असताना अनेक ठिकाणी घाईगडबडीमध्ये पाईपलाईन टाकल्या गेले आहे.

Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा

माथेरान मधील पालिका प्रशासनाने ही दुर्लक्ष केल्याने रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. माथेरान मधील अश्वचालक नागेश परेरा यांचा घोडा प्रवाशाला पाठीवर बसून घेऊन जात असताना अचानक घोड्याचा पाय या चेंबरच्या झाकणावरून थेट आतमध्ये गेला. त्यामुळे घोड्यासकट प्रवासी जमिनीवर आपटले सुदैवाने प्रवाशास कोणती इजा झाली नसली तरी घोड्याच्या पायास दुखापत झाली आहे. तातडीने मदत मिळाल्यामुळे या चेंबर मधून घोड्याचा पाय काढण्यात यश आले. या अपघातामुळे या प्रकल्पाच्या चेंबरवर लावण्यात आलेल्या निकृष्ट झाकणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. वारंवार या प्रकल्पा प्रकल्पाबाबत तक्रारी होत असतानाही पालिका अधिकारी ठेकेदाराबाबत आपले भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही.त्यामुळेच हा ठेकेदार कोणालाही ना जुमानता कारवाई व्हावी अशी मागणी अश्वचालकांकडून होत आहे.

Raigad News : अलिबाग पंचायत समितीच्या निधी नियोजनावर भर; 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर होणार

Web Title: Matheran news poor quality work and mismanagement of administration open sewage chambers are becoming dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Marathi News
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.