Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Hindi Controversy : मराठी-हिंदी वाद! संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ‘मराठी भाषेतील पत्रांना..”,

 मराठी न बोलणाऱ्या एका स्थलांतरित दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला आहे. याचदरम्यान आता राज्यपालांनी यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2025 | 12:36 PM
Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा

Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी वाद पुन्हा उफाळला असून मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या एका स्थलांतरित दुकानदाराला मारहाण केल्यानंतर देशभरात वाद निर्माण झाला आहे. यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले. आता यावर भारतीय जनता पक्षाचे नेते निशिकांत दुबे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, जर तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारहाण करून पहा. दुबे यांनी मराठी-हिंदी वादाची तुलना कुत्रा आणि सिंहाशी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खा. डॉ दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मंगळवारी (8 जुलै) राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली.

आम्ही दिलगिरी व्यक्त करतो..;मोर्च्यापूर्वीच मीरा-भाईंदर व्यापाऱ्यांकडून माफीनामा

देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला ‘सहयोगी भाषा’ म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे निमंत्रक डॉ दिनेश शर्मा यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज आज हिंदी भाषेत होत असून यानंतर मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल, तामिळ भाषेतील पत्रांना तामिळ भाषेतूनच उत्तर दिले जाईल तसेच उत्तरासोबत हिंदी अनुवाद दिला जाईल असे डॉ शर्मा यांनी सांगितले.

काय म्हणाले राज्यपाल?

समिती सदस्यांचे राजभवन येथे स्वागत करताना हिंदी भाषा येत नसेल तर देशातील लोकांच्या समस्या समजून घेता येत नाही असे राज्यपालांनी सांगितले. आपले संपूर्ण शिक्षण नगर पालिकेच्या शाळेत तामिळ माध्यमातून झाले. त्याकाळी आपल्या गावात खासगी शाळा नव्हत्या, त्यामुळे हिंदी भाषा शिकता आली नाही याची खंत वाटते, असे राज्यपालांनी सांगितले.आज तामिळनाडूमध्ये परिस्थिती बदलली आहे. बहुतांशी लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये पाठवत असून त्या शाळांमध्ये हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. त्यामुळे आज अनेक मुले उत्तम हिंदी समजतात व बोलू शकतात असे राज्यपालांनी सांगितले.आपण झारखंड येथे राज्यपाल असताना हिंदीशिवाय लोकांशी संवाद साधता येत नव्हता. आज आपल्याला हिंदी पूर्ण समजते असे राज्यपालांनी सांगितले.

तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण विद्यापीठांमध्ये जर्मन, जपानी, मँडरिन, आदी विदेशी भाषा देखील शिकविल्या जाव्या अश्या सूचना विद्यापीठांना केल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य खा. रामचंद्र जांगडा (हरियाणा), खा. राजेश वर्मा (बिहार), खा. कृतिदेवी देवबर्मन (त्रिपुरा), खा. किशोरीलाल शर्मा (उत्तर प्रदेश), खा. सतपाल ब्रह्मचारी (हरियाणा), खा, डॉ अजित गोपछडे (महाराष्ट्र), खा. विश्वेश्वर हेगडे (कर्नाटक) तसेच अधिकारी उपस्थित होते.

राज्यात भाषेच्या वाद उफळला

अलीकडच्या काळात महाराष्ट्रात भाषेच्या वादाला वेग आला आहे. फडणवीस सरकारने तृतीय भाषा धोरण आणले तेव्हा हे घडले. उद्धव आणि राज दोघांचाही असा विश्वास आहे की हा मूळ मराठी भाषिकांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे. मनसे आणि शिवसेना यूबीटीच्या निषेधानंतर सरकारने धोरण मागे घेतले. यानंतर, ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा केला.

पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढणार; फुरसुंगीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

Web Title: Members of the parliamentary official language committee met the governor afterwards responses to correspondence in marathi were given in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • maharashtra
  • MNS

संबंधित बातम्या

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर
1

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?
2

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता
3

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक
4

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.