Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट काढून एसटीने प्रवास; अधिकाऱ्यांनाही केल्या ‘या’ सूचना

एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या. बसेसच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकीट काढून एसटी बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2025 | 06:30 PM
मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट काढून एसटीने प्रवास; अधिकाऱ्यांनाही केल्या 'या' सूचना

मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा तिकिट काढून एसटीने प्रवास; अधिकाऱ्यांनाही केल्या 'या' सूचना

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या. या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा मेढा आगारात उत्साहात झाला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिकीट काढून एसटी बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला. बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला महामंडळाचे सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, ज्योती गायकवाड यांच्यासह जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर, शाखा अभियंता सुरेश कुंभार यांनी सुद्धा हजेरी लावली. यावेळी मेढा आगार व्यवस्थापक नीता बाबर यांच्यासह आगारातील अधिकारी वाहक, चालक व तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.

जावली तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम-डोंगराळ असून, या भागातुन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसेसचाच पर्याय नागरिकांना निवडावा लागतो. मात्र मेढा आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या. त्यामुळे एसटी बसेस बंद होण्याचे प्रकार नेहमी घडत होते. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी नवीन एसटी बसेस मिळण्याची वारंवार मागणी मेढा आगारकडे व सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्याकडे केली होती.

नवीन बसच्या मागणीला यश

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी तालुक्यातील नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा स्वतः करत राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, राज्य परिवहन विभागाकडून मेढा आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

हे सुद्धा वाचा : वनराज आंदेकर खूनप्रकरणी मोठी अपडेट; 21 आरोपींविरुद्ध 1700 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर

गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी फीत कापून एसटी बसेसचे लोकार्पण केले. त्यांनी तिकिट काढून नवीन बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला. मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यामुळे तालुक्यातील नागरिक व शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. मेढा आगाराने बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

हे सुद्धा वाचा : मावळ हादरलं! एकावर 4 जणांचा प्राणघातक हल्ला; दांडके अन् तलवारीने बेदम मारहाण

Web Title: Minister shivendrasinhraje bhosale has taken a ticket and traveled by st nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Satara News
  • Shivendrasinh Bhosale
  • st bus

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
1

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
2

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
4

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.