Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad Municipal Council: म्हसवड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; १९ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

शहरात प्रशासनाच्या कार्यकाळात अनेक विनापरवाना बांधकामे झाली असून त्यामध्ये मोठी तडजोड झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. ज्या बांधकामांना परवानगी दिली आहे ती परवानगीपेक्षाही अधिक मोठी झाली असून त्याचा सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 18, 2026 | 01:18 PM
Mhaswad News, Satara News, Crime News, Local News

Mhaswad News, Satara News, Crime News, Local News

Follow Us
Follow Us:
  • शासकीय निधीचा अपहार आणि दुर्लक्ष केल्याप्रकरणी १९ ऑगस्टपासून पालिकेसमोर उपोषणाचा इशारा
  • कामाचा दर्जा न तपासताच ठेकेदारांची लाखो रुपयांची बिले मंजूर केल्याचा आरोप
  • पोलीस ठाणे परिसरातील नव्या पाईपलाईनला एकाच महिन्यात ५ ठिकाणी गळती लागून पाणी वाया
Mhaswad Municipal Council:   म्हसवड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय निधीतून झालेल्या विविध विकास कामांचा दर्जा न तपासता त्या कामांची बिले काढून संबंधित ठेकेदारांना अदा केली असून शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेवरुन चोरीस गेलेल्या मुद्देमालाची पोलीस तक्रारही न करता संबंधिताना मोकळे सोडले आहे, तर शासकीय निधीची नुसती उधळपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत गुन्हा दाखल न केल्यास  १९ ऑगस्ट पासून पालिकेच्या समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात सोनवणे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, अनेक ठिकाणी झालेल्या विकासकामाचा दर्जा न तपासता बीले काढुन संबंधित ठेकेदाराला अदा केली आहेत, तर पोलीस स्टेशन परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे एकाच महिन्यात दोन वेळा काम करुनही सदर ची जल वाहिनीला ५ ठिकाणी गळती कशी काय लागते ? असा सवाल उपस्थित केला.

BJP New National Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधून 2029च्या निवडणुकीची रणनीती

त्याठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शहरात प्रशासनाच्या कार्यकाळात अनेक विनापरवाना बांधकामे झाली असून त्यामध्ये मोठी तडजोड झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. ज्या बांधकामांना परवानगी दिली आहे ती परवानगीपेक्षाही अधिक मोठी झाली असून त्याचा सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील विठ्ठल, रुक्मिणी मंदिर ते कासार बोळ या दरम्यान जेसीबीच्या साह्याने रस्ता मधोमध खोदुन त्याठिकाणी वाढीव पाणी पुरवठा योजनेची जल वाहिनी टाकली मात्र त्यानंतर तो रस्ता कॉक्रीट केला नाही, तर त्यावर फक्त मुरुम टाकण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते मरीआई माता मंदिर या दरम्यान पालिकेने केलेल्या रस्त्याचे निकृष्ट काम करण्यात आले आहे, एप्रिल व मे या २ महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची लाखो रुपयांची बीले काढण्यात आली आहेत, किती पाणी वाटले याची चौकशी केली असता प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. पालिकेच्या जागेत रोज अतिक्रमण वाढत असून त्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असून त्यांना पाठीशी घालत आहेत. या सह अन्य अनेक आरोप सोनवणे यांनी केले असून यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी

Web Title: Mhaswad municipal council chief officer allegations hunger strike warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Mhaswad
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.