Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली …. ; सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याच्या दुरावस्थेवर मनसे आक्रमक

सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यांची चाळण झालेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 24, 2025 | 06:14 PM
Navi Mumbai : सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली …. ; सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याच्या दुरावस्थेवर मनसे आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई :  सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची तसेच पदपथांची तात्काळ सुधारणा / दुरुस्ती करण्यासंदर्भात आज गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता आर. एन. दिवेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे.

सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यांची चाळण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात येथे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होत आहे. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने रेल्वेने प्रवास करणाऱ्या सानपाडा विभागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर बस आणि रिक्षा पकडताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात सांगितले आहे.

मराठीचा वाद संसदेपर्यंत पोहचला! महिला खासदार उतरल्या मैदानात; निशिकांत दुबेंना दाखवले दिवसाढवळ्या तारे

एका महिन्यापूर्वी सिडकोकडून रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आठवड्याभरातच पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे प्रवाशांचे दररोज प्रचंड हाल होत असून त्यांच्याकडून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली रिक्षा स्टँडमधील रस्त्याच्या केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या माध्यमातून जनतेला जुना लावण्याचे काम केल्याचा आरोप योगेश शेटे यांनी यावेळी केला आहे.

त्यामुळे सदर ठिकाणचे रस्ते व पदपथांची सुधारणा / दुरूस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत सानपाडा विभागातील रहिवाशांच्या अनेक तक्रारी मनसे सानपाडा शाखेत प्राप्त होत असल्याचे योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सदर रस्ता व पदपथ सिडको अखत्यारीत असल्यामुळे रस्त्याची व पदपथाची सुधारणा तात्काळ करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा विभागातील रहिवाशांना सोबत घेऊन ‘ मनसे स्टाईल ‘ ने सिडको विरोधात मोठं जनआंदोल करण्याचा इशारा योगेश शेटे यांनी पत्रातून सिडकोला दिला आहे. लवकरच सिडकोचे संबंधित विभागाचे अधिकारी सदर ठिकाणी रस्त्याची व पदपथांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री. आर. एन. दिवेकर यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांना यावेळी दिले आहे.

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Web Title: Mns leaders accuse cidco of cleaning roads outside sanpada railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • cidco news
  • MNS
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : “मी दहशतवादी आहे…”, APMC कामगाराच्या बॉम्बच्या खोट्या फोनमुळे नवी मुंबईत घबराट
1

Navi Mumbai Crime : “मी दहशतवादी आहे…”, APMC कामगाराच्या बॉम्बच्या खोट्या फोनमुळे नवी मुंबईत घबराट

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.