मंत्र्यांच्या ओएसडींकडून 3 कोटींच्या एका कामासाठी 5 लाखांची मागणी, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
मुंबई – विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकात बुधवारी सकाळी जोरदार वाद झाला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर केला. तर अशा लोकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, विरोधकांनी आमची जागा हायजॅक केली होती. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.
विधीमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विरोधकांकडून ‘पन्नास खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होते. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली