फोटो सौजन्य: Gemini
चला जाणून घेऊयात, या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी जर तुम्ही एक लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुरी Celerio ऑफर करते. याचा सीएनजी व्हेरिएंट 5.98 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येतो. त्यामुळे दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत अंदाजे 6.88 लाख रुपये आहे. यामध्ये 5.98 लाखांच्या एक्स-शोरूम किंमत, तसेच आरटीओसाठी अंदाजे 57000 आणि विम्यासाठी अंदाजे 32000 समाविष्ट आहेत.
जर तुम्ही या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच लोन देते. अशा वेळी, एक लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 5.88 लाख रुपयांचे कर्ज बँकेतून घ्यावे लागेल. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.88 लाख रुपये मंजूर करते, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दरमहा सुमारे 9,460 रुपयांचा EMI भरावा लागेल.
TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.88 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षे दरमहा 9,460 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे, सात वर्षांत तुम्ही फक्त व्याज म्हणून सुमारे 2.06 लाख रुपये भराल. त्यामुळे एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याज मिळून या Maruti Suzuki Celerio कारसाठी तुमचा एकूण खर्च जवळपास 8.94 लाख रुपयांपर्यंत जाईल.
मारुती सुझुकी हॅचबॅक सेगमेंटमध्ये सेलेरियो विकते. हे कार Maruti S Presso, Maruti Wagon R, Renault Kwid आणि Hyundai Grand Nios i10 सारख्या हॅचबॅकशी थेट स्पर्धा करते.






