मुंबई – मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवारी (Sunday Mega Block) मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस आहे. या दिवशी मुंबईकरांचा बाहेर फिरायला जाण्याचा बेत असेल तर थांबा आणि ही बातमी वाचा. कारण रविवारी म्हणजे उद्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल वेळा पत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकबाबत जाणून घ्या. आणि एक वेळ वेळापत्रक वाचा….
कसा असणार मेगा ब्लॉक?
दरम्यान, ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 09.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावणार आहेत. मेगाब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असण्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ब्लॉकच्या कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
वांगणी-भिवपुरी दरम्यान विशेष रात्री पॉवर ब्लॉक
दरम्यान, रोजी वांगणी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक 29/30.07.2023 (मध्यरात्री) नेरळ स्थानकावर 01.40 ते 03.10 या वेळेत 02 OHE क्रेन वापरून मध्य रेल्वे विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे.
ब्लॉक खालीलप्रमाणे चालवला जाईल:
ब्लॉकची तारीख: 29/30.07.2023 (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)
ब्लॉकचा कालावधी: सकाळी 01.40 ते 03.10 (01.30 तास)
वाहतूक ब्लॉक विभाग: वांगणी आणि भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्ग
अप एक्सप्रेस गाड्या कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येतील
1) 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस
2) 18519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
उपनगरीय:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी ००.२४ वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
कर्जत येथून ०२.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालविण्यात येईल.
या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.