जंगली रमी’च्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटेंना फुटला घाम
Manikrao Kokate on Jangali Rummy: मंत्रीपद मिळाल्यापासूनच सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी थेट विधिमंडळात कोकाटे ‘जंगली रमी’ गेम खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर माणिकराव कोकाटेंना यावर स्पष्टीकरण देताना चांगलाच घाम फुटल्याचेही दिसत आहे. रोहित पवार यांनी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपण गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
स्वत:च्या बचावार्थ बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो आणि कनिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे पाहण्यासाठी YouTube प्ले करत होतो. त्यावेळी अचानक ‘जंगली रमी’ ची जाहिरात आली. ती जाहिरात स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. त्याच क्षणाचा व्हिडिओ दाखवून मला केलं जात आहे. तुम्हाला अशा जाहिराती येत नाहीत का?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?
तसेच, “मी काही पाप केलं नाही. मी गेम खेळत नव्हतो. जाहिरात स्किप करताना थोडा वेळ लागला इतकंच. आम्ही शेतकऱ्यांसाठी जी कामे करत आहोत, त्यावर कोणी काही बोलत नाही, मात्र दोन सेकंदाच्या क्लिपवरून मला टार्गेट केलं जातंय. माझं काम पारदर्शक असून मी तितकाच जबाबदारीनं वागतो.” असंही कोकाटेंनी स्पष्ट केलं. पण या संपूर्ण वादावर विरोधकांनी मात्र कोकाटेंना जाब विचारत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, कोकाटे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवावा का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘मी माझ्या विभागाच्या कामांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? यासाठीच आम्ही दौरे करत आहोत. मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मात्र, काही लोक केवळ बदनामी करण्यासाठी डाव आखत आहेत.” त्यांनी पुढे रोहित पवारांकडेही लक्ष्य करत म्हटले.
सोनाक्षीच्या ‘निकिता रॉय’ला मिळाला कमी स्क्रीन टाइम, भाऊ कुश सिन्हाने ‘सैयारा’ चित्रपटाला दिला दोष
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळतानाता व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं, “जंगली रमी पे आओ ना महाराज…” आणि “कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज!” अशा खोचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला. इतकंच नव्हे तर, “रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, शेतीमालाचे भाव यांसारख्या मागण्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येतील का? दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना, सभागृहात मंत्री रमी खेळत आहेत हे दुर्दैवी आहे.” असं टीकाही केली होती. तसंच, “कधीतरी गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या…” असा स्पष्ट संदेशही रोहित पवारांनी दिला. त्यानंतर कोकाटे चांगलेच चर्चेत आले होते.