Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, खडकवासला परिसरात १०४.२ मिलिमीटर तर सिंहगड रस्ता परिसरात १००.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 05:39 PM
Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! दोन तासांत 'स्मार्ट सिटी'चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! दोन तासांत 'स्मार्ट सिटी'चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

Follow Us
Follow Us:

पुण्यात काल ढगफूटीसदृश पाऊस 
झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू 
पुणे शहरांत अनेक ठिकाणी पाणी साठल्याने धावपळ

पुणे: एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाचा तडाखा, अशी सर्वसाधारण धारणा असताना यंदा पुणेकरांना निसर्गाचे वेगळेच आणि रौद्र रूप अनुभवायला मिळाले. गुरुवारी दुपारी अवघ्या दोन ते अडीच तासांत झालेल्या मुसळधार पावसाने (Pune Rain) शहरात अक्षरशः हाहाकार उडवला. या पावसाने एप्रिल महिन्यातील तब्बल १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक नोंदवला.

शिवाजीनगर येथे गुरुवारी ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी ४ एप्रिल १८९६ रोजी ५१.१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात एका दिवसात पडलेल्या पावसाचा हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन ते अडीच तासांत शहराच्या काही भागांत ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, खडकवासला परिसरात १०४.२ मिलिमीटर तर सिंहगड रस्ता परिसरात १००.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली आणि ऐन कामावरून घरी परतण्याच्या वेळेत वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सध्या देशासह राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असून, यामागे एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘सध्या मराठवाड्यापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कर्नाटकच्या अंतर्भागातून एक कमी दाबाची द्रोणीय रेषा (ट्रफ) सक्रिय आहे. यासोबतच, उत्तर मध्य प्रदेशापासून उत्तर विदर्भापर्यंत आणखी एक द्रोणीय रेषा तयार झाली असून, उत्तर गुजरात आणि लगतच्या परिसरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पश्चिम भारतावर वातावरणाच्या वरच्या थरात ‘सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम’ सुमारे २५० किलोमीटर प्रती तास इतक्या प्रचंड वेगाने वाहत आहे. याशिवाय, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या परिसरातील पश्चिमी विक्षोभ प्रभाव कायम असून, येत्या ७ एप्रिलपासून आणखी एक नवीन पश्चिमी विक्षोभ उत्तर-पश्चिम भारतावर धडकण्याची शक्यता आहे. या सर्व प्रमुख घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात पावसाळी आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.’’

शहरात काय परिणाम झाले?
अनेक भागांत रस्ते तुंबले, लघु पूरस्थिती निर्माण झाली.
झाडपडीच्या १०५ घटना घडल्या.
वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना नोंदल्या गेल्या.
शाळा व कार्यालयांमध्ये उपस्थितीवर परिणाम.
पण या पावसामुळे काही प्रमाणात उन्हाच्या लाटेतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Pune Heavy Rain: पुणेकरांची दाणादाण! गुडघाभर पाणी आणि बुडालेल्या कार; अवकाळी पावसाने पुण्यात उडवला हाहाकार

एप्रिलमध्ये सर्वाधिक झालेला पाऊस (शिवाजीनगर परिसरातील ऐतिहासिक नोंदी)
वर्ष – पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०२६ – ६५
१८९६ – ५१.१
१९५३ – ४८.२
१९५९ – ३१.६
१९७८ – २७.४
१९६७ – २६.५
२०११ – २५.६
२०२३ – २४.६
१९९५ – २४.३
१९८८ – २३.२

‘‘सध्या तामिळनाडूपासून ते महाराष्ट्रापर्यंत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे एक कमी दाबाची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. या स्थितीसोबतच बंगालच्या उपसागरावरून आणि पश्चिमेकडून हवेच्या वरच्या थरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. परिणामी, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तसेच, सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम मूळ जागेवरून काहीशी दक्षिणेकडे सरकली आहे. या सर्व प्रमुख बदलांमुळे मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह हा वादळी पाऊस झाला. या स्थितीमुळेच काही ठिकाणी गारपीटही झाली.’’
– डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक ‘डी’, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे

मार्चमध्येही विक्रमी पाऊस, तापमानात घट 
पुण्यात यंदाचा मार्च महिना हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे विशेष ठरला. महिन्याच्या सुरुवातीला शिवाजीनगर येथे कमाल तापमान ३३ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले गेले, तर मगरपट्टा, बाणेर परिसरात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत होती. मात्र, उत्तरार्धात ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ३० मार्च रोजी २६.६ मिमी पावसाची नोंद झाली, जो महिन्यातील उच्चांक ठरला. परिणामी, मार्चचे सरासरी कमाल तापमान ३६.९ अंशांवर आले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत मार्चमध्ये इतका पाऊस प्रथमच नोंदवला गेला आहे.

 

Web Title: Cloudburst rain in pune city people struggle to travel imd yellow alert weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Pune Rain
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
1

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
2

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
3

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
4

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.