Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

मीरा-भाईंदरमध्ये एका मराठी महिला उद्योजिकेला “मराठी असल्यामुळे इथे व्यवसाय करू शकत नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित महिला उद्योजिकेची भेट घेत प्रकरणाची दखल घेतली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 05:09 PM
मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

Follow Us
Follow Us:
  • मराठी महिला उद्योजिकेला परप्रांतीय महिलेकडून धमकी
  • व्हायरल व्हिडिओनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली दखल
  • “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात एका मराठी महिला उद्योजिकेला “तुम्ही मराठी आहात, त्यामुळे इथे धंदा करू शकत नाही” अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत संबंधित महिला उद्योजिकेची भेट घेतली.

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथील रहिवासी रवीना शिंदे या आपल्या कुटुंबासह मीरा भाईंदर महानगरपालिकेसमोरील महात्मा रेसिडेन्सी येथे व्यवसायासाठी भाड्याने गाळा घेण्याच्या प्रक्रियेत होत्या. यावेळी गाळा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका परप्रांतीय महिलेने रवीना शिंदे यांना “तुम्ही मराठी आहात, त्यामुळे इथे व्यवसाय करू शकत नाही” असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठी संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. “मराठी माणसाला स्वतःच्या राज्यात व्यवसाय करण्यापासून रोखले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने दखल घेत रवीना शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित घटनेची माहिती जाणून घेत मराठी उद्योजकांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मीरा-भाईंदर परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची चर्चा रंगू लागली असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित महिलेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईसह राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे सक्तीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी आणि ओला-उबर चालकांसाठी प्रवाशांशी सुसंवाद साधता येईल इतपत मराठीचे ‘वर्किंग नॉलेज’ अनिवार्य केले होते . चालकांच्या विरोधामुळे शासनाने नरमाईचे धोरण स्वीकारून मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत १०० दिवसांची मुदतवाढ दिली आहे。

Sanjay Raut News: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात भाजपच्याही काही लोकांचा संबंध: संजय राऊतांचा आरोप

Web Title: Mira bhayander marathi businesswoman threat pratap sarnaik action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mira Bhayander
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली
2

मोठी बातमी ! केंद्राकडे महाराष्ट्राची 1754 कोटींची थकबाकी; मनेरगाच्या प्रश्नावर राज्यसभेत सरकारची कबुली

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला
3

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम
4

Amravati News: विमानतळाच्या नाईट लॅण्डिंगला तांत्रिक अडथळे! नागरिकांचा हिरमोड; डीव्हीओआर यंत्रणा सज्ज तरीही प्रतीक्षा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.