संग्रहित फोटो
वडगाव मावळ : गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी निगडे (ता. मावळ जि. पुणे) हद्दीत घडली. जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे (वय 40 रा. कल्हाट ता. मावळ जि. पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष महादु जाचक (वय 35, रा. स्वराज्य नगरी फ्लॅट नं 4, स्वामी दर्शन अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे, मूळ रा . करवंदे वस्ती कल्हाट ता. मावळ जि. पुणे), आदिनाथ लाला खापे (वय 27 रा. कोंडीवडे ता. मावळ जि.पुणे), रोहन मुरलीधर आरडे (वय 23) व ओमकार देविदास खांडभोर (वय 23) दोघे रा घाटेवाडी पोस्ट वडेश्वर ता. मावळ जि.पुणे) अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे (ता. मावळ, जि. पुणे) हद्दीत डांबरी रोडवर फिर्यादी हे तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापु देशमुख यांच्यासोबत कार एम. एच. 14 एल. वाय 2842 मधून कल्हाटकडे जात असताना आरोपी संतोष जाचक, अधिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाच्या कारणावरून संगनमत करून त्यांच्याकडे असलेली कार ही फिर्यादीच्या कारला आडवी लावून फिर्यादीची गाडी थांबवून गाडीच्या काचा फोडल्या. संतोष महादु जाचक याने फिर्यादीला पिस्टल दाखवून गाडी मधून खाली उतरण्यास भाग पाडले.
आरोपी संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादीला डोक्यावर व शरिरावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला होता. आता आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.