Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?

उद्योग समूहांच्या सहकार्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2025 | 07:03 PM
“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?
Follow Us
Close
Follow Us:

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न
उद्योग समूहांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार
आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित केले जाणार

मुंबई:
राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पीपीपी मॉडेल बाबत विविध उद्योजकांशी संवाद साधताना कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, राज्य नाविन्यता सोसायटीचे कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकर,राज्य नाविन्यता सोसायटीचे सहसचिव श्रीकांत पाटील उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले ,उद्योग समूहांच्या सहकार्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच तंत्र शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन नामवंत उद्योग समुहांची मदत घेत असल्याचे कौशल्य मंत्री लोढा यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे PPP Model बाबत आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकांच्या परिषदेत विविध उद्योजकांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या PPP Model धोरणाला उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. राज्यातील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये लवकरच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक… pic.twitter.com/3kjfEo7nfB — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 19, 2025

 

कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की, उद्योग समूहांकडे असलेला अनुभव या उपक्रमामध्ये उपयोगी पडणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण काळातच उद्योग समुहांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले तर यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचेल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी आयटीआय परिसरात स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे. म्हणूनच महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. उद्योगांसाठी महाराष्ट्रात पूरक वातावरण आहे. कुशल मनुष्यबळाच्या शोधात उद्योग समूहांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. शासनासोबत भागीदारी केल्यास उद्योग समूहांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल आणि रोजगार निर्मितीही होईल, असेही लोढा यांनी सांगितले.

कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की, ‘आयटीआय’च्या राज्यभरात मोठ्या पायाभूत सुविधा आहेत. राज्याच्या मध्यवर्ती शहरी भागात, औद्योगिक भागात तसेच तालुका स्तरावरही आयटीआयने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उभारलेल्या आहेत. उद्योगांनी शासनाशी भागीदारी केल्यास त्यांना संबंधित ‘आयटीआय’मध्ये त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार अतिरिक्त अभ्यासक्रम शिकविता येईल. त्याकरिता संबंधित उद्योग समुहाला कार्यालयासाठी अथवा सेवा केंद्रासाठी लागणारी जागा त्याच ‘आयटीआय’मध्ये उपलब्ध करुन दिली जाईल. दिवसभरात विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमानंतर सायंकाळी उद्योग समूहास त्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम स्वतंत्ररित्या विद्यार्थ्यांना शिकविता येईल. याशिवाय काही अल्प काळाचे अभ्यासक्रमही येथे शिकविता येतील असेही कौशल्यमंत्री लोढा यांनी सांगितले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी राज्यातील आयटीआयबद्दल माहितीचे सादरीकरण केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Minister lodha said curriculum according to industry sector for skilled and employable manpower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • Student

संबंधित बातम्या

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश
1

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
2

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
3

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
4

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.