Manikrao Kokate: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव चर्चेत आले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळामध्ये गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर मी रमी खेळात नव्हतो तर, जाहिरात स्किप करत होतो असे स्पष्टीकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.मात्र आता कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या आधी देखील काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन व्हिडीओ पोस्ट करून कोकाटे हे रमीच खेळत होते, असे म्हटले आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आमदार आव्हाड यांचे ट्विट काय?
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.
आता मी… pic.twitter.com/paHlQjGWP2— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 21, 2025
आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो.
महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…!
कोकाटेंचे स्पष्टीकरण काय?
“मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो आणि कनिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे पाहण्यासाठी YouTube प्ले करत होतो. त्यावेळी अचानक ‘जंगली रमी’ ची जाहिरात आली. ती जाहिरात स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. मी काही पाप केलं नाही. मी गेम खेळत नव्हतो. जाहिरात स्किप करताना थोडा वेळ लागला इतकंच. आम्ही शेतकऱ्यांसाठी जी कामे करत आहोत, त्यावर कोणी काही बोलत नाही, मात्र दोन सेकंदाच्या क्लिपवरून मला टार्गेट केलं जातंय. माझं काम पारदर्शक असून मी तितकाच जबाबदारीनं वागतो.” असंही कोकाटेंनी स्पष्ट केलं. पण या संपूर्ण वादावर विरोधकांनी मात्र कोकाटेंना जाब विचारत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, कोकाटे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवावा का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.