Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत; कर्तव्यनिधी म्हणून 5 लाखांचा धनादेश सुपूर्द

जगभरातील मराठा बांधवांना (Maratha Community) संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ (Pravin Pisal) यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2023 | 02:27 PM
प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची मदत; कर्तव्यनिधी म्हणून 5 लाखांचा धनादेश सुपूर्द
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : जगभरातील मराठा बांधवांना (Maratha Community) संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ (Pravin Pisal) यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे समस्त मराठा समाजासह पिसाळ कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

प्रवीण पिसाळ यांनी मराठा समाजातील तब्बल एक कोटीहून अधिक तरुणांचे भक्कम संघटन उभे केले आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे महाराष्ट्रभर तसेच देश-विदेशातील मराठी तरुणांनाही प्रेरणा व बळ मिळाले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा त्यांचा लढा समाजाला दिशा देणारा आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर केलेली मदत अविस्मरणीय आहे. कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, तर प्रवीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे पिसाळ कुटुंबियांच्या पाठीशी राहणे, हे आपले कर्तव्य आहे, अशा भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करेन आणि ज्या दिवशी ते साध्य होईल, ती मराठा प्रवीण पिसाळ व त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली असेल. ही दुर्दैवी घटना आहे. यापुढील काळात पिसाळ कुटुंबियांसह मराठा समाजातील तरुणांना कोणत्याही अडचणीत मदत करण्यासाठी मी तत्परतेने प्रयत्नशील राहून समाजाच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड.

Web Title: Mla mahesh landge help to pravin pisals family in pimpri nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 02:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maratha community
  • Pimpri

संबंधित बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचा तणाव वाढला; राज्य मंडळाची समुपदेशन सेवा सुरू
1

Maharashtra HSC Result 2026: बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचा तणाव वाढला; राज्य मंडळाची समुपदेशन सेवा सुरू

शिक्षणाचा बोजवारा, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचा संताप; सरकारला दिला इशारा
2

शिक्षणाचा बोजवारा, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचा संताप; सरकारला दिला इशारा

Exclusive Series: लिंग समभावाचे दोन चेहरे! स्वाती-निखिलचा जागृतीपासून ग्रामीण परिवर्तनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
3

Exclusive Series: लिंग समभावाचे दोन चेहरे! स्वाती-निखिलचा जागृतीपासून ग्रामीण परिवर्तनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी
4

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.