Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमच्या नादी लागू नका, नाहीतर…; छत्रपती संभाजीनगरमधल्या राड्यानंतर मनसेचा थेट इशारा

संभाजीनगरमध्ये ठाकरे गट व शिंदे गट हे आमने सामने आले. या प्रकरणानंतर मनसेकडून महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकारावरुन इशारा दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 11, 2024 | 03:32 PM
आमच्या नादी लागू नका, नाहीतर…; छत्रपती संभाजीनगरमधल्या राड्यानंतर मनसेचा थेट इशारा
Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांनंतर पार पडणार आहे. आज चौथ्या टप्प्यातील प्रचार थांबणार आहे. त्यापूर्वी संभाजीनगरमध्ये ठाकरे गट व शिंदे गट हे आमने सामने आले. एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणानंतर मनसेकडून महाविकास आघाडीला इशारा देण्यात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकारावरुन इशारा दिला आहे.

चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते

मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला असून प्रचारामध्ये देखील मनसे सक्रीय सहभाग घेत आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या प्रकारानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. देशपांडे म्हणाले, आमच्या मनसैनिकांच्या नादाला कोणी लागू नये. नाही तर यांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू. यांनी हात तोडण्याची भाषा करू नये यांना तर आम्ही पळून पळून मारलं आहे. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहे ही काय आम्हाला धमकी देणार? अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी सुनावले आहे.

त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन देखील संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संदीप देशपांडे म्हणाले, संजय राऊत यांनी भाजपचा प्रचार केला तेव्हा ते देशप्रेमी आणि आम्ही प्रचार केला की देशद्रोही…ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल घाणेरडी वक्तव्यं केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. संजय राऊत जेव्हा वर जातील, तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत. हे माझं वाक्य लिहून घ्या. काँग्रेससारख्या देशद्रोह्यांसोबत जाऊन बसले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत आहे. बाळासाहेबांना जो त्रास होत आहे तो आमचा नाही यांचा होत आहे. मनसेची दखल घ्यावीशी वाटत नाही तर थोबाड कशाला उघडता मनसेच्या सभा पाहून हे घाबरले आहेत, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Mns leader sandip deshpande on sambhajinagar rada chandrakant khaire loksabha elections 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2024 | 03:32 PM

Topics:  

  • Chandrakant Khaire
  • loksabha elections 2024
  • political news
  • raj thackeray
  • Sandeep Deshpande
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
1

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
2

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
3

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
4

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.