Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Election 2026 : भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय

मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता मिळवली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 16, 2026 | 08:16 PM
Mira Bhayandar Election 2026 :  भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय
Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपाची एकहाती सत्ता
  • 78 जागांवर घवघवीत विजय
मीरा-भाईंदर / विजय काते :  मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता मिळवली आहे. “७० पार”चा नारा देत भाजपाने मुसंडी मारत तब्बल ७८ जागांवर विजय मिळवला असून, शहराच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयासह मीरा-भाईंदरमधील राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे भाजप आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २४ प्रभागांतील ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात होते. निकालानुसार भाजपाने ७८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर काँग्रेसला १३ जागा, शिवसेनेला केवळ ३ जागा आणि अपक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले.

युतीचा वाद आणि ‘एकला चलो रे’ची भूमिका

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

निवडणुकांची घोषणा झाल्यापासून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील युतीचा वाद उघडपणे समोर आला होता. त्यानंतर भाजपाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. नरेंद्र मेहता यांनी वारंवार असा दावा केला होता की, मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला मिळालेली सत्ता ही भाजपामुळेच होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या या निकालातून शहरावर कोणाचे राज्य आहे आणि सत्ता कोण काबीज करू शकते, हे भाजपाने कृतीतून दाखवून दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.B

MC निकालानंतर ‘रसमलाई’वरून राज ठाकरेंवर टीका! भाजप खासदाराचे ‘ते’ ट्विट व्हायरल…

प्रभागनिहाय निकाल (ठळक)
प्रभाग १ ते ८, १०, १२, १३, १५ ते १८, २०, २१, २३ – भाजपाचा दबदबा
प्रभाग ९, १९, २२ – काँग्रेसचे वर्चस्व
प्रभाग ११ – भाजप ३, शिवसेना १
प्रभाग १४ – भाजप ३, अपक्ष १
प्रभाग २४ – शिवसेना २, काँग्रेस १
एकूण निकाल:
भाजप – ७८
काँग्रेस – १३
शिवसेना – ३
अपक्ष – १

भाजपचे मीडिया प्रभारी बिपिन गुप्ता यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाला ५० जागाही मिळणार नाहीत आणि नरेंद्र मेहता ट्रॅफिक हवालदार होतील, असे आरोप केले होते. आजच्या निकालानंतर प्रत्यक्षात कोणाला ट्रॅफिक हवालदार व्हावे लागेल, हे जनतेने स्पष्ट केले आहे.”

भाजप नेते रणबीर वाजपेयी म्हणाले, “मीरा-भाईंदर शहर हे भाजपाचेच आहे. कुणीही येऊन दादागिरी करू नये, असा स्पष्ट संदेश जनतेने दिला आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास भाजपावरच असल्याचे आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
या निकालामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी निर्णायक धोरणे राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Web Title: Mira bhayandar election 2026 bjps single handed power resounding victory in 78 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Election
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
1

ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप
2

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे
3

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Maharashtra Politics: इचलकरंजीत ‘कमळ’ फुलले; भाजपचा तब्बल 43 जागांवर विजय
4

Maharashtra Politics: इचलकरंजीत ‘कमळ’ फुलले; भाजपचा तब्बल 43 जागांवर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.