फोटो सौजन्य- प्रतिनिधी
फक्त हिंदू आहे? म्हणून बांग्लादेशमध्ये जो अत्याचार सुरु आहे. जी संकट येत आहेत ती केवळ हिंदु आहेत म्हणूनच. या विषयात आपण विचार करणार आहोत की नाही? बांग्लादेशमध्ये हजारो हिंदू मारले जात आहेत, हिंदुवर गोळ्या घातल्या जात आहेत, हिंदू मुलींवर अत्याचार होत आहेत. हे आपण उघड्या डोळ्यांनी कसे पाहणार आहोत. त्यामुळे १० डिसेंबरला हिंदू न्याय यात्रा काढली जाणार आहे. यादिवशी मानवाधिकार दिन म्हणुन हिंदुनी एकत्र झाले पाहीजे. त्यासाठी ओरोस येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कुडाळ-मालवणचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी केले आहे.
ज्यांना ज्यांना आपण हिंदू आहे असे वाटते त्यांनी या मोर्चात सहभागी व्हा
जो बांग्लादेशमध्ये हिंदुवर अत्याचार होत आहे. त्यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. या घटनांचा निषेध आम्ही करणार आहोत. ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येईल. सकाळी १० वाजता एकत्र यायचे आहे. ज्यांना ज्यांना आपण हिंदू आहे असे वाटते त्यांनी या मोर्चात सहभागी व्हा.
हिंदु बांधवांसाठी जे काय शक्य आहे ते केले पाहिजे
जसे आपण आपल्या देशात हिंदू म्हणुन सन्मानाने जगत आहोत. तसेच इतर देशात आपले हिंदु बांधव आहेत. ते सन्मानाने जगले पाहिजे. बांग्लादेशात असलेल्या हिंदुचे जीव वाचले पाहिजेत. त्यांची सुटका झाली पाहिजे. माता-बहिणींचे जीव वाचले पाहीजे, त्यासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत. हिंदू बांधवांसाठी जे काय शक्य आहे ते केले पाहिजे. हे कधीना कधी थांबले पाहीजे, त्यासाठी हा मोर्चा राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने काढणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.
हिंदूवरील हल्ल्याकरिता युनुस जबाबदार
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पहिल्या संबोधनात अराजक परिस्थिती आणि हिंदूंवरील हल्ल्यांसाठी सरकार प्रमुख मुहम्मद युनूस यांना जबाबदार ठरवले आहे. देशातील नरसंहारासाठी युनूस जबाबदार असून अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही हसीना यांनी म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडे चौकशीची मागणी
बांगलादेशामधील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आता जगभरातून आवाज उठवला जात आहे. अमेरिकेचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी या हल्ल्यासंबंधी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेकडे केली आहे. ते म्हणाले देशात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी बांगलादेश सरकारची आहे ऑगस्टमध्ये शेख हसीनाच्या सरकारला हटवण्यासाठी देशभरात हिंसाचार सुरू असताना हे हल्ले सुरु झाले आहेत. भारतानेही या हल्ल्यांचा निषेध केला आहे.