Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
या तीन वर्षांच्या करारांतर्गत विद्यार्थ्यांना बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, गंजरोधक क्षमता, डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन व सामग्रीच्या जीवनचक्र खर्चाचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या तुकडीत २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरेल. करारावर स्वाक्षरी करताना जिंदाल स्टेनलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण खुल्बे, मधुर गुप्ता, संदीप सिंह आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, डॉ. शांतिनी बोकील, डॉ. संदीप पोटणीस व डॉ. अभयसिंहा शेलाके उपस्थित होते.
अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी डॉ. संदीप पोटणीस यांच्या नेतृत्वाखालील एमआयटीच्या प्राध्यापकांनी जिंदाल स्टेनलेसच्या आजपूर (ओडिशा) प्रकल्पाला भेट देऊन स्टील उत्पादन, ऑटोमेशन व गंजरोधक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या सहकार्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या भविष्यासाठी सक्षम अभियंते तयार करणे आवश्यक आहे. या सहकार्यामुळे विद्याथ्यर्थ्यांना अद्ययावत उद्योगज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

