गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर (फोटो- सोशल मीडिया)
निवडणुकीसाठी मनसेला दोन जागा
महायुतीमध्ये नगराध्यक्षपदाचा मुद्दा गुंतागुंतीचा
आज उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता
गुहागर: गुहागर नगर पंचायतीच्या १७ नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी चांगलीच रंगत पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीतर्फे ठाकरे शिवसेनेने मनसेला बरोबर घेत आपली यादी जाहीर केली आहे. महायुतीची जिल्हयासाठी घोषणा जागा झाल्या असली तरी याठिकाणी जागा पहावयास मिळत आहे. यामुळे चौथ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. महाविकास आघाडीत शरद पवार राष्ट्रवादीने पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार नाही, असे ठरवल्याचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी स्पष्ट केले.
या आघाडीतील मनसेला सध्यातरी २ जागा देत आपल्या ९ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात ठेवला असून २ इच्छुकांची नावे असली तरी आमदार भास्कर जाधव यांनी या पदासाठीचा उमेदवार अजूनही निश्चित केलेला नाची निवडणूक एका वेगळ्याच रणनीतीने लढवावी लागणार आहे. गतवेळी अनेक विकासाची कामे करुनही शहरवासियांनी त्यावेळच्या राष्ट्रवादीला भुईसपाट केले होते. मात्र यावेळी दोघांनाही शिवसेना हेच नाव स्वीकारल्याने दिलेले उमेदवार, त्यांची पार्श्वभूमी, त्यांनी आजपर्यंत जनतेजवळ ठेवलेला संपर्क या सर्वांचा विचार करावा लागणार आहे.
महायुतीमध्ये नगराध्यक्षपदाचा मुद्दा गुंतागुंतीचा
सन २०१८मध्ये कुणबी समाज संघटनेच्या एकीचे बळ दाखवत जरी शहरविकास आघाडी केली असली तरी तब्बल ९ जागा निवडून आणल्या होत्या. तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. यामुळे भाजप आजही आपली ताकद आहे, असे म्हणत असेल तर ते योग्य आहे का? ज्या शहर विकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आणले, ते सर्वाधिक ९ च्या संख्येने आहेत. यामुळे पहिला दावा हा शिंदे सेनेकडे वळलेल्या कुणबी समाजाच्या शिवसेनेने केला आहे. यासाठी ९ जागांबरोबर नगराध्यक्षपदासाठी ३ उमेदवार तयार आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपने कुणबी समाज भाजपाकडे परत आला आहे.
महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ
आज अर्ज दाखल होण्याची शक्यता
गुहागर नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग ४ दिवस अर्ज दाखल झालेले नाहीत. बुधवारी अनेकांनी ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात केली असून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शुभारंभ होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा मात्र सज्ज आहे.






