मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: निबंधक, भागीदारी संस्था यांच्या उन्नत केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था व नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते निबंधक, भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या 2.0 या उन्नत संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.
निबंधक भागीदारी संस्थेचे नवे अत्याधुनिक 2.0 संकेतस्थळ
काळाच्या गरजेनुसार व तांत्रिक प्रगतीनुसार सुधारणा करून जनतेस अधिक सोयीस्कर, आधुनिक व वापरकर्त्यास अनुकूल असे https://www.rof.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे जनतेचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे. तसेच शासनाच्या ‘इज ऑफ डूईंग बिजनेस’ उपक्रमांतर्गत वन स्टॉप विंडो पोर्टलद्वारे भागीदारी संस्थांचे अर्ज या विभागात सादर करण्याची सोयही नव्या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
निबंधक, भागीदारी संस्था मुंबई यांच्या मुख्य विभागाची स्थापना १९५८ मध्ये झाली असून आजपर्यंत आठ लाख भागीदारी संस्थांची नोंदणी झाली आहे. या विभागाची पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी तीन विभागीय कार्यालये आहेत. जून २०१२ मध्ये mah.gov.in या संकेतस्थळाद्वारे भागीदारी संस्थांची नोंदणी तसेच बदल नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नोंदणी प्रक्रियेचा पेपरलेस प्रवास सुरू झाला.
Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
ऑक्टोबर २०१७ मध्ये महा-आयटी विभागाने संकेतस्थळ 1.0 सुरू केले. या प्रणालीमुळे ऑनलाइन अर्ज सादर करणे, फी व दंडाची ऑनलाईन भरपाई, कागदपत्रे अपलोड करणे, आक्षेपपत्रे सादर करणे व नोंदणी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात देणे अशा सुविधा उपलब्ध झाल्या. स्टोरेज क्षमतेसाठी 1.0 हे संकेतस्थळ अपुरे ठरत असल्याने यातील त्रुटी दूर करून महा-आयटीने 2.0 प्रणाली आता विकसित केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नव्या प्रणालीची वैशिष्ट्ये :-
विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून, यावर सकारात्मक विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.